मराठी कादंबरी यादी | Marathi novel list

By | November 11, 2022

Marathi novel list (मराठी कादंबरी लिस्ट) : मित्रांनो वाचायला तर प्रत्येकालाच आवडतं. काही लोकांना कविता वाचायला आवडतात तर काही लोकांना आत्मचरित्र वाचायला आवडतं तर काही लोकांना कादंबरी. तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कादंबऱ्यांना खूप महत्व दिले जाते. आणि त्यांच्यावर प्रेम सुद्धा खूप केलं जातं. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध कादंबरीकार होऊन गेलेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कादंबरी यादी (Marathi novel list) जाणून घेणार आहोत.

Contents

कादंबरी म्हणजे काय (Novels in Marathi)

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी.

कादंबऱ्याचे प्रकार (Types of novels in Marathi)

 1. ऐतिहासिक
 2. दलित
 3. ग्रामीण
 4. पौराणिक
 5. सामाजिक
 6. प्रसंग चित्रणपर
 7. काल्पनिक
 8. आत्मकथनात्मक
 9. कौटुंबिक
 10. वैज्ञानिक
 11. बालकादंबरी
 12. शेेतकरीवादी
 13. समस्याप्रधान
 14. राजकीय
 15. वास्तववादी

मराठी कादंबरीचा इतिहास

 • पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.1857), लेखक – बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषेतली पहिली कादंबरी समजली जाते.
 • पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. 1881), लेखक – विनायक कोंडदेव ओक.
 • पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (इ.स. 1893), लेखक – हरी नारायण आपटे.
Marathi novel list
मराठी कादंबरी यादी (Marathi novel list)

मराठी कादंबरी यादी (Marathi novel list)

कादंबरी म्हणजे काय, मराठी कादंबरीचा इतिहास काय आहे याविषयी आता आपण माहिती जाणून घेतली. आता आपण मराठी कादंबरी यादी जाणून घेणार आहोत. ही यादी तुम्हाला वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचण्यासाठी नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला या व्यतिरिक्त इतर काही कादंबरीची नावे माहित असतील तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा.

मराठी कादंबरी व लेखक

मराठी कादंबरीलेखक
शाळा कादंबरीमिलिंद बोकील
मृत्युंजय कादंबरी शिवाजी सावंत
श्यामची आई कादंबरी साने गुरुजी
अमृतवेल कादंबरी वि.स. खांडेकर
ऋतुचक्र कादंबरी दुर्गा भागवत
रणांगण कादंबरी विश्राम बेडेकर
व्यासपर्व कादंबरी दुर्गा भागवत
संभाजी कादंबरी विश्वास पाटील
स्वामी कादंबरी रणजित देसाई
महानायक कादंबरी विश्वास पाटील
सूड कादंबरी बाबुराव बागुल
झाडाझडती कादंबरी विश्वास पाटील
फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे
सिंहासन कादंबरी अरुण साधू
बॅरिस्टर कादंबरी जयवंत दळवी
ययाती कादंबरी वि. स. खांडेकर
पांगिरा कादंबरी विश्वास महिपती पाटील
गावचा टिनोपाल गुरुजीशंकरराव खरात
गोलपीठा कादंबरी नामदेव ढसाळ
बनगरवाडी कादंबरी व्यंकटेश माडगूळकर
कोतला कादंबरी भालचंद्र नेमाडे
एकेक पान गळावया कादंबरी गौरी देशपांडे
युगंधरा कादंबरी सुमती क्षेत्रमाडे
शेकोटी कादंबरी डॉ. यशवंत पाटणे
गाव पांढर कादंबरी आप्पासाहेब खोत
स्वप्नपंख कादंबरी राजेंद्र मलोसे
कल्पनेच्या तीरावर कादंबरीवि. वा. शिरवाडकर
छावा कादंबरीशिवाजी सावंत
पानिपत कादंबरीविश्वास पाटील
बाजिंद कादंबरीगणेश मानुगडे
श्रीमान योगी कादंबरीरणजित देसाई
युगांत कादंबरीसंजय राउत
राधेय कादंबरीरणजित देसाई
महाश्वेता कादंबरीसुधा मूर्ती
कंपॅनिअन कादंबरीबाबा कदम
लास्ट बुलेट कादंबरीसुहास शिरवळकर
गारंबीचा बापू कादंबरीश्री. ना. पेंडसे
वारणेचा वाघ कादंबरी अण्णा भाऊ साठे
ब्राह्मणकन्या कादंबरीश्रीधर केतकर
वज्राघात कादंबरीहरि नारायण आपटे
रावण राजा राक्षसांचा कादंबरीशरद तांदळे
राऊ कादंबरीना. सं. इनामदार
चक्रव्यूह कादंबरीडॉ. निलेश राणा
अग्निपंख कादंबरीडॉ. अब्दुल कलाम
यमुना पर्यटन कादंबरीबाबा पद्मंजी
कालिंदी कादंबरीजगन्नाथ कुंटे
हिरण्यगर्भ कादंबरीसखाराम आठवले
तहान कादंबरीसदानंद देशमुख
मायबोली कादंबरीमनोहर सालफळे
पण लक्ष्यात कोण घेतो कादंबरीह. ना. आपटे
झुंज कादंबरीएस. एस. कुलकर्णी
मर्मभेद कादंबरीशशी भागवत
बलुतं कादंबरीदया पवार
राजा शिवछत्रपती कादंबरीबाबासाहेब पुरंदरे
महानायक कादंबरीविश्वास पाटील
नटसम्राट कादंबरीविष्णू वामन शिरवाडकर
पडघवली कादंबरीगो. नी. दांडेकर
झोंबी कादंबरीआनंद यादव
उचल्या कादंबरीलक्ष्मण गायकवाड
बोभाटा कादंबरीनाथ माने
व्हायरस कादंबरीजयंत नारळीकर
आनंद ओवरी कादंबरीदि.बा.मोकाशी
कमला कादंबरीकृपाबाई सत्यनादन
ग्रहण कादंबरीनारायण धारप
पर्व कादंबरीडॉ. एस.एल. भैरप्पा
मृगजळ कादंबरीसुनिल डोईफोडे
करंटाभाऊ पाध्ये
मराठी कादंबरी व लेखक (Marathi novels and their author)

गाजलेल्या मराठी कादंबरी (Famous marathi novels)

मित्रांनो आता आपण मराठी मध्ये प्रसिद्ध आणि गाजलेल्या मराठी कादंबरी पाहुयात.

श्यामची आई

श्यामची आई ही पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना 9 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला होता. 1953 साली या पुस्तकावर आधारित असलेला ‘श्यामची आई’ याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला होता. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत.

मृत्युंजय कादंबरी

महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. 24 सप्टेंबर 1995 रोजी या पुस्तकाला ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार दिला गेला आहे. महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे.

श्रीमान योगी

स्वामी’नंतर रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. स्वामीनंतर तब्बल सात वर्षांनी श्रीमानयोगी वाचकांपुढे सादर झाली.. या पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा भारदस्तपणा वाचकांच्या मनाला स्पर्श करतो. रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.

पानिपत कादंबरी

पानिपतचं युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली अडीचशे वर्ष रुतणारी ऐतिहासिक घटना. आणि या घटनेवरची ‘पानिपत’ ही विश्वास पाटील यांची लाखो वाचकांच्या हृदयांत घर केलीली ऐतिहासिक कादंबरी. मुंबई आकाशवाणीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मराठीतील गेल्या 50 वर्षांतील सर्वोत्कृष्ट 10 पुस्तकांमध्ये समावेश. 35 हून अधिक पुरस्कार प्राप्त.

कोसला कादंबरी

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कादंबरीची कथा पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा आणि त्याच्या महाविद्यालयीन काळापासूनच्या मित्रांचा पुढचा प्रवास कथन करते. या कादंबरीत लेखकाने आत्मचरित्राचा वापर केला आहे. कोसला ही मराठी साहित्यातील पहिली अस्तित्ववादी कादंबरी मानली जाते.

युगंधर कादंबरी

युगंधर शिवाजी सावंत यांची गाजलेली कादंबरी आहे, श्रीकृष्ण बद्दल वर्णन करणारी हि कादंबरी आहे. युगंधर ही मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट आणि प्रसिद्ध कादंबरीपैकी एक आहे आणि तिला साहित्य अकादमीतर्फे अनेक पारितोषिके आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

राऊ कादंबरी

राऊ ही एन एस इनामदार यांची 1972 ची मराठी ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कथा मराठा सेनापती पहिला पेशवा बाजीराव आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांच्या वास्तविक जीवनातील ऐतिहासिक पात्रांमधील काल्पनिक प्रणयाभोवती फिरते. ही कादंबरी बाजीरावांच्या कुटुंबातील सदस्य आणि सनातनी पुजारी यांच्यातील संबंधांमुळे निर्माण झालेल्या संतापाभोवती फिरते. राऊचे 2015 मध्ये बाजीराव मस्तानी या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात रूपांतर झाले आहे.

ययाती कादंबरी

ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. 1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974 साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

छावा कादंबरी

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ‘छावा ‘ या कादंबरीचा समावेश होतो.

फकिरा कादंबरी

फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. 1959 साली प्रकाशित झाली. इ.स. 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सर्वात पहिली कादंबरी कोणती?

यमुनापर्यटन (1857)

कादंबरी म्हणजे काय?

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात.

कादंबरीचे घटक कोणते?

कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन

मराठी तात्विक कादंबरीचे जनक कोण?

हरी नारायण आपटे

एल्गार या कादंबरीचे लेखक सांगा

कादंबरीकार श्री. ना. पेंडसे

शबरी ही कादंबरी कोणी लिहिली?

विभाव शिरुरकर

पांडुरंग सांगवीकर हे कोणत्या कादंबरीतील पात्र आहे?

कोसला

विश्वास पाटील यांच्या पहिल्या कादंबरीचे नाव सांगा?

चंद्रमुखी

मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती?

मोचनगड

नामुष्कीचे स्वगत या कादंबरीचे लेखक कोण?

रंगनाथ पठारे

हाडकी हाडवळा या कादंबरीचे लेखक सांगा?

नामदेव ढसाळ

विश्वास पाटील यांची महानायक ही कादंबरी कोणत्या नेत्यावर आधारित आहे?

नेताजी सुभाषचंद्र बोस

सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या वडिलांचे नाव?

महिपत पाटील

मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती?

यमुना पर्यटन

राबी गुंजीकर यांनी कोणती कादंबरी लिहिली?

मोचनगड

गोतावळा या कादंबरीचे लेखक कोण?

आनंद यादव

विद्रोह कादंबरीचे लेखक कोण?

बाबुराव बागुल

इस्कोट या कादंबरीचे लेखक कोण?

भीमसेन देठे

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कादंबरी यादी (Marathi novel list) जाणून घेतली. गाजलेल्या मराठी कादंबरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “मराठी कादंबरी यादी | Marathi novel list

 1. Vidya pawar

  शौर्यशृंग ही कादंबरी कोणाची आहे, काही माहीत आहे का ? त्यासंबंधीत काहीही माहीत असेल कमेंटबाॅक्स मध्ये कळवा.

  Reply
  1. Talks Marathi Post author

   शौर्यशृंग ही एक मध्ययुगीन रहस्यमयी कादंबरी आहे. हि कादंबरी अभिषेक साळुंखे यांनी लिहिली आहे. ज्यामध्ये चार राज्ये असून त्यातील मैत्री, वैमनस्य ह्यावर ही कथा आधारित आहे. अय्यारी कलेचे विस्मयकारक प्रयोगही आहेत. वीर, करुण, बिभत्स, शांत, भयानक आणि शृंगार रसाचा परिपोष आहे.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *