कीबोर्ड म्हणजे काय | Keyboard information in marathi

Keyboard information in marathi : मित्रांनो तुम्ही जरूर कीबोर्डचा (Keybord)  वापर केला असेल, कारण जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप चा वापर केला असेल तर टायपिंग करण्यासाठी कीबोर्डचा नक्कीच वापर केला असेल. परंतु आपल्यातील अनेक लोकांना कीबोर्ड बद्दल संपूर्ण माहिती नसते.  कॉम्प्युटर कीबोर्ड चा वापर आपण डाटा एंट्री करण्यासाठी करतो. याबरोबरच याच्या मदतीने आपण टायपिंग सुद्धा करू शकतो.  तर आजच्या या पोस्टमध्ये आपण कीबोर्ड म्हणजे काय (Keyboard information in marathi),कीबोर्डचे वेगळे प्रकार कोणते आहेत, कीबोर्डच्या किजचे प्रकार काय आहेत याची माहिती पाहणार आहोत. 

Keyboard information in marathi
कीबोर्ड म्हणजे काय (Keyboard information in marathi)

कीबोर्ड म्हणजे काय (Keyboard information in marathi)

कीबोर्ड एक इनपुट डिवाइस (Input Device) आहे.  याचा वापर मुख्यकरून कॉम्प्युटरला कमांड (Command), टेक्स्ट (Text), न्यूमेरिकल डाटा (Numerical Data) आणि दुसऱ्या प्रकारचा डाटा टाईप करण्यासाठी केला जातो. एक युजर कॉम्प्युटर बरोबर संवाद साधण्यासाठी कीबोर्ड आणि माउस चा वापर करतो. त्यानंतर आपण एंटर केलेला डाटा मशीन लैंग्वेज (Machine Language) मध्ये बदलला जातो.  ज्याच्यामुळे सीपीयू डाटा आणि सूचना (Instructions) समजू शकतो की हा डाटा इनपुट डिवाइस पासून आला आहे. आता आपण कीबोर्ड म्हणजे काय (What is keyboard in marathi) जाणून घेतले.

कीबोर्डला कॉम्प्युटर बरोबर कसा जोडला जातं (How to connect a keyboard to a computer)

पूर्वी कीबोर्ड ला कॉम्प्युटर बरोबर जोडण्यासाठी PS/2 या सीरियल कनेक्टरचा (Serial Connector) वापर केला जात होता. परंतु आता कीबोर्डला जोडण्यासाठी यूएसबी (USB – Universal Serial Bus) आणि वायरलेस कनेक्टरचा (Wireless Connector) वापर केला जातो.  कॉम्प्युटरला कीबोर्ड जोडणे खूप सोपे असते. परंतु  वायरलेस कीबोर्डचा (Wireless Keyboard) एक तोटा आहे की त्याची बॅटरी वारंवार बदलावी लागते.

कीबोर्डचे प्रकार (Types of Keyboard in marathi)

बाजारामध्ये वेगळ्या प्रकारची किबोर्ड लेआऊट उपलब्ध आहेत. ज्यांना देश आणि भाषा यांच्यानुसार बनवले जाते.  आज आपण याच प्रकाराबद्दल थोडसं जाणून घेऊया.
1) QWERTY KEYBOARD
2) AZERTY KEYBOARD
3) DVORAK KEYBOARD

1) QWERTY KEYBOARD

या कीबोर्डच्या लेआऊटला जगभर सर्वात जास्त वापरल जातं. याला पहिल्या सहा अक्षरापासून ओळखल जातं.  ही सहा अक्षरे पहिल्या ओळीमध्ये दिसतात.  या कीबोर्डचा सर्व देशांमध्ये वापर केला जातो. खूप लोकांना असं वाटतं की हा एकच प्रकारचा कीबोर्ड आहे.  सध्याच्या काळात हा कीबोर्ड सर्वात जास्त वापरला जातो.

2) AZERTY KEYBOARD

या कीबोर्ड ला फ्रान्सने तयार केलं आहे या कीबोर्डला स्टॅंडर्ड फ्रेंच कीबोर्ड (Standard French Keyboard) असेसुद्धा म्हटले जाते.

3) DVORAK KEYBOARD

या लेआऊटला बोटांची हालचाल कमी करण्यासाठी बनवल गेल आहे. QWERTY आणि AZERTY च्या तुलनेमध्ये या कीबोर्ड लेआउट मध्ये फास्ट टायपिंग (Fast Typing) करता येतं.

कीबोर्ड च्या कीजचे प्रकार (Types of Keyboard Keys in Marathi)

आता आपण कीबोर्डवर स्तीथ असलेल्या वेगवेगळ्या कीज् बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.  एका सामान्य कीबोर्ड मध्ये कीज् च्या आधारावर सहा विभागात वर्गीकरण केले गेले आहे.

1) फंक्शन कीज् (Function Keys)
2) टायपिंग कीज् (Typing Keys)
3) कंट्रोल कीज् (Control Keys)
4) नेव्हिगेशन कीज् (Navigation Keys)
5) इंडिकेशन कीज् (Indication Keys)
6) न्यूमेरीक कीपॅड (Numeric Keypad)

1) फंक्शन कीज् (Function Keys)

फंक्शन कीज् कीबोर्ड वरती सर्वात वर असतात. यांना कीबोर्ड वर F1 पासून F 12 पर्यंत लिहिलं जातं. फंक्शन कीज् चा उपयोग कोणतंही विशेष कार्य करण्यासाठी केला जातो. याचा प्रत्येक प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोग केला जातो. ॲपल डेस्कटॉप कॉम्प्युटर कीबोर्ड मध्ये एकोणीस किज असतात F 1 पासून ते F19 पर्यंत.

2) टायपिंग कीज् (Typing Keys):

सर्वात जास्त वापर याच कीजचा केला जातो. टायपिंग किज मध्ये अल्फाबेटिकल (Alphabetical) आणि नंबर या दोघांचाही समावेश होतो, यांना सामुहिकपणे अल्फान्यूमेरिक कीज् असं म्हटलं जातं.  टायपिंग कीज् मध्ये सर्व प्रकारचे सिम्बॉल्स आणि सर्व प्रकारचे मार्क्स सुद्धा सामील असतात.  कीबोर्ड वरती 23 अल्फाबेटीक कीज (Alphabetic Keys) आणि 40 सिम्बॉल (Symbols) असतात.

3) कंट्रोल कीज् (Control Keys)

या की चा स्वतंत्र किंवा अन्य कोणत्याही हीच बरोबर निश्चित कार्य करण्यासाठी वापर केला जातो एका सामान्य कीबोर्ड मध्ये Ctrl key, Alt key, Window key, Esc key यांचा कंट्रोल किज म्हणून वापर केला जातो. याशिवाय Menu key, Scroll key, Pause break key, Prtscr key आदी कीज् सुद्धा कंट्रोल कीज् मध्ये सामील होतात.

4) नेव्हिगेशन कीज् (Navigation Keys)

नेव्हिगेशन कीज् मध्ये Arrow keys, Home, End, Insert, Page up, Page down, Delete इत्यादी किज असतात. यांचा वापर कोणत्याही डॉक्युमेंट, वेबपेज यामध्ये इकडे तिकडे जाण्यासाठी होतो.

5) इंडिकेशन कीज् (Indication Keys)

कीबोर्ड वर तीन प्रकारच्या इंडिकेटर लाईट असतात. Num lock, Scroll lock आणि Caps lock. जेव्हा कीबोर्डवर पहिली लाईट चालू असते तेव्हा त्याचा अर्थ आहे की न्यूमेरीक कीपॅड चालू आहे.  आणि जर ती बंद असेल तर याचा अर्थ न्यूमेरीक कीपॅड बंद आहे असा होतो.  दुसरी लाईट अक्षरांमध्ये Upper Case आणि Lower Case विषयी सांगते आणि तिसरी आपल्याला Scrolling बद्दल सांगते.

6) न्यूमेरीक कीपॅड (Numeric Keypad)

यांना आपण Calculator Keys सुद्धा म्हणू शकतो. कारण न्यूमेरीक कीपॅड वर जवळजवळ कॅल्क्युलेटर प्रमाणेच किज असतात.  यांचा उपयोग नंबर लिहिण्यासाठी केला जातो.

आता आपण कीबोर्ड म्हणजे काय (Keyboard information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

संगणकाच्या की-बोर्ड वर एकूण किती टॉगल कीज् असतात (How many toggle keys on keyboard)

चार, Caps Lock, Insert, Scroll Lock, Num Lock.

कीबोर्ड ला किती बटणे असतात

104

कीबोर्ड चे प्रकार

वायरलेस कीबोर्ड (Wireless Keyboard)
लवचिक कीबोर्ड (Flexible Keyboard)
व्हर्च्युअल कीबोर्ड (Virtual Keyboard)
एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Keyboard)
प्रोजेक्शन कीबोर्ड (Projection Keyboard)

कीबोर्ड ला मराठीत काय म्हणतात

कळफलक

टॉगल कीज् म्हणजे काय?

ह्या एक प्रकारच्या कीबोर्ड वरील किज आहेत. ज्या दृष्टीदोष किंवा संज्ञानात्मक अक्षमता असलेल्या लोकांसाठी डिझाइन केलेल्या आहेत. यामध्ये चार की चा समावेश होतो.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कीबोर्ड म्हणजे काय (Keyboard information in marathi) जाणून घेतली. कीबोर्ड म्हणजे काय, कीबोर्ड चे वेगवेगळे प्रकार, कीबोर्ड माहिती मराठी (Keyboard chi mahiti Marathi) यांची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. Keyboard in marathi ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *