सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली | Who founded the Satyashodhak Samaj

Who founded the Satyashodhak Samaj : एखाद्या जोडप्यानं ‘सत्याशोधक’ पद्धतीनं लग्न केल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, हे ‘सत्यशोधक’ म्हणजे नेमकं काय आहे. भारताच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाची घटना मानल्या गेलेल्या ‘सत्याशोधक समाजा’बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली (Who founded the Satyashodhak Samaj) याविषयी माहिती जाणून घेऊयात.

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली (Who founded the Satyashodhak Samaj)

Contents

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली (Who founded the Satyashodhak Samaj)

समाजसत्यशोधक समाज
स्थापना 24 सप्टेंबर 1873
संशापक महात्मा फुले
साप्ताहिकदीनबंधू
सत्यशोधक समाज माहिती मराठी (Satyashodhak Samaj information in marathi)

24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.

महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला. ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटले यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली.

ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी त्यामध्ये मध्यस्थाची अथवा बट भिक्षूची आवश्यकता नाही याचं प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केलं त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते याचं स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिलं.

पाप-पुण्य स्वर्ग-नरक पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही, तर सत्य हेच परब्रम्ह आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे. मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.

सत्यशोधक समाजातर्फे ‘दीनबंधू’ नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. या वृत्तपत्राचे संपादक ‘कृष्णराव भालेराव’ हे होते, त्यांनी इ.स 1 जानेवारी 1877 मध्ये पुणे येथे स्थापन केले होते, हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते. लोकशिक्षण व लोकजागृती प्रभावी माध्यम म्हणून दिनबंधुचा उल्लेख करावा लागतो.

  • ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते.
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
  • समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
  • सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते. इ.स 1890 मध्ये यांनी दिनबंधु या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई येथून केले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली.

महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली?

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती केली.

सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण?

सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार जोतिबा फुले हेच होते.

सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली?

सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे झाली होती.

सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ कोणता मानला जातो?

सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.

सत्यशोधक समाजाने कोणते साप्ताहिक सुरू केले होते?

सत्यशोधक समाजाने दीनबंधू साप्ताहिक सुरू केले होते.

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आहे.

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती.

महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली?

महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये केली.

सत्यशोधक समाजाच्या कोणत्या परिषदेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अध्यक्ष होत्या?

इ. स. 1893 मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अध्यक्ष होत्या.

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे.

महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे.

महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी स्थापन केली?

महात्मा जोतिबा फुले यांनी 3 जुलै 1851 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.

महात्मा फुले यांच्यावर कोणत्या विचारवंतांचा प्रभाव होता?

महात्मा फुले यांच्यावर थाँमस पेन विचारवंतांचा प्रभाव होता.

महात्मा फुले यांनी कोणते नाटक लिहिले?

महात्मा फुले यांच्या जीवनावर ‘असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे कोणते पुस्तक लिहिले?

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे शेतकऱ्यांचे आसूड पुस्तक लिहिले.

आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?

पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आहे.

आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता?

ऋग्वेद हा आर्यांचा आद्य ग्रंथ आहे.

सत्यशोधक समाजाची पहिली परिषद कोठे झाली?

17 एप्रिल 1911 रोजी सत्यशोधक समाजाची पहिली परिषद झाली?

महात्मा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता?

‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.

महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

रावबहाद्दर वड्डेदार यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती.

सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते?

‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली (Who founded the Satyashodhak Samaj) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *