बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems in marathi

Bahinabai Chaudhary poems in marathi : संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन त्यांना मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखले जाते. संत बहिणाबाई या शिक्षणाने निरक्षर होत्या. त्यामुळे लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. तरीही त्यांच्या काही कविता आजही मोठ्या आनंदाने ऐकल्या जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi) जाणून घेणार आहोत.

Bahinabai Chaudhary poems in marathi
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi)

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi)

धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
वऱ्ह पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे

ऊन वाऱ्याशी खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वा-‍यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !
वाटच्या वाटसरा

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी

वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी

जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट

उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात

उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

माझेज भाऊबंद
घाईसनी येतीन !'
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान

तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव

मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट

दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती

येऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
अरे रडता रडता
अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले

आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली

देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव

कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत

नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव
माझी मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साच लेकरू
चान्गदेव योगियान
तिले मानला रे गुरू

देख ग्यानियाच्या राजा,
आदिमाया पान्हावली
सर्व्याआधी रे मुक्ताई
पान्हा पियीसनी गेली..

अरे सन्याशाची पोर
कोन बोलती हिनई
टाकीदेयेल पोरान्च
कधी तोन्ड पाहू नही..

अरे अस माझ तोन्ड
कस दावू मी लोकाले?
ताटी लावी ग्यानदेव
घरामधी रे दडले !

उबगले ग्यानदेव
घडे असन्गाशी सन्ग,
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभन्ग..

घेता हिरीदाचा ठाव
ऐका ताटीचे अभन्ग
एका एका अभन्गात
उभा केला पान्डुरन्ग..

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसन
असा भाग्यवन्त भाऊ,
त्याची मुक्ताई बहीन...

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता खोप्यामधी खोपा (Bahinabai Chaudhary kavita marathi)

अरे खोप्यामधी खोपा 
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं 
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं!

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड!

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा!

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे!

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार!

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार!

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मन वढाय

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

मानूस कविता बहिणाबाई चौधरी

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बहिणाबाई चौधरी यांच्या मुलाचे नाव

ओंकार आणि सोपान

बहिणाबाईंनी उभ्या पीकातलं ढोर असे कोणाला म्हटले आहे

मानवाच्या मनाला

बहिणाबाई शैक्षणिक दृष्ट्या होत्या

निरक्षर

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोली भाषेत आहेत?

लेवा बोली भाषेत

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बहिणाबाई चौधरी यांच्या काही कविता (Bahinabai Chaudhary poems in marathi) जाणून घेतल्या. बहिणाबाई चौधरी मराठी कविता (Bahinabai Chaudhary kavita marathi) तुम्हाला कश्या वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ह्या कविता आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

जर तुमच्याकडे बहिणाबाई चौधरी यांची गाणी, बहिणाबाई च्या कविता किंवा संत बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह असेल तर तो आमच्या पर्यंत नक्की पोहचवा. त्या आम्ही या लेखामध्ये नक्की समाविष्ट करू. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

One thought on “बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *