Peru information in marathi : पेरू हा एक दक्षिण अमेरिका खंडामध्ये स्थित देश आहे. ज्याची अधिकृत राजधानी लिमा आहे आणि या देशाचे अधिकृत नाव पेरू गणराज्य आहे. पेरू हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने चार लाख 96 हजार 224 चौरस किलोमीटर मध्ये बसलेला आहे. जो की नेदरलॅंड देशापेक्षा तीस पटीने मोठा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पेरू देशाची माहिती (Peru information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
पेरू देशाची माहिती (Peru information in marathi)
देश | पेरु |
राजधानी | लिमा |
सर्वात मोठे शहर | लिमा |
अधिकृत भाषा | स्पॅनिश |
लोकसंख्या | 3.3 कोटी (2020) |
क्षेत्रफळ | 12.85 लाख चौकीमी |
राष्ट्रीय चलन | नुएव्हो सोल (PEN |
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +51 |
1) पेरू हा देश 28 जुलै 1821 मध्ये स्पेनच्या गुलामीतून मुक्त होऊन एक स्वतंत्र देश बनला आहे.
2) पेरू या देशाची सीमा उत्तरेला एक्वाडोर आणि कोलंबिया पासून पूर्वेला ब्राझील दक्षिण पूर्वेला बोलिव्हिया आणि दक्षिणेला चिली यांना लागते. याबरोबरच या देशाच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर सुद्धा आहे.
3) पेरू देशाची साठ टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ईसाई धर्माचे पालन करते. या देशाची अधिकृत भाषा स्पॅनिश, आयमारा आणि क्वेसुका आहे.
4) पेरू या देशाचा 60 टक्केपेक्षा जास्त भाग ॲमेझॉन जंगलाने व्यापलेला आहे.
5) पेरू या देशामध्ये वेश्यावृत्ति ला कायद्याने मान्यता दिली गेली आहे.
6) पेरू हा देश सोने उत्पादनामध्ये जगामध्ये सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे.
7) पेरू देशामध्ये सरकारने कैद्यांसाठी 1973 पासून जीवनामध्ये मिरची खायला देण्यास मनाई केली आहे. या पाठीमागील कारण आहे की सरकारला वाटते की मिरची खाल्ल्यामुळे कैद्यांमध्ये येऊन यौन उत्तेजना वाढते.
8) पेरू हा जपान देशा नंतरचा चा एकमेव असा देश आहे जेथे डॉल्फिन माशाचे मांस खाल्ले जाते.
9) पेरू या देशाची अधिकृत मुद्रा न्यूवो सोल आहे.
10) पेरू या देशाच्या परंपरा सुद्धा खूप वेगळ्या आहेत. येथील लोक नवीन वर्षामध्ये आपल्या मित्रांना आणि पाहुण्यांना पिवळ्या रंगाची अंडर वेअर गिफ्ट देतात.
पेरू देश माहिती मराठी (Peru desh mahiti marathi)
11) पेरू या देशामध्ये लग्नाअगोदर मुलगा आणि मुलगी एक दुसऱ्याबरोबर काही दिवस पती-पत्नी याप्रमाणे राहू शकतात.
12) पेरू या देशांमध्ये तीन हजार पेक्षा अधिक प्रकारचे बटाटे आढळतात.
13) पेरू हा देश पूर्ण जगामध्ये माशांच्या प्रजाती साठी प्रसिद्ध आहे. या देशामध्ये पाच हजारपेक्षा अधिक प्रजातीचे मासे आढळतात. याबरोबरच येथे 25 हजार पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती सुद्धा आढळतात.
14) पेरू हा देश पूर्ण जगामध्ये कॉफी चा आठवा आणि अरेबिका सोयाबीन चा पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
15) पेरू या देशामध्ये 1964 मध्ये पेरू आणि अर्जंटेनिया यांच्यामध्ये एक फुटबॉल मॅच झाली होती. यामध्ये रेफरी च्या एका चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या वादात येथे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. आणि 500 लोक घायाळ झाले होते.
16) पेरू या देशाच्या राजधानीला म्हणजेच लिमा या शहराला दक्षिण अमेरिकेची खाद्य राजधानी म्हणून सुद्धा ओळखतात.
17) पेरू या देशातील एंडीज पर्वत रांग हिमालया नंतर जगातील दुसरी सर्वात उंच पर्वत रांग आहे.
18) सन 1600 पेरू देशांमध्ये झालेले एका ज्वालामुखीच्या स्फोटाने जवळजवळ वीस लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
19) पेरू हा देश जगातील सर्वात मोठा कोकिन उत्पादक देश आहे.
20) ॲमेझॉन जगातील सर्वात लांब नदी आहे आणि या नदीची सुरुवात पेरू या देशांमधून होते.
पेरू देशाविषयी काही रोचक तथ्य (Facts about Peru in marathi)
21) सिनकोना हा पेरू या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे.
22) पेरू हा एक खूप जुना देश आहे. सर्वात जुने रहिवाशी येथे पंधरा हजार वर्षापूर्वी आले होते असा येथील लोकांचा समज आहे.
23) ब्राझील आणि अर्जेंटिना नंतर पेरू हा दक्षिण अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा देश आहे.
24) पेरू या देशांमधील 94 टक्के पेक्षा जास्त लोक साक्षर आहेत.
25) 28 जुलै हा पेरू या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे.
26) विकुना हा पेरूचा राष्ट्रीय प्राणी आहे.
27) पेरूमध्ये पक्ष्यांच्या 1700 पेक्षा जास्त प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 500 पेक्षा जास्त प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. 500 सस्तन प्राण्यांपैकी 100 प्रजाती धोक्यात आहेत.
28) पेरू देशाच्या अन्नामध्ये बटाटे, टोमॅटो, कॉर्न आणि शेंगा यांचा समावेश होतो.
29) पेरू देशाच्या नैसर्गिक संसाधनांमध्ये पेट्रोलियम, सोने, चांदी, तांबे, लोह धातू, दुर्मिळ पृथ्वी धातू आणि जलविद्युत यांचा समावेश होतो.
30) पेरूच्या मुख्य निर्यातींमध्ये तांबे, शिसे, लोखंड, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कॉफी, शतावरी आणि मत्स्य उत्पादने आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पेरू देशाची राजधानी कोणती आहे?
लिमा
पेरू देशाची लोकसंख्या किती आहे?
3.3 कोटी (2020)
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पेरू देशाची माहिती (Peru information in marathi) जाणून घेणार आहोत. पेरू देश माहिती मराठी (Peru desh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.