404 Error काय आहे | What is 404 Error in Marathi

What is 404 Error in Marathi : मित्रांनो तुम्हाला गूगल वर काही सर्च करताना कधी 404 Error आला आहे का? जर आला असेल तर तुम्ही कधी विचार केला आहे का हे असं का लिहिलेलं असतं. आणि याचा अर्थ काय असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊ या 404 Error म्हणजे काय (What is 404 Error in Marathi) आणि याचा अर्थ काय आहे.

What is 404 Error in Marathi
404 Error काय आहे (What is 404 Error in Marathi)

404 Error काय आहे (What is 404 Error in Marathi)

जेव्हा आपण इंटरनेट वर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कधीतरी तुम्हाला सुद्धा Error 404 लिहिलेलं नक्कीच पाहायला मिळालं असेल. याचा अर्थ असा असतो की आपण जे काही सर्च करत आहोत त्याचा Address चुकीचा आहे. तो address म्हणजे त्या वेबसाइट चा पत्ता असेल किंवा वेबसाइट च नाव असेल. Error 404 हे दर्शवतो की ज्या गोष्टीसाठी आपण विनंती केली आहे त्याला सर्व्हर शोधू शकत नाही.

जेव्हा आपण आपण काहीतरी शोधत असतो तेव्हा आपला सर्व्हर शी संपर्क होतो. परंतु सर्व्हर त्या गोष्टीला शोधू शकत नाही. अश्या स्थितीत पेजवर Error 404 पाहायला मिळत. असं यामुळे होत की आपण चुकीचा पत्ता टाकला असेल किंवा आणखी कोणत्या कारणामुळे असेल. Error 404 च्या माध्यमातून सर्व्हर आपल्याला ही सूचना देतो की आपण जी गोष्ट शोधत आहात ती उपलब्ध नाही. परंतु काही वेळानंतर किंवा भविष्यात उपलब्ध होईल.

Error 404 चा अर्थ काय आहे (What is the meaning of Error 404 in Marathi)

जेव्हा आपल्याद्वारे सर्च केलेलं webpage सापडत नाही किंवा उपलब्ध नसतं. तेव्हा आपल्याला webpage वर Error 404 लिहिलेल दिसतं. जेव्हा कोणत पेज missing असतं किंवा लिंक ब्रोकन झाली असेल तर server आपल्याला हा मेसेज देतो.

Error 404 चा अर्थ असाही असतो की आपण चुकीचा url टाकला आहे. परंतु असही होऊ शकत की सर्व्हर Active आहे आणि योग्य रस्ता सापडत नाही. मग तुम्ही म्हणाल webpage missing किंवा Not found हा मेसेज का येत नाही. Error 404 यासाठी लिहिलेलं असतं की हा सर्व्हर द्वारे पाठवलेला Error code असतो. वेब सर्व्हर हा code तेव्हाच पाठवतो जेव्हा कोणत webpage सापडत नाही.

वेब सर्वर सर्व प्रकारच्या चुकांसाठी वेगवेगळे code देते. जेव्हा कोणताही Error येतो तेव्हा त्याला ओळखून एक code दर्शवला जातो. Error 404 हा एक सामान्य Error मॅसेज आहे.

निष्कर्ष

तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेलच की Error 404 म्हणजे काय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. दररोज अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *