मराठी पत्रलेखन – marathi letter writing

marathi letter writing : आपल्या मनातील भावना, विचार आणि मते सुसंबद्ध पद्धतीने लिखित स्वरूपात पोहचवण्याचे साधन म्हणजे पत्रलेखन होय.पत्रलेखन साधारणपणे दोन पध्दतीने लिहले जाते ते पुढीलप्रमाणे आहेत.

  1. औपचारिक म्हणजेच व्यावहारिक
  2. अनौपचारिक म्हणजेच घरगुती किंवा ओळखीच्या व्यक्तीसाठी लिहणे

आज आपण मराठी पत्रलेखन – marathi letter writing यामध्ये पत्रलेखनाचे स्वरूप आणि पत्राची मांडणी याविषयीची माहिती घेणार आहोत.

marathi letter writing
मराठी पत्रलेखन – marathi letter writing

मराठी पत्रलेखन – marathi patra lekhan

वरील परिच्छेदत उल्लेख केल्याप्रमाणे पत्रलेखन हे दोन प्रकारे केले जाते.पाहिले औपचारिक आणि दुसरे अनौपचारिक. या दोन्ही पत्राची मांडणी मध्ये थोड़े फरक आहेत.

औपचारिक पत्र लिहीत असताना खालील घटक लक्षात घेऊन पत्र लिहावे.

  1. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव व पत्ता
  2. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक
  3. मायना व विषय
  4. विषयानुसार मांडणी
  5. मुख्य संदेश किंवा मजकूर
  6. समारोप

कोणतेही व्यावहारिक पत्र लिहत असताना त्याचा विषय नीट समजून घेऊन, पत्र लिहावे.

औपचारिक पत्रामध्ये स्वपरिचय, मागणी किंवा तक्रार किंवा इतर विषयाचा समावेश होतो.तर अनौपचारिक पत्रात कौटुंबिक विषय येतात.

मराठी पत्रलेखन – marathi letter writing 2021 याविषयावर इयत्ता नववी ते इयत्ता दहावीमध्ये पाच गुण साठी प्रश्न येऊ शकतो.त्यामुळे पत्रलेखन नीट समजून घ्या.

औपचारिक पत्र लेखन मराठी

औपचारिक पत्र प्रामुख्याने कार्यालयीन पत्र म्हणून ओळखले जाते.उदारणार्थ जर तुम्ही एखाद्या सोसायटी मध्ये राहत असाल, आणि तुमच्या सोसायटी मध्ये पाणी पुरवठा नीट होत नसेल.अश्या वेळेस सोसायटीच्या वतीने तुमच्या नगरपालिकेला पत्र पाठवले जाते.या पत्रात तुम्ही विनंती करून पाणी पुरवठा बद्दल आपली समस्या नगरपालिका च्या समोर मांडू शकता.

औपचारिक पत्राची मांडणी – formal letter in marathi

  1. पत्राच्या सुरवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा, पत्ता-पिन कोड, दिनांक लिहा.
  2. नंतर डावीकडे योग्य मायना लिहा.संबंधित व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहावा.
  3. औपचारिक पत्रात पत्राचा विषय लिहणे आवश्यक असते.
  4. विषयांतर त्या खाली महोदय/महोदया असे लिहून पत्रलेखनास सुरवात करावी.
  5. विषयानुसार मजकूर लिहावा.
  6. शेवटी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.

अनौपचारिक पत्राची मांडणी – marathi letter writing informal

  1. पत्राच्या सुरवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव आणि पत्ता लिहावा.
  2. त्यानंतर पत्र ज्याला पाठवायचे त्याचे नाव आणि पत्ता
  3. योग्य मायना वापरून लेखनास सुरवात करावी.
  4. त्यानंतर मुख्य मजकूर लिहावा.
  5. आणि शेवटी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.

स्वपरिचय पत्र लेखन – marathi letter writing

स्वपरिचय पत्र म्हणजे resume ज्याचा वापर नोकरीसाठी अर्ज करताना किंवा आपली स्वतः बद्दल ची माहिती देताना होत असतो.

नोकरी साठी resume कसा हवा यासाठी हा लेख वाचा – How to make a simple resume for job 2021?

  1. संपूर्ण नाव
  2. पत्ता
  3. संपर्क
  4. जन्मतारीख
  5. उंची वजन
  6. शैक्षणिक पात्रता
  7. इतर आवडणारे खेळ
  8. पूर्वी प्राप्त केलेले बक्षिसे

औपचारिक पत्र नमुना – formal letter in marathi

विषय- वरद सोसायटी च्या ग्रंथालय मध्ये पुणे बुकडेपो यांच्याकडे पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा.


|| श्री ||

अ. ब.क
सेक्रेटरी ऑफ वरद सोसायटी
पिंपरी चिंचवड,
पुणे 411018

प्रति,
मा. संचालक
शारदा बुक डेपो
पुणे 411018

विषय – ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी

महोदय,

मी अ.ब.क वरद हौसिंग सोसायटी चा सेक्रेटरी आहे.आपणास पत्र लिहण्यास कारण की, सोसायटीच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी होती.

सोसायटी मध्ये नवीन ग्रंथालय सुरू केले असल्या कारणाने आम्हला काही पुस्तके विकत घ्यायची आहेत.या पत्राबरोबर काही पुस्तकांची यादी सामायिक केली आहे.

आशा आहे की आपण पुस्तके उपलब्ध करून देताल.

कळावे,
अ.ब.क
वरद सोसायटी


अनौपचारिक पत्रलेखन नमुना – informal letter in marathi

विषय – तुमच्या मित्राला नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन पत्र लेखन करून शुभेच्छा द्या.


|| श्री ||

अ.ब.क
पिंपरी चिंचवड
पुुणे 411018

प्रिय मित्राचे नाव,

पत्र लिहताना आनंद होत आहे, कारण की चक्क तुला नोकरी मिळाली. [ विषयाला अनुसरून लेखनाला सुरवात

मुख्य मजकूर

भेटण्याबद्दल आणि गमतीजमती विषयी मजकूर

समारोप

तुझा मित्र,
अ.ब.क


महत्त्वाचे प्रश्न

जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो ?

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो.

भारतात टपाल सेवा केव्हा सुरू झाली ?

भारतात टपालव्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली.

काही निवडक

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पत्रलेखन मराठी – marathi letter writing बद्दल जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “मराठी पत्रलेखन – marathi letter writing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *