भारतीय महिला खेळाडूंची नावे व माहिती

Names of Indian women players in marathi : भारतीय महिला खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात खूप मोलाचे योगदान दिले आहे. भारताच्या महिला खेळाडूंनी आपल्या भारत देशाला अनेक पदके सुद्धा मिळवून दिली आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय महिला खेळाडूंची नावे (Names of Indian women players in marathi) जाणून घेणार आहोत.

Names of Indian women players in marathi
भारतीय महिला खेळाडूंची नावे (Names of Indian women players in marathi)

भारतीय महिला खेळाडूंची नावे (Names of Indian women players in marathi)

भारतीय महिला खेळाडूंची नावेखेळाचे नाव
सानिया मिर्झाटेनिस
मेरी कोमबॉक्सिंग
मिताली राजक्रिकेट
सायना नेहवालबॅडमिंटन
गीता फोगटकुस्ती
साक्षी मलिककुस्ती
पीव्ही सिंधूबॅडमिंटन
दीपिका कुमारीधनुर्विद्या
दीपा कर्माकरजिम्नॅस्टिक्स
तनिया सचदेवबुद्धिबळ
राणी रामपालहॉकी
हिमा दासअथलेटिक्स
राही सरनोबतनेमबाजी
अपूर्वी चंडिलानेमबाजी
सफाली वर्माक्रिकेट
भक्ती शर्मापोहणे
मनिका बात्राटेबल टेनिस
अंजली भागवतनेमबाजी
अनिसा सय्यदनेमबाजी
दिव्या सिंगबास्केटबॉल
कर्णम मल्लेश्वरीवेटलिफ्टिंग
पीटी उषाअथलेटिक्स
सुब्बरामन विजयालक्ष्मीबुद्धिबळ
सोनम मलिककुस्ती
भारतीय महिला खेळाडूंची नावे (Names of Indian women players)

भारतीय महिला खेळाडूंची माहिती मराठी (Indian women players Information in Marathi)

भारतीय महिला खेळाडूंची नावे आता आपण जाणून घेतली. आता आपण भारतीय महिला खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत.

1) सानिया मिर्झा :

ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर 3 ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण 4 अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

2) मेरी कोम :

ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.मेरी कोमने महिला जागतिक हौशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून 2012 लंडन ऑलिंपिक स्पर्धेत फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्यपदक मिळवले. 2014 इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले आहे. 2014 साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.

3) मिताली राज :

या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, 20-20 फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत.

4) सायना नेहवाल :

ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून 2009 मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे.

5) पी.व्ही. सिंधू :

ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. 2016 सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले आहे. 2020 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे. तसेच सिंधू ऑलिंपिक स्पर्धेमध्ये दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

6) हिमा दास :

ही एक भारतीय धावपटू आहे. 2018 मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे.

7) गीता फोगट :

ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे. हीने पहिल्यांदा भारतासाठी राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. 2010 राष्ट्रकुल खेळामध्ये महिलांच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर ही ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू आहे. डिसेंबर 2016 मधील दंगल हा हिंदी चित्रपट हिच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये फातिमा साना शेख हिने गीता फोगटची भूमिका निभावली आहे तर आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका निभावली आहे.

8) राणी रामपाल :

ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून 2016 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला 29 ऑगस्ट 2020 रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.

9) सोनम मलिक :

ही हरीयाणाच्या सोनीपतमधील भारतीय महिला कुस्तीपटू आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच तिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारतासाठी 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलिक हिला सोनमने दोन वेळा हरवले आहे.

10) साक्षी मलिक :

ही भारतीय महिला मल्ल आहे. हिने रियो दि जानेरो येथे 2016 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये 58 किलो वजनी गटात किर्गि‍झस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला 8-5 असे हरवून कांस्यपदक पटकावले होते. साक्षी मलिक यांचा जन्म 3 सप्टेंबर 1992 या दिवशी झाला.

सारांश (Summary):

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय महिला खेळाडूंची नावे (Names of Indian women players in marathi) जाणून घेतली. भारतीय महिला खेळाडूंची माहिती मराठी (Indian women players Information in Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *