5 मराठी प्रेम कथा | Love story in marathi

Love story in marathi : romantic love stories in marathi : प्रेम ही एक प्रकारची भावना आहे, जी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते. तसं पाहायला गेलं तर एका ठराविक वयामध्ये प्रत्येकाला प्रेम हे होतच. मग ते वन साईड असो किंवा टू साईड  असो. मग या मध्ये काही लोकांचे प्रेम यशस्वी होतात तर काही काही लोकांचे प्रेम यशस्वी होत नाही तो भाग वेगळा. पण मराठी प्रेम कथा (story of love in marathi) वाचायला सर्वांनाच आवडतात. म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये आपण मराठी प्रेम कथा (Love story in marathi) जाणून घेणार आहोत.

Love story in marathi
मराठी प्रेम कथा (Love story in marathi)

मराठी प्रेम कथा (Love story in marathi)

Love story in marathi : आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे, मी कामावरून आज थोडं लवकरच आलोय. रोज ती मला CST वर भेटते ना आणि मग आम्ही तेथुन मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो.

ती एक अकांउटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकेनिकल इंजिनियर असल्याने मी ही याच वेळेत रीकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो….

तेव्हापासुन आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी CST वर पोहोचलोय, रेल्वे अशी समोर येऊन थांबली, आज तिला प्रपोझ करायचं हे आधीच ठरवलं होतं मी, रेल्वेतुन उतरताना मी तिला पाहीलं आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने, तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छा आणला होता, ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छा देत म्हणाली Many many happy Returns of the day..

मी तिला म्हणालो, थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं त्यात, आपण कॉलेज फ्रेंडस आहोत ना, मग असं थँक्स म्हणायचं नाही हं..

मी : हो. मला तुला काही विचाराचंय.

ती : हो मग विचार ना…

मी : पण मला पहिले तु वचन दे की काही झालं तरी तु माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तु जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील.

ती : अरे आज तु असं का बोलतोयस…. मी ते कळेल तुला पण पहिले मला वचन दे…..

ती : बरं दिलं वचन.. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला मी : ठीक आहे, हा गुच्छा तुझ्या हातात घर, मी गुच्छा तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो, तु मला कॉलेजमध्ये असल्यापासुनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगु शकलो पण आता सांगतोय, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तु माझं प्रेम स्वीकारशील का ?

त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला, आणि सचिन हे फुल घेऊन तु इथे काय करतोयस…? माझा 3rd year मधला एक क्लासमेट समीर तिथे आला होता, कदाचित तो खुप वेळ आमच्याकडे बघत असावा, अरे मी तर इथे हिला…. ( मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं) अरे इथेच होती ती कुठे गेली. माहित नाही रे.. तो म्हणाला OK ठीक आहे. शांत हो बस इथे…

मी: का..?
तो: सांगितलं ना एकदा मी बस म्हणुन आलोच मी,, (तो थोडा वेळ कुठेतरी गेला, माझी नजर तिलाच शोधत होती, ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो, त्याने मला CST च्या एका कोपऱ्याला नेलं…

तो म्हणाला हे समोर जे लिहीलंय ते एकदा वाच, तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांची लिस्ट होती, आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचुन माझे डोळे पाणावले, मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलु लागला. मी एक सायक्याट्रिक आहे सचिन, आणि मघाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघुन मला तु मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणुनच तर तुला मी तिथे बसवुन, इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं कि तो वेडा आहे, आणि रोज इथे येत असतो..

त्या बाजुच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं कि तीन वर्षापूर्वी तु जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास, तेव्हा अचानक एका मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटुन, भिंतीत घुसली, त्यातुन रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरुन कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटुन न जाता त्या मुलीच्या हृदयातुन आरपार गेली होती, तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता, दहशतवाद्यांनी CST वर केलेल्या हल्यात तुझ्या समोर, तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले.. याचा तुला मोठा धक्का बसला, आणि तेव्हापासुनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय…..

समीरने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो, समीर तिथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन morning विष केलं आणि तो म्हणाला आजपासुन तु वर्षभर इथेच राहुन माझी ट्रिटमेंट घेशील, पुर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथुन जाऊ देणार नाही मित्रा.. मी होकारार्थी मान हलवली, कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातुन बरं करू शकतो….

आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तेच गुलाबाचं फुल घेऊन. नाही तसं काही नाहीये मी पुर्ण बरा झालोय.. मला माहिती आहे ती आज येणार नाही. आज तिचा स्मृतीदिन आहे, हे फुल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलंय एक आठवण म्हणुन. मराठी प्रेम कथा (Love story in marathi)

heart touching true love story in marathi

हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा (heart touching true love story in marathi)

heart touching true love story in marathi : तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळीस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं… “काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?” ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही 5, 6 दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत..

त्याने तिला विचारलेले कि तू उदास का वाटतेस पण हे ऐकून तो स्वत: पण उदास झाला होता.. पण त्याला आनंदही झाला होता कि ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, “अगं मगं उदास होण्याचे काय कारण आहे त्यात?” ती म्हणाली, अरे मी 5, 6 दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण 5, 6 दिवस…. असं म्हणून तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे… तुला काहीच वाटत नाही आहे ना? तो म्हणाला, मला… मला कशाला काय वाटेल ? किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही गावाला जावा आणि लग्न Enjoy करा… त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचे होते…

चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली, चल बाय माझा स्टॉप आला. ती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तो हि खूप उदास झाला होता. पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाचं अवसान आणत म्हणाला, “Happy Journey” ती हसली, पण अश्रू लपवत होती आणि ती बसमधून उतरली. दुसऱ्या दिवशी त्याचे ऑफिसला जायचे मन नव्हते. घरी राहून पण तिचीच आठवण येईल. ऑफिसला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. तो बसस्टॉपवर जातो आणि पाहतो तर काय..

ती बसस्टॉपवर उभी असते. त्याला आनंदही होतो पण स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो तिला विचारतो, “अगं तू लग्नाला जाणार होतीस ना ?” ती म्हणते, “नाही गेली रे”…. “का गं ?” “असचं नाही जावसं वाटलं म्हणून नाही गेली..” त्या क्षणी त्याला असं वाटतं कि ती आपल्यासाठीच नसेल गेली. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली दोघे बसमध्ये चढले तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच दिवस उलटत गेले. तिचं नंतर बसस्टॉपवर येणे कमी झाले होते आणि आली तरी शांत असायची. काही बोलायची हि नाही…

त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागचं कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले. त्याला नंतर असे वाटू लागले कि “तिला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल”.. कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल….

तिचा वाढदिवस येत होता त्याने ठरवलं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला सांगून टाकीन माझ्या मनातलं… तो तिला सांगतो “तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी जाऊया का ?” ती बोलते, “ठीक आहे जाऊया.” तिचा वाढदिवसाचा दिवस येतो. दोघे बसस्टॉपवर न भेटता दुसरीकडे भेटतात.

तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन जातो. ती समोर येते. तो तिला म्हणतो, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आज खूप सुंदर दिसतेस तू…. ती लाजते आणि Thank You बोलते. तो तिला म्हणतो, “आदिती मला तुला काही तरी सांगायचं आहे.” ती म्हणते, “सांग ना..” तो म्हणतो, “आदिती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” आणि फुलांचा गुच्छा तिला देतो. ती त्या फुलांचा गुच्छा घेते आणि म्हणते “आदित्य माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे”… आदित्य तिला म्हणतो, “तू माझ्याशी लग्न करशील का ?” आदिती त्याला म्हणते, “नाही..” “का ग? प्रेम करतेस मगं लग्न का नाही करणार ?” ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते,

“नाही करू शकणार आणि तिकडून निघून जाते.” तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते. तो विचारात पडतो. का आदिती अशी वागली? लग्नासाठी होकार का नाही दिला. जर असंच करायचे होते मगं प्रेमही का केले माझ्यावर.. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होती. तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो. त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. नंतर तो घरी जातो…दुसऱ्या दिवशी तो बसस्टॉपवर जातो पण ती येत नाही. असेच 4, 5 दिवस निघून जातात. ती येतच नाही. तो ती का येत नाही हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो….

तिने तिच्या घरचा पत्ता त्याला आधीच सांगितलेला असतो. तो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला शॉकच लागतो. तिकडे गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो. तो तिच्या घरच्यांना विचारतो, “हे काय हिच्या फोटोला हार का लावला आहे ?” तेव्हा तिचे घरचे बोलतात, “आम्ही 2 महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो पण आदितीचा तिकडेच मृत्यू झाला.” हे ऐकून तो बोलतो कि, “हे असे कसे होईल आदिती तर 4, 5 दिवस झाले फक्त आली नाही आहे म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे.” घरातल्यांना असं वाटत कि हा वेडा आहे कोण तरी? ते त्याला बोलतात कि हेच सत्य आहे. तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो..

तेवढयात बसचा ब्रेक लागतो आणि तो भानावर येतो. आज त्या गोष्टीला 5 वर्षे झाली. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात तो ते अश्रू पुसतो. बसमधून उतरतो. त्याला असे वाटत होते. माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली, “ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती.” “जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर”… पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीलेला होता…

आदिती.. प्लीज परत ये ना एकदा…. ही होती एक हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा (heart touching true love story in marathi)

romantic love stories in marathi

एक हृदस्पशी प्रेमकथा (romantic love stories in marathi)

romantic love stories in marathi : आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे नमिता.. दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच हॉस्पीटलमध्ये झाला, त्या हॉस्पीटलमध्ये अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात आलं, तेव्हाच त्याने तिच्या हाताला पहील्यांदा स्पर्श केला. तेव्हा ते दोघेही एका वेगळ्या उर्जेने थरथरले.. कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम त्याने व्यक्त केलं असावं.. सागरचे आईवडील हे मुळचे आणि पुण्याचे आणि नमिताचे कोल्हापुरचे.. आज त्या दोघांचाही तिसरा वाढदिवस आहे आणि यामुळेच तर सागरचे वडील सागरच्या ऊदंड आयुष्यासाठी कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला घेऊन आलेत…

नमितालासुद्धा तिचे आईवडील याच कारणास्तव महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत.. दर्शन घेऊन निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श होतो जो पहील्यांदा दवाखान्यात झाला होता.. तीने त्याच्याकडे बघुन एक गोड स्माईल केली, तेव्हा कदाचित त्याला वाटलं असावं की कदाचित हीने मला ओळखलंय.. ही त्यांची दुसरी भेट.. वरचासुद्धा काय काय घडवुन आणतोय हे कोणाला कधी कळलंय का.? पुढे वाचा तिसरी भेट तर याहीपेक्षा intresting आहे.. त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन झालंय.. आज कॉलेजचा पहीला दिवस दोघांनाही यायला खुप उशीर झालाय.. (उशीर तर व्हायचाच ना नाहीतर

नशीब पुढचा खेळ कसा खेळणार ..

दोघेही क्लासकडे धावताहेत, धावताहेत, धावताहेत, think in slow motion.. आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या slow motion मध्ये उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.. त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच, दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.. नमिता न राहुन सागरला विचारतेय, आपण आधी कधी भेटलोय का.? माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.. मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.. एकमेकांना चोरून भेटणं, भेटवस्तु देणं, तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं…

त्यांच प्रेम जोरावर असताना मग अचानक नशीबाने आपली चाके उलट्या दिशेने फिरवली.. तिची काळजीखातर विचारली गेलेली प्रश्ने याला dominating वाटु लागली.. परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं नमिताला तो मला टाळतोय असं वाटु लागलं.. एकमेकांच्या वाटेवर डोळे लावुन बसणारे ते आज एकमेकांच्या वाटेवरून जाणे टाळु लागले..

आज त्या दोघांनी अधिकृतपणे breakup केला.. जो मनातुन आधीच झाला होता.. नशीब आज त्यांच्यावर हसत होतं, होतं काय आणि झालं काय.? शिक्षण संपल्यानंतर दोघांचही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालं आणि तेही एकाच दिवशी…

आज ते त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता तर येणार नाही पण त्यांना जे हवं ते त्यांनी साध्य केलंय.. आज 1993 त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीय.. नशीबाने त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतायेत.. पण वेगवेगळ्या डब्यात बसलेत.. दोघांनाही एकमेकांच्या अस्तीत्वाची जाणीव नव्हती.. तेवढ्यात ट्रेनमध्ये घडाम करून स्फोट झाला.. नव्हतं ते झालं.. अतिरेक्यांनी घडवुन आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत लोकांची जी लिस्ट जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर आणि नमिता यांची नावंही होती.. त्यांचे शव बचाव कार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध दिशेला नेत असताना…

त्यांचा हातांचा स्पर्श जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा, त्याच स्पर्शातील उर्जेने त्यांची शरीरं पुन्हा एकदा थरथरतात.. तेव्हा ते शव नेणाऱ्यांना वाटते की हे जीवंत असावेत.. पण पुर्ण तपासणीअंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यु झालाय… जन्माची सुरुवात त्या एका गोड स्पर्शाने होते, शेवटही अशाच स्पर्शाने होते, मात्र यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते.. खरंच नशीब एखाद्याच्या आयुष्यात काय काय करतं… मित्रांनो नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या creativity वर विश्वास जास्त ठेवावा.. कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव नसते की तुम्ही काय काय करू शकला असता किंवा करू शकता आणि मग नंतर नशीबाला दोष देत बसता…

ही होती एक हृदस्पशी प्रेमकथा (romantic love stories in marathi)

मृत्युनंतरचं प्रेम (Story of love in Marathi)

Story of love in Marathi : तो अजुनहि झोपलाच होता, वर टांगलेल सलाईन वाया निशी हालत होत.. त्यातून टपकनारे थेंब त्याच्या रक्तात भिनत होते.. झोप कसली येत होती त्याला …? उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकानी बघत होता.. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. पण त्याने गप्प राहून नकार दिला, आई गेल्यानंतर त्याने

एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या… घड्याळाच्या टोलानी त्याचे लक्ष वेधले.. सहा वाजले होते, त्याने चटकन चादर बाजूला केली ‘अरे बापरे! क्लास

तर संपून गेला असेल अंगात एवढेही बळ नसताना त्याने

हातातली सुई खेचून काढली..

भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला.. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत.. भर पावसात तो सायकल घेवून क्लासकडे गेला.. क्लास तर केव्हाच संपून गेला होता.. बहुतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर – भूर चालूच होती… ती आजून हि क्लासच्या बाहेरत्याची वाट पाहत उभीच होती.. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले.. तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, “तू आजारी असताना इथं का आलास.? आणि पून्हा छञी विसरलास, बापरे! किती पाणी ” त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, “पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशिल…….

अरे.! किती बडबड करते मी.? जाऊ दे बरं, डॉक्टर काय पायरीवर जाऊन बसले.. तो अजूनही काकडत होता.. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेलं मन स्वतःची खोलवर रुजलेली प्रतिमा शोधत होती..

म्हणाले तब्येत कशी आहे.? दोघेही क्लासच्या बाहेर

तिचे निरागस डोळे मात्र सदैव त्याच्याच चिंतेत बुडालेले

दिसत होते.. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची, त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती..

त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच,

“बाप रे! किती भयंकर ताप आलाय तूला.! अन, तरी तू

एवढ्या पावसात मला भेटायला आला.?

तूला काही झालं म्हणजे.? नाही मीच वेडी आहे.. मीच थांबते ना.! आता मी थांबणारच नाही, तू बघच मी, थांबतच नाही! असं दृष्टलागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं, बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला.. तिने त्याला न बोलण्याची विनंती केली.. त्याचा हात आपल्या हातात घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले..

ती यावेळी माञ चिडलीच, ” तू हे काय केलंस.? तू सलाईन काढले ना.? का स्वता: ला त्रास करून घेतोस.? तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात, जा.! मी बोलणारच नाही.. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि

माझे जीवन……….

त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.. पुढचे शब्द काळजाला चिरणारे होते.. त्याच्या डोळ्यातून थेंब ओघळला.. तिच्या

निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी, तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करून टाकले..तिच्याहि

डोळ्यांतून पाणी टपकत होते, “खरच, इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर…? मग का असा त्रास देतोय.? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावंल.. तुझ तुझ्या प्रेमाचं, मी सुध्दा इतकी वेडी आहे ना.. मी थांबते म्हणून तर तू येतोस.. दोघेपण अगदी वेडे आहोत.. तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.. तिचे डोके थापटत, तो मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता..

तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किणकिण आणि तिचा आवाज कानी येत होता.. तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, “काय रे.? केव्हाचा आवाज देतोय काय करतोय इथं एकटा.? एवढ्या पावसात का बसलाय.? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन ” सरांच्या आवाजाने तो भानावर आला.. त्याने मान डोलवली.. सर आत निघून गेले..
भरलेल्या डोळ्यांनी किंचित मागे वळून पाहिले.. क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हुशार

विद्यार्थीनी होती..!

सर्व काही दृष्ट लागल्या प्रमाने घडून गेलं होत.. स्वप्नाहूनह

सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्या बरोबर

घेऊन गेला होता..

फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिंता

दिसून येत होती.. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला.? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं.? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे.? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे.. त्याचे मन मात्र एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावली मागेच पळत

होतं, ते हे मानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता

संपलय म्हणून..

असे सावल्यांचे खेळ आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते.. हृदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणाक्षणाला बाहेर पडत होत्या.. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंत: करनाने तो सायकल जवळ गेला.. काकडत-काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता चालता बेशुध्द होऊन पडला… हे सर्व प्रेम होत कि वेड.! मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते.. का कुणीतरी इतकही प्रेम करु शकत.? हे असं कसं प्रेम होत जे मृत्यूनंतर सुद्धा जिंवत होत.? खरचं त्याच्या वेडे पणाला

बनून गेले होते.. हृदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी

मृत्यूच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या..

या अगोदर तो खुप चांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या

चेहऱ्यावर आनंद असायचा, पन त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पाहीलेच नाही..

आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय.. सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे.. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता..त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती.. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत असावा म्हणुन देवालाही हेवा वाटला आणि…….

जे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे का घडतं नेहमी असं का घडतं..? मराठी प्रेम कथा (Love story in marathi)

एक स्वप्नप्रेम (romantic love stories in marathi)

romantic love stories in marathi : आज खुपच गर्दी होती बस स्टॉपवर खुपच मोठी लाईन लागली होती सर्वजन busची वाट पहात होते.. तेवढ्यात त्याचा थोडा धक्का लागला तिला, ती चिडली आणि रागाने ओरडली का रे दिसत नाही का तुला का डोळे फुटले तुझे.? तो सॉरी म्हणाला तिला, पण हिची बडबड काही केल्या थांबेनाच मग तोही चिडला आणि म्हणाला, इतका कसला माज आहे गं तुला. ? मग आहेच मुळी गर्व मला आहेच मी इतकी सुंदर… एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर.. असं बोलुन तिनं तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता..

तो- तुझ्यासारख्या छप्पन पोरी मी म्हटलं तर उभ्या करू शकतो पण माझा तो मुळ स्वभाव नाही म्हणुन गप्प आहे..

ती तर तर…. आला मोठा दीडशहाणा मी सर्वांपेक्षा वेगळी आहे मला पटवणं इतकं सोप्प नाहीये..

तो- असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज आजपासुन बरोबर पंधरा दिवसांच्या आत तु मला i love you म्हणशील आणि तेही ईथेच आजपासुन बरोबर पंधराव्या दिवशी.. हा माझा विश्वास आहे. असं म्हणुन तो तिथुन टॅक्सीने निघुन गेला ती मनातल्या म्हणत होती की मी काही केल्या याला i love you कशी आणि का म्हणेन, छे छे वेडा आहे हा…

कॉलेज मध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहुन नाकं मुरडली दोघांचं एकाच वर्गात ॲडमिशन झालं होतं त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसु लागले होते, त्याला पाहील्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहुन राहुन वाईट वाटत होतं म्हणुन तिनं ठरवलं कि त्याला sorry म्हणावं मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याचा शोधु लागली पण तो काही दिसला नाही..

कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला म्हणुन तिने त्याला शोधणं बंद केलं आणि canteen च्या दिशेने ती चालु लागली canteenमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे coffee घेताना दिसला.. मग ती त्याच्या टेबलवर जाऊन बसली.. त्याला थोडं आश्चर्यच वाटलं पण तो शांतपणे coffee घेत राहीला ती – i m srry.. तो थोडा दचकलाच पण तिने आणखी एकदा im srry म्हटलं.. तो- wht about?

ती- bus stop वर जे झालं त्याबद्दल,

at- its ok yar i 4give u….coffee..

ती- no tnx मला खरंच तु माफ केलंस ना.. मि थोडं जास्तच ‘तु बोलले त्यावेळी, इतकं बोलायला नको होतं मी (हात पुढे करून ) friends…. (त्यानेही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली ) तो दिवस, बस स्टॉपनंतरचा नंतरचा तिसराच दिवस होता त्यानंतर ते क्लासमधे ते पुन्हापुन्हा भेटु लागले एकाच बेंचवर बसु लागले, दिवसागणिक त्यांची मैत्री वाढु लागली होती.. एकमेकांच्या notebook exchange करणं हे तर त्यांचं घरी येण्याजाण्याचं एक कारणच बनलं होतं.. त्याचा स्वभाव इतका छान होता की कोणालाही तो आवडावा.. समोरच्याला समजुन घेऊन त्याच्याशी वागणं त्याला मदत करणं, अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं हा त्याचा स्वभावच होता.. दिसायलाही तो बरा होता..

त्या दोघांना भेटुन एक आठवडाच झाला होता की एकमेकांना ते खुपच आवडु लागले होते, दिवसानंतर दिवस गेले.. आज त्याच्या पहील्या भेटीनंतरचा चौदाव्या दिवसाची रात्र आहे ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती.. ती मनातच म्हणत होती (कधी कळणार रे तुला माझ्या भावना ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणतीये ते ऐकना, माझ्या मनातल्या भावना तुला का कळेनात) रात्रभर असेच विचार राहुन राहुन तिला सतावत होते, मग ती झोपी गेली.. दुसरा दिवस ऊजाडला तिने ठरवलं होतं की काही केल्या त्याला prapose करायचं, आणखी किती दिवस त्याच्यासाठि झुरायचं.. तिने घड्याळाकडे पाहीलं, सकाळचे नऊ वाजले होते..

घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली आज सव्वीस तारीख होती.. तशीच ती sac घेऊन बसस्टॉपकडे निघाली.. थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं कि आज बसस्टॉपवरच्या पहिल्या भेटी नंतरचा बरोबर पंधरावा दिवस होता..

तिला धक्काच बसला कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं ज्यानुसार खरंच पंधराव्या दिवशीच ती त्याला i love u म्हणणार होती.. bus मध्ये बसुन ती कॉलेजला निघाली कॉलेज पर्यंत जाईपर्यंत तिने निर्णय घेतला कि काही केल्या आज त्याला i love u म्हणायचं नाही, कारण त्याने माझा igo hurt होऊ शकतो.. गाडी कॉलेजवरच्या बसस्टॉपवर थांबली, तो तिथेच हातात गुलाबाचं फुल घेऊन उभा होता, ति गाडीतुन उतरली..

ती- हे फुल कोणासाठी?….

तो- आहे कोणासाठी तरी….

ती- मला नाही सांगणार…

तो- ते एक गुपित आहे ते मी तुला उद्या सांगेन plz आता पुन्हा

विचारु नकोस….

ती- ठीक आहे चल…

तो- कुठे….? ती- अरे क्लासमध्ये आणि कुठे..

तो- आज मी नाही येणार आज माझं थोडं काम आहे तु जा

कॉलेजला..

ती- अरे कसलं काम, काय बोलतोयस तु.. चल ना classमध्ये

जाऊया..

तो- अगं PLZ मला insist करु नको तु जा..

ती- अरे पण..

तो- जा म्हटलं ना..

ती- जाते जाते चिढतो कशाला एवढा.. असं म्हणुन ती वर्गात गेली, वर्गात तिचं मन लागत नव्हतं, तिला कळुन चुकलं होतं कि ते तो फुल माझ्यासाठीच घेऊन उभा होता या आशेवर की मी ते फुल माझ्या हाताने हक्काने घेईन त्याच्यकडुन आणि त्याला i love u म्हणेन.. तसं करावं असं खुप वाटत होतं तिला, पण राहुन राहून तिचा igo आड येत होता आणि ते दिलेलं चॅलेंज तिला सारखं आठवंत होतं..

class सुटला ती कॉलेजच्या बस स्टोपकडे वळली तो तिथेच उभा होता त्याच्या हातातलं ते फुल सुकलं होतं पण तो अजुन तसाच हसतमुख वाटत होता तिला वाटत होतं की तो तेथुन गेला असेल पण त्याला स्टॉपवर बघुन ती स्तब्ध झाली..

दोघांनी एकमेकांकडे पाहीलं तेवढ्यात बस आली ती गोंधळातहोती तिला काही सुचत नव्हते बस आल्यावर ती बसमध्ये जाऊनबसली.. राहुन राहुन खिडकीतुन ती त्याला आणि तो तिलापाहत होता.. घरात पोहोचल्यावर ती खोल विचारात गेली होती,वारंवार त्याचे विचार त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होताअशातच रात्र झाली, खरंच हा इतकं प्रेम माझ्यावर करतो, काकरतो माझ्यावर प्रेम इतकं.? अशा काही अनुत्तरीत प्रश्नांच्याविचारातच ती झोपी गेली. ?

आज एक नवीन दिवस उजाडला, ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खुपच आतुरतेने वाट पाहत होती.. सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर आली..आरशात बघुन स्वतःशीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तु माझ्यावर, खुपच त्रास दिला ना मी तुला plz माफ कर मला.. मनातल्या मनात ती थोडी खुश होती कारण तो चेलेंज हरला होता..किती गर्वाने बोलला होता तो मला असा ती विचार करत हो.. तीने आज ठरवलं कि आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन..

ती खुपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पाहत होती.. नऊ वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली, आज आनंदाने एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती, एक वेगळंच हसु तिच्या ओठाची शोभा वाढवत होती बसस्टॉप येण्याची खुपच अधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं. तीने i love u म्हणायची practice ही केली होती..

जसजसा बसस्टॉब जवळ येऊ लागला होता तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.. मघाची अधीरता आता भीतीमध्ये रुपांतरीत झाली होती.. कॉलेजचा बसस्टॉप आला ती बसमधुन उतरली.. तशीच तिथे जाऊन ती गुलाबाचं फुल घेऊन उभी राहीली जिथे काल तो उभा होता..

एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघु लागली.. थोड्या वेळाने तोही आला.. आज त्याची sac थोडी जास्तच जड दिसत होती.. तो तिच्याजवळ आला (त्याने तिच्या हातातलं ते गुलाबाचं फुल पाहीलं नव्हतं) आणि म्हणाला मला माफ कर मी चेलेंज हरलो तुला पंधरा दिवसांच्या आत मिळवण्याचं.. (ती मनातल्या मनात हसत होती) पहील्यांदा एक चॅलेंज म्हणुन घेतलं होतं मी याला पण, नंतर नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो.. मग ठरवलं कि तुला मनातलं सगळं सांगावं, आणि मला वाटलं की मी या पंधरा दिवसांत पुर्णपणे ओळखलंय तुला, मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तुही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं होतं की आणि म्हणुन मी काल ते फुल घेऊन तुझ्यासाठीच ऊभा होतो.. ना की माझं चॅलेंज पुर्ण करण्यासाठी..

तु येशील आणि ते फुल हक्काने माझ्याकडुन मागुत घेशील, तु आलीस फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्याच सांगण्याने गेलीस मला वाटलं होतं तु माझ्या मनातलं ओळखशील.. चॅलेंजबद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं, मी आज पुण्याला जातोय तिथंच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय तुला शेवटचं भेटुन जावं.. असं मला वाटलं म्हणुन मी तुला भेटायला आलोय.. मी निघतो…. अरे थांब वेड्या मलाही तुला काही सांगायचं आहे, तु मला कॉलेजच्या दुसर्या दिवसापासुन आवडु लागला होतास पण मी तुला सांगु शकले नव्हते, आणि ज्या दिवशी खरंच सांगावसं वाटलं त्या दिवशी माझा igo आड आला…

हे फुल मी तुझ्यासाठीच आणलंय तिने हात पुढे करून त्याला i love u म्हणलं.. तो ते फुल हात पुढे करुन स्वीकारणार तेवढ्यात, एक मोठी वार्याची झुळुक आली अन ती भावावर आली.. मी त्या बसस्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडीकल स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा आहे मी रामचंद्र काकांना (मेडीकल स्टोअरचे मालक) विचारलं होतं की,

काका मी इथे कामाला लागल्यापासुन बघतोय की, ती मुलगी दररोज त्या बसस्टॉपवर एक गुलाबाचं फुल घेऊन बरोबर 10 ते5 या वेळेत का उभी असते.? याच्या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत होते.. इथपर्यंत तिची प्रेमकहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेमकहाणीबद्दल असणारी रुची खुपच वाढली होती..

एकदा मी त्या मुलगीकडे एका नजरेनं पाहीलं आणि पुन्हा रामचंद्र काकांना उत्सुकतेपोटी विचारलं मग त्या मुलाने तिचं प्रेम स्वीकारलं का सांगा ना, सांगा ना काका सांगा ना मी खुपच अधीर झालो होतो ते म्हणाले.. अरे थांब सांगतो काका सांगु लागले..

तोही ते फुल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढ्यात एक अकल्पित घडलं क्षणार्धात तो तिच्यापासुन खुप लांब जावुन पडला होता, कारण एका भरधाव येणार्या 4 व्हीलरने त्याला उडवलं होतं.. ती हात पुढे करून तशीच उभी होती, तिच्या डोळ्यातला एक अश्रु पावसाचं थेंब जसं आळवाच्या प घरंगळतो तसा तिच्या गालावर घरंगळत होता, क्षणार्धात त्याचा मृत्यु झाला होता.

त्याला मरुत पाच वर्षे झालीत पण, तेव्हापासुन आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत 10 ते 5 ईथे उभी असते फक्त याच आशेवर की तो येईल आणि ती हे फुल त्याला देऊन त्याला i love u म्हणेन, आणि तो तिला घेऊन जाईल.. त्या मुलीची कहानी ऐकुन माझी आसवं दाटली होती, मनात खुपच प्रश्न उभे होते की, खरंच एवढं प्रेम कोणी करु शकतं

का.?

मी अश्रु पुसले आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकांना विचारलं हे सर्व तुम्हाला कसं माहीत.? तेवढ्यात माझं लक्ष गेलं की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपर्याला येउन थडकला.. त्याने तिच्या हातातलं ते फुल रस्त्यावर जाऊन पडलं होतं..

ते फुल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने उडवलं… ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहात होतो.. रामचंद्र काकांनी ते पाहाताच दुकानाच्या काऊंटरवरुन उडी मारुन तिच्याकडे धावले, मीही त्याच दिशेने धावत गेलो, ते त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेले मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडु लागले,

मी काही वेळ स्तब्ध झाली होती, ते म्हणत होते, मुली तुझ्या या अभागी बापाला माफ कर तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही.. पण, तुही कुठे माझं ऐकत होतीस तुही फक्त तुझ्याच मनाचं करत होतीस, कसला वेडेपणा केलीस गं तु.. त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला मिळाली होती..

तेच त्या मुलीचे आभागी बाप होते..

जर त्या मुलगीने त्या फक्त त्या एका दिवशी आपला अहंकार बाजुला ठेवून त्या वाट पाहणाऱ्या आपल्या प्रियकराला I LOVE YOU हे तीन शब्द म्हटले असते तर, कदाचित तो मेला नसता.. कदाचित तिला त्याच्यासाठी पाच वर्षे अश्रु ढाळत त्या स्टॉपवर वाठ पाहावी लागली नसती.. कदाचित तिचा मृत्युही झाला नसता.. आणि कदाचित त्या तिच्या बापाने तिला गमावलं नसतं..

म्हणुनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो.. असा एक दिवस प्रत्येक प्रेमीविरांच्या आयुष्यात येतो त्याला हातचं जाऊ देऊ नका कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल… एक स्वप्नप्रेम (romantic love stories in marathi)

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 5 मराठी प्रेम कथा (Love story in marathi) पाहिल्या. हृदस्पशी प्रेमकथा (romantic love stories in marathi) तुम्हाला कश्या वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

जर तुमच्याकडे सुद्धा मराठी प्रेम कथा (Love story in marathi) असतील तर त्या आमच्या पर्यंत नक्की पोहचवा. त्या कथा आम्ही या ब्लॉग वर नक्कीच समाविष्ट करू.

2 thoughts on “5 मराठी प्रेम कथा | Love story in marathi

  1. खरंच खूपच छान कथा आहेत,
    डोळ्यातून नक्कीच पाणी वाहू लागले, माझं प्रेम मला आठवलं. मी ही तिच्यावर आणि तीही माझ्यावर असच प्रेम करते.
    I love you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *