200 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 200 Intresting facts in marathi

Intresting facts in marathi : मित्रांनो, या जगामध्ये अनेक विचित्र गोष्टी आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेणे सर्वांना आवडते. अश्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण 200 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (200 Intresting facts in marathi) जाणून घेणार आहोत.

200 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (200 Intresting facts in marathi)

1) मधमाशीला 5 डोळे असतात. दोन मोठे डोळे आणि तीन लहान डोळे जे की, मोठ्या डोळ्यांच्या मध्यभागी असतात.

2) यूएन शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्कने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जाहीर केला आहे. यात जगातील 149 आनंदी देशांची यादी आहे. फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरला आहे. तर या यादीत भारत 139 व्या स्थानी आहे. दरम्यान, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये कोरोनाचा लोकांवर झालेला प्रभाव आणि त्यावर लोकांची मानसिकता, देशातील परिस्थिती अशा सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.


3) भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन हा 49 वर्षाचा व्यक्ती आहे. तो इंग्लिश बोलण्यामध्ये पटाईत आहे. तो दररोज मुंबईमध्ये 8 ते 10 तास भिक्षा मागतो आणि महिन्याला 65-80 हजार रुपये कमावतो. त्याच्याकडे 70-70 लाखाचे असे दोन फ्लॅटसुद्धा आहेत.


4) कॅनडा मधील दहा वर्षाचा मुलगा ल्यूक बोल्टन ने सर्वात लांब तुटलेला दुधाचा दात 2.6 सेंटीमीटर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. याला 2019 मध्ये एका डेंटिस्टने काढले होते.


5) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्राम हॅण्डलने जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस 6,962.6 मीटरचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो लांबी मध्ये 63.5 अमेरिकी फुटबॉल मैदानाच्या बरोबर आहे. हा ड्रेस साइप्रसची मारिया पारस्केवा नावाच्या महिलेने घातला होता.


6) युके मधील जेड मर्फी या युवकाने आपला चेहरा इंस्टाग्राम फिल्टर सारखा बनवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी वर 30 लाख रुपये खर्च केले आहेत. अजब आहे दुनिया…


7) पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी म्हणजे कासव. त्याचे वय साधारणतः 150 ते 200 वर्ष असते.


8) तुम्ही जर फार आधीपासून मोबाईल वापरत असाल तर ‘नोकिया 1110’ बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. हा फोन आजपर्यंतचा सर्वात जास्त विकला गेलेला फोन आहे. तब्ब्ल 250 दशलक्ष फोन विकून नोकियाने मोबाईल जगतात एक विक्रम नोंदवलेला आहे.


9) जगभरात सफरचंदाच्या इतक्या प्रजाती आहेत की, रोज जरी एका जातीचे सफरचंद खाल्ले तरी आपल्याला २० वर्ष जातील.


10) जगातील सर्वात प्रसिद्ध वॉलपेपर ‘ब्लिस’ हा चॉर्लस् रिअर यांनी १९९६ साली क्लिक केलेला आहे.

20 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (20 Intresting facts in marathi)


11) हवेत उड्डाण घेताना आपण आपल्या शरीरातील सुमारे 8 टक्के पाणी गमावतो. याचे कारण हवामान-नियंत्रित वातावरणातील आर्द्रता 10 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी असू शकते.


12) संपूर्ण जगात दररोज १२० कोटी मॅगीची पाकिटे खाल्ली जातात, ही माहिती वाचण्यात तुम्ही जितका वेळ दिला आहे, तेवढ्या वेळात सुमारे २००० पाकिटे उघडली गेली आहेत.


13) निरमा पावडरचे निर्माते करसनभाई पटेल हे पूर्वी नौकरीवरून येता – जाता निरमा पावडर विकत. त्यांनी अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या मुलीच्या निरुपमा नावावरून डिटर्जंट पावडरचे नाव निरमा असे ठेवले. 


14) शालेय बसेसचा रंग पिवळा असतो कारण इतर रंगांच्या तुलनेत मानवी डोळ्यांना पिवळा रंग अधिक उठून दिसतो. हा रंग रात्री आणि धुक्यात देखील अगदी सहज दिसून येतो, जो अपघातांपासून बचाव करतो.


15) नेपाळ हा एकमेव देश असा आहे, ज्याचा राष्ट्रीय ध्वज आयताकृती नाही.


16) जगातील सर्वात ठेंगणे लोक हे इंडोनेशियात आहेत. तेथील पुरुषांची उंची सरासरी 1.58 मीटर इतकी आहे. जगातील सर्वाधिक ठेंगणे लोकांचे दुसऱ्या क्रमांकांचे ठिकाण बोलिविया हे आहे. तेथील लोकांची उंची ही 1.6 मीटर इतकी आहे. तर तिसरे ठिकाण फिलीपीन्स हे असून तेथील लोकांची उंची 1.619 मीटर इतकी आहे.


17) एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वात सुशिक्षित देशांच्या यादीत कॅनडा देश पहिल्या क्रमांकावर येतो.


18) वायव्य थायलंडच्या पाडांग जमातीतील स्त्रियांची मान 7.7 इंच लांबींपर्यंत आहे. हे मानवी मानांच्या सरासरीच्या लांबीच्या दुप्पट आहे.


19) सॅमसंग ग्रुप ही दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. दक्षिण कोरियाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी १५ टक्क्यांहून अधिक वाटा एकट्या सॅमसंगचा आहे.


20) Apple कंपनीकडे स्वतःची एक गुप्त पोलिस यंत्रणा आहे, ज्याला वर्ल्ड लॉयल्टी टीम म्हटले जाते, सुनिश्चित करतात की कोणताही कर्मचारी कंपनीची माहिती लीक करणार नाही.

40 Intresting Facts in Marathi

21) आपल्याला झोपेत पडलेले स्वप्न हे आपणास जाग आल्यानंतर 10 मिनिटांच्या आत आपण 90 टक्के स्वप्न विसरून जातो.


22) जगभरात मधमाशांचा एकूण 20 हजार जाती आहे. मात्र त्यापैकी केवळ 4 टक्के मधमाश्या मध बनवू शकतात.


23) पृथ्वीवर सूर्यप्रकाश येण्यासाठी सुमारे 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात.


24) जगातील 90 टक्के शुद्ध पाणी हे एकट्या अंटार्टिकामध्ये आहे.


25) तुर्कीतील प्रसिद्ध “हरी एटक आर्किटेक्चरल डिझाईन स्टुडिओ ने ” कतारमध्ये एक आश्चर्यकारक 5 स्टार फ्लोटिंग हॉटेल डिजाइन केले आहे, जे वीज निर्मितीसाठी समुद्रावर तरंगत आणि फिरत राहणार आहे. हॉटेल सुमारे 35,000 चौरस मीटर क्षेत्रात तयार केले जाईल आणि यात 150 रूम असणार आहेत.


26) टॉम अँड जेरी मालिका 1940 मध्ये विल्यम आणि जोसेफ बारबेरा यांनी बनवली.


27) 2000 साली 25 मार्चला संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते. 


28) जपानमधील लोक सही ऐवजी स्वतःच्या स्टॅम्पचा सही म्हणून वापर करतात. या स्टॅम्पला जपानी भाषेत ‘हंको’ असे म्हणतात.


29) जगातील सर्वात उंच आणि जास्त लांबीची दोन्ही झाडे ही कॅलिफोर्निया देशात आहेत.


30) Apple कंपनीत नोकरी करणारा प्रत्येक चौथा माणूस भारतीय आहे. (Intresting facts in marathi)


31) शुद्ध सोने इतके मऊ असते की ते हातांनी देखील मोडले जाऊ शकते.


32) भारतातील पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब त्रिपुरा येथे आहे.


33) जपानची टोयोटा आता जगातील सर्वात मौल्यवान वाहन कंपनी बनली आहे. मर्सिडीज बेंझ सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल ब्रँडच्या यादीत दुसऱ्या आणि फोक्सवगन तिसऱ्या क्रमांकावर आहे.


34) पहिला पाऊस पडल्यावर जो सुगंध येतो त्याला Petrichor म्हणतात.


35) व्हॉट्सॲप वापरणारा प्रत्येक वापरकर्ता दररोज सरासरी 23 वेळा व्हॉट्सॲप चेक करतो.


36) भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग जिल्ह्यात होतो. डोंग जिल्हा हे भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे, म्हणूनच येथे सूर्योदय सर्वात आधी अनुभवला जातो.


37) सिंगापूरमध्ये Chewing Gum ची आयात करणे आणि विक्री करणे बेकायदेशीर आहे. जर तुम्हाला Chewing गमसह पकडले तर आपल्यास 1,00,000 डॉलरचा दंड होऊ शकतो. सिंगापूरने Chewing गमवर बंदी घातली आहे कारण ते रस्ते आणि पदपथ गलिच्छ आणि घाण करतात.


38) आफ्रिका आणि आशिया या दोन खंडातील 90% लोकसंख्या ही ग्रामीण भागातील आहे.


39) डोळ्याचा कॉर्निया हा मानवी शरीराचा एकमेव भाग आहे ज्याला रक्तपुरवठा होत नाही. कॉर्नियाला हवेतून आणि अश्रु द्रव्यांमधून ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. 


40) भारतीय चलनी नोटा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे फक्त सरकारी छापखान्यातच छापल्या जातात. देशात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे छापखाने आहेत.

50 Marathi Rochak Tathya (50 Intresting facts in marathi)


41) रुबिक्स क्यूब हे जगातील सर्वात जास्त विकलं जाणारं (35 कोटींहून अधिक) खेळणं आहे. विद्यार्थ्यांना त्रिमितीय भूमिती शिकवण्यासाठी एर्नो रुबिक यांनी 1980 साली याची निर्मिती केली होती.


42) दुबईत तुमच्याकडे घाणेरडी कार असल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. जर आपण कार स्वच्छ न केल्यास सरकार म्हणते की ही गोष्ट शहराच्या प्रतिमेस हानी पोहोचवू शकते. तसेच, यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकते. घाणेरड्या कारच्या मालकाला 817 डॉलरचा दंड होऊ शकतो.


43) फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या भारतात आहे.


44) रतन टाटा (Ratan Tata Facts in Marathi) यांना विमाने उडवायला खूप आवडतात एवढेच नाही तर ते एक कुशल पायलट देखील आहेत. रतन टाटा 2007 मध्ये F-16 फाल्कन उडवणारे पहिले भारतीय होते.

45) शॉपिंग करताना पैसे वाचविण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे की आपण गरज नसलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये. कोणत्याही वस्तूला हात लावल्याने त्याची खरेदी करण्याची शक्यता वाढते.


46) ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या पायाचे इन्शुरन्स (विमा) 120 मिलियन ते 130 मिलियन दरम्यान आहे म्हणजे 120-130 दशलक्ष रुपये इतका.


47) जे लोकं तुमची काळजी नसल्याचे नाटक करत असतात मुळात त्या लोकांना तुमची खूप काळजी असते फक्त त्या लोकांना देखावा (शो ऑफ) करायला आवडत नाही.


48) T series मधील T चा अर्थ Trishul (त्रिशूल) आहे. याचे जे मुख्य मालक गुलशन कुमार होते ते भगवान महादेवाचे परम भक्त होते e याच मुळे त्यांनी हे नाव ठेवले.


49) हसू आणणाऱ्या गॅस (Laughing Gas) चे रासायनिक नाव नाइट्रस ऑक्साइड (N20) आहे.


50) यूट्यूब वर सर्वाधिक पाहिलेला शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आहे या शो चे युट्यूबला एकूण ’45 अब्ज व्हीव’ आहेत जे Pewdiepie आणि Mr.Beast’ e च्या एकत्रित व्हीवपेक्षा जास्त आहे! (Intresting facts in marathi)

60 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (60 Intresting facts in marathi)


51) समझोता एक्स्प्रेस ही भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रेल्वे आहे जी भारत – पाकिस्तान मध्ये धावत असते. 


52) साप हे भूगर्भातील हालचाली (भूकंपांचा) अंदाज लावण्यास सक्षम असतात.


53) प्राचीन रोम काळात मीठ अति महाग वस्तूंमध्ये गणने जायचे याच कारणामुळे रोमन सैनिकांना वेतनाच्या बदल्यात मीठ दिले जायचे.


54) Rudolf Diesel ज्यांनी डिझेल इंजिनचा शोध लावला त्यांनी 1913 मध्ये आत्महत्या केली होती कारण त्यांना वाटले होते की त्यांचे invention बेकार आहे. म्हणून आयुष्यात संयम फार महत्वाचा आहे. 


55) 1912 मध्ये Joe Munch नावाच्या व्यक्तीला केवळ एक मिनिटांसाठी तुरुंगवास झाला होता. आजपर्यंतचा सर्वात कमी कालावधीचा हा तुरुंगवास आहे.


56) अंगठा इतर बोटांच्या मध्ये लपवणे हे तुम्ही निराश असल्याचे दर्शवते व तसेच एखाद्या ग्रुप मध्ये एखाद्या व्यक्तीला त्याला निगलेक्ट करायचे आहे हे दर्शवते.


57) सिकंदर , नेपोलियन आणि हिटलर यांना मांजराची खूप भीती वाटत असे कारण हे सर्वजण अनिलोफोबिया या रोगाने ग्रस्त होते.


58) सायकॉलॉजी नुसार ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या प्रेमाला विसरण्यासाठी 17 महिने आणि 26 दिवस लागतात.


59) ELF नावाचं हे घुबड (ELF OWL) 5 इंच लांब आणि 31 ग्रॅम वजनाच आहे. जे की जगातील सर्वात लहान घुबड आहे.


60) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरन बफेट यांच्याकडे आज जितका पैसा आहे त्यातील 94% पैसा त्यांनी आपल्या वयाच्या 60 वर्षानंतर कमवला आहे.

80 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (80 Intresting facts in marathi)


61) ANOK YAI या मुलीला जगातील सर्वात महाग मॉडेल असा पुरस्कार देण्यात आला आहे. ती एक तास Fashion Photography साठी 11 लाख रुपये चार्ज करते.


62) कियारा कौर नावाच्या एका भारतीय-अमेरिकन मुलीने स्वतःच्या कौशल्याने दोन जागतिक विक्रम नोंदवले आहेत. ही मुलगी 105 मिनिटांत 36 पुस्तके वाचते. यामुळे तिचे लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे.


63) तेलुगू चित्रपटातील अभिनेता अलू अर्जुन याचा SARRAINODU हा यूट्यूब वरील एकमेव असा चित्रपट आहे ज्याला 300 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.


64) 2014 च्या एका आयपीएल मॅचमध्ये जेव्हा अंपायरने किरण पोलार्डला शांत राहण्याचा सल्ला दिला तेव्हा तो तोंडावर टेप चिटकवून आला होता. 


65) उत्तर कोरियामध्ये फक्त तेथील स्थानिक बातम्याच दाखवल्या जातात. तेथे जागतिक स्तराच्या बातम्या प्रसारित केल्या जात नाहीत.


66) जगातील सर्वात मोठी जमीनदार व्यक्ती या राणी एलिझाबेथ द्वितीय आहेत, ज्यांच्याकडे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 16.6% क्षेत्राची कायदेशीररित्या मालकी आहे. पृथ्वीवरील एकमेव अशी व्यक्ती आहे जी अनेक देशांची मालक आहे.


67) इस्त्राईल हा एकमेव असा देश आहे जेथे तुम्ही एक स्त्री असो किंवा पुरुष आपल्याला देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या आयुष्याची 2 वर्षे घालवावी लागतात.


68) सुरुवातीला एटीएमचा पिन 6 अंकांचा होता, परंतु एटीएम शोधक ‘जॉन शेफर्ड’ यांची पत्नी फक्त 4 अंक लक्षात ठेवू शकत होती, म्हणून नंतर तो 4 अंकी करण्यात आला.


69) इथियोपिया देशाचे कॅलेंडर 7 वर्ष मागे आहे. तिथे एका वर्षात 13 महिने असतात.

70) सन 2015 मध्ये रुसमध्ये राहणाऱ्या एका मुलाने पिझ्झाशी लग्न केलं आहे. कारण त्याच म्हणणं आहे की माणसांमधील प्रेम अवघड आहे. (Intresting facts in marathi)

71) जर तुमचं एका वर्षांचं वार्षिक उत्पन्न 21000 डॉलर म्हणजेच 15 लाख रुपये असेल तर याचा अर्थ तुम्ही पृथ्वीवरील 4% श्रीमंत लोकांमध्ये येता.

72) आपले नाक आपल्याला नेहमीच दिसत असते. परंतु आपला मेंदू त्याला IGNORE करत असतो या प्रोसेसला UNCONSCIOUS SELECTIVE ATTENTION असे म्हणतात.

73) जगातील सर्वात पहिल्या कॅमेरातून फोटो काढण्यासाठी तब्बल 8 तास थांबावे लागत असे.

74) गजराच्या घड्याळाचा शोध लागण्याआधी लोकांना सकाळी उठवण्यासाठी खास माणसांची नेमणूक केलेली असायची जी प्रत्येकाच्या खिडकीपाशी जाऊन बंदुकीतून (ब्लो गनने) मुके वाटाणे खिडकीच्या काचेवर मारायची.

75) ‘KNOCK’ ही जगातील सर्वात लहान हॉरर स्टोरी आहे ज्यात केवळ 2 वाक्ये आहेत. ‘पृथ्वीवर एकमेव असलेला माणूस एका रूममध्ये बसलेला असतो. कोणीतरी दारावर क्नॉक करते.

76) एखाद्याच्या श्वास घेण्याच्या आवाजाने किंवा काहीतरी खाण्याचे वेळी केलेल्या आवाजाचा तुम्हाला त्रास होत असेल तर याला ‘MISOPHONIA’ म्हणतात खरं तर हे एक ‘BRAIN DISORDER’ आहे.

77) एका रिसर्चनुसार तिखट पदार्थ खाणाऱ्या लोकांचं आयुष्य सरासरी लोकांपेक्षा 17% जास्त असते.

78) RUBIK’S CUBE चा शोधकर्ता ERNO RUBIK याला ते सोल्व करायला तब्बल एक महिना लागला होता. सध्या रुबिक CUBE SOLVE करायचा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त 3.47 सेंकदाचा आहे.

79) ‘प्रेमात पडणे’ या भावनेचा आपल्या हृदयाशी काही संबंध नाही. ही आपल्या मेंदूत घडणारं एक CHEMICAL REACTION आहे.

80) एखाद्या टोमण्याला अत्यंत जलदपणे प्रतिउत्तर देणे हे एक प्रकारचे HEALTHY BRAIN असण्याचं लक्षण आहे.

100 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (100 Intresting Facts in Marathi)

81) जे लोकं सहसा खोटं बोलतात ते समोरचा व्यक्ती खोटं बोलत असेल तर ते सुद्धा ओळखू शकतात.

82) जर तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल तर घरातील सर्व लाईट बंद करा आणि एक चांगली हॉरर मुव्ही बघा. त्यानंतर तुम्हाला एकटं एकटं वाटणारच नाही.

83) THUMBELINA हा जगातील सर्वात लहान घोडा आहे. या घोड्याचे वजन एका मध्यम आकाराच्या कुत्र्याएवढे होते. 2018 मध्ये याचा मृत्यू झाला.

84) शास्त्रज्ञाना ऑक्सिजन शिवाय जगू शकणारा प्राणी शोधण्यात यश मिळाले आहे. या जेलीफिशचे नाव “HENNEGUYA SALMINICOLA” असे आहे.

85) 1963 मध्ये ‘THE BRONX’ नावाच्या प्राणिसंग्रहालयात ‘MOST DANGEROUS ANIMAL IN THE WORLD’ नावाचं एक प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात फक्त एक आरसा होता.

86) झुरळ मानवांची एवढी घृणा करतो की आपण त्याला स्पर्श केल्यास तो तिथून पळून जाऊन स्वतःला पाण्याने धुवून काढतो.

87) एका स्टडीनुसार आपल्यावर खर्च करण्यापेक्षा इतरांवर खर्च केल्यास अधिक आनंद मिळतो.

88) विल्यम्स समरफोर्ड हा ब्रिटिश अधिकारी त्याच्या आयुष्यात 3 वेळा वीज पडल्यामुळे जखमी झाला होता. एकदा तर जीव जाता जाता तो वाचला होता. पण मजेदार गोष्ट अशी आहे कि मेल्यानंतरसुद्धा त्याच्या कबरीवर वीज पडली होती.

89) बाळाला जन्म देणे हि दुसरी सर्वात वेदनादायक गोष्ट आहे. पहिली जिवंत जळणे आहे.

90) जेव्हा तुम्हाला कोणी “एक विचारू का’ असं विचारतं तेव्हा 98% of the time तुम्ही नुकतंच केलेल्या वाईट गोष्टींचा विचार करू लागता. (Intresting facts in marathi)

91) जर सहारा वाळवंटातील फक्त 1.2% क्षेत्रावर सौर पॅनल उभे केले तर संपूर्ण जगाला ऊर्जा देऊ शकेल एवढी वीज तेथून निर्माण होईल.

92) पॅरिसमधील एका चित्रपटगृहात “LIFE OF PI” हा चित्रपट चक्क बोटीत बसून दाखवला होता.

93) जपानमधील शेतकरी चौकोनी टरबूज पिकवतात. हे टरबूज ठेवायला आणि हाताळायला सोपे जातात.

94) मादी ऍनाकोंडा खूप विचित्र असते, संभोग झाल्यानंतर ते नर ऍनाकोंडाला खाऊन टाकतात. जेणेकरून गरोदरपणात ते सात महिन्यापर्यंत न खाता जिवंत राहू शकेल.

95) एका संशोधनानुसार महिलांना टक्कल असलेले पुरुष खूप आकर्षित करतात तसेच महिलांना ते confident सुद्धा वाटतात.

96) INTELLIGENT व्यक्ती आजूबाजूच्या लोकांमुळे खूपच लवकर चिडतात परंतु फालतू भांडण करण्यापेक्षा ते शांतच राहणे पसंत करतात.

97) LACRIMAL PUNCTUM या नावाने ओळखले जाणारे आपल्या पापण्याच्या खाली एक छोटे छिद्र असते जे आपल्या डोळ्यातील अश्रू आपल्या नाकात नेते. त्यामुळे आपण रडत असताना आपले नाकसुद्धा वाहत असते.

98) जवळपास बहुतेक लोकं हे जर कोणी पिण्याचे पाणी मागितले तर आधी स्वतः पिऊन मग त्यांना देतात.

99) polonium हे सर्वात खतरनाक जालीम विष आहे, त्याच्या फक्त 1 ग्राममध्ये सुमारे 1 करोड लोक मरु शकतात.

100) जगात नॉर्थ कोरिया आणि कुबा असे दोनच देश आहेत जिथे कोका-कोलाची खरेदी किंवा विक्री होत नाही.(Intresting facts in marathi)

120 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (120 rochak tathya in Marathi)

101) 2011 मध्ये 17 वर्षीय Wang Shangkun या चीनमधील तरुणाने Apple कंपनीचा मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आपली एक किडनी काळ्या बाजारात विकली होती. परंतु सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे, Daily Dialysis हा त्याच्या जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग उरला आहे.

102) न्युझीलँड सरकारने 2004 नंतर जन्मलेल्या त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला सिगारेट ओढण्यास सक्त मनाई केली आहे कारण 2025 पर्यंत “सिगारेट न पिणारी पिढी” तयार करणे हे त्यांचे लक्ष्य आहे.

103) माणसाचा दात हा जास्तीत जास्त 285 किलोग्रॅम इतके वजन सहन करू शकतो.

104) आईस्क्रीमच्या जाहिरातींमध्ये दिसणारे आईस्क्रीम हे खरंखुरं आईस्क्रीम नसुन Mashed केलेले बटाटे असतात कारण चित्रीकरणादरम्यान आईस्क्रीम हे वितळून जाते म्हणून ही शक्कल लढवली जाते.

105) आपल्या शरीराला जखम झाल्यानंतर मेंदूत जी रासायनिक प्रक्रिया होते तशीच रासायनिक प्रक्रिया एखाद्या व्यक्तीने आपल्याला Ignore किंवा Reject केल्यानंतर देखील होते.

106. सुदानची Anok Yai ही जगातील सर्वात महागडी मॉडेल ठरली आहे. त्याचबरोबर अनोक हिने जगातील सर्वात सुंदर महिला होण्याचा किताब पटकावला आहे. अनोक केवळ 1 तासाच्या फॅशन फोटोसेशनसाठी (15) हजार डॉलर्स) म्हणजेच 11 लाख रुपये फीस घेते.

107) बोलिव्हीयातील ला पाज येथील संसदेवरील घड्याळ्याला काटे उलट्या क्रमाने बसविले गेले आहेत. हे घड्याळ उलट दिशेने चालते. विदेश मंत्री डेव्हीड यांनी या घड्याळाचे नामकरण दक्षिणेचे घड्याळ असे केले आहे. डेव्हीडही असे मनगटी घड्याळ वापरतात. घड्याळ्याचे काटे एकाच दिशेने फिरणे ही जगरहाटी आहे. त्याऐवजी नवीन विचार का रूजवू नयेत? त्यासाठी हे घड्याळ उलटे चालणारेच आहे, असे डेव्हिड म्हणतात.

108) फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग रोज सकाळ उठून कोणते कपडे घालायचे यामध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून दररोज सारखाच T-Shirt घालतात. कारण लोक काय म्हणतील याचा ते विचार नाही करत ते फक्त स्वतःला IMPROVE करण्याचा प्रयत्न करतात.

109) जगातील सर्वात खराब आवाज कोणता? संशोधकांनी याबाबत एक यादी जाहीर केली आहे यामध्ये माणूस उलटी करताना जो आवाज काढतो तो सर्वात खराब आवाज आहे. तर, नखांनी एखाद्या पृष्ठभागावर ओरखडणं, लहान मुलांच रडणं, लोखंडाचा टेबल फरशीवरून ओढताना होणारा आवाज, लोखंडावर लोखंड घासणं, ड्रिल मशीन, काचेच्या बाटलीवर चाकू घासणं, जेवताना होणारा तोंडातील आवाज यांचाही या यादीत समावेश आहे.

110) लहान मुलांचे गाणे असलेले “Baby Shark” हा व्हिडीओ 7.4 Billion Views मिळवून Youtube वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ बनला आहे. “Despacito” हा Video Song दुसऱ्या क्रमांकावर आहे.

111) नैसर्गिक LPG गॅसला कोणत्याही प्रकारचा वास नसतो व ही गॅस रंगहीन असते. गॅस लिकेज झाल्यानंतर कळावे यासाठी यामध्ये उत्पादनाच्या वेळी Ethyl Marceptan मिळवला जातो. यामुळे या गॅसचा वास सडलेल्या अंड्यांसारखा येतो.

112) जुन 2011 मध्ये उत्तरप्रदेशातील शिवनगर या गावाचे नाव बदलुन Snapdeal.com नगर असे ठेवण्यात आले होते कारण Snapdeal या कंपनीने येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी वणवण रोखण्यासाठी गावात 15 हँडपंप बसवले होते.

113) काही व्यक्ती या आनंदी राहण्याला घाबरतात, कारण लवकरच एखादी वाईट घटना घडणार आहे असे या व्यक्तींना नेहमी वाटत राहते. या परिस्थितीला Cherophobia असे म्हणतात.

114) काही व्यक्ती या समोरील व्यक्तीच्या Looks किंवा दिसण्याकडे आकर्षित न होता, त्यांच्या बुद्धिमत्तेकडे आकर्षित होतात. अशा व्यक्तींना Sopiosexual असे म्हणतात.

115) फ्रान्समध्ये एक रस्ता आहे जो केवळ दोन तासासाठी दिसतो आणि बाकी वेळ समुद्राच्या पाण्यात बुडलेला असतो. समुद्रात बनलेल्या रस्त्याची लांबी केवळ पाच किलोमीटर आहे. हा रस्ता पॅसेज डू गोइस या नावाने ओळखला जातो. हा रस्ता पार करणे कठिण आहे कारण दोन तास मार्ग मोकळा असला तरी भरतीमुळे लगेगच पाण्याचं स्तर वाढू लागतो आणि रस्ता चार मीटर खाली पोहचतो.

116) जगभरातील 50 मुस्लिम राष्ट्रंपेक्षाही जास्त मशिदी’ भारतात आहेत. या मशिदींची संख्या जवळपास ३ लाखांपेक्षाही जास्त आहे. दिल्लीतील जामा मशीद’ ही भारतातील सर्वात मोठी मशीद आहे.

117) गिनीज बुकमध्ये दरवर्षी नोंदविल्या जाणाऱ्या विश्वविक्रमांच्या यादीत अमेरिका आणि युनायटेड किंगडमनंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

118) एका दिवसात सर्वात जास्त गाणी गाण्याचा विक्रम त्यांनी एका दिवसात 28 गाणी गाण्याचा विक्रम कुमार सानू यांनी केला आहे.  ज्याची GUINNESS BOOK OF WORLD RECORD या पुस्तकामधे नोंद आहे.

119) आपल्याला नेहमी सांगितले जाते की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मात्र भारताचा असा राष्ट्रीय खेळच नाही. RTI म्हणजेच माहिती अधिकार कायद्यानुसार, भा अद्याप आपला राष्ट्रीय खेळ घोषित केलेला नाही.

120) चीनमध्ये आपण काही व्यक्तींना प्रतितास 100 रुपये देऊन आपल्या जागी रांगेत उभे ठेवू शकतो व आपण कुठेही फिरायला जाऊ शकतो.

140 मराठी फॅक्ट्स (140 intresting facts in marathi)

121) “Phantom Vibration Syndrome” ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये संबंधित व्यक्तीला आपला मोबाईल Vibrate होत आहे असे वाटते परंतु तो Vibrate होत नसतो. सध्या मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने 65% पेक्षा लोकांमध्ये ही आढळते.

122) भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ हा 30 फुट लांब आणि 12 फुट इतकी उंच उडी मारू शकतो.

123) 16 मे 1969 साली रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेने वेन्हेरा 5 हे अवकाशयान शुक्र ग्रहावर पाठवले होते. शुक्र ग्रह सूर्यापासूनचा दुसरा सर्वात जवळचा ग्रह आहे. तसेच त्याचे तापमान तब्बल 500 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. त्यामुळे वेन्हेरा यान शुक्रावर उतरताच अवघ्या एका तासात पूर्णपणे विरघळून गेले होते.

124) ‘सिंधू संस्कृती’ जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. ६ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळात जगा सर्वात पहिली ड्रेनेज सिस्टीम (सांडपाणी व्यवस्था) सुरू झाली होती. भारतीय महिलासुद्धा सिंधु संस्कृतीच्या काळापासूनच साडी परिधान करत आहेत.

125) Juliet Rose नावाने ओळखले जाणारे हे गुलाबाचे फूल जगातील सर्वात महागडे फुल असुन त्याची किंमत सुमारे 90 कोटी रुपये आहे. खरे म्हणजे या गुलाबाचा संकर करणारा प्रसिद्ध फूलतज्ज्ञ डेव्हिड ऑस्टिन याने अनेक गुलाबांपासून त्याची निर्मिती केली होती. हुइड हायब्रिड नावाची ही दुर्मीळ प्रजात तयार करण्यात त्याला तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला होता.

126). साधारणतः आपल्याला ढेकर येतात, तेव्हा आपण बोलतो पोट भरून जेवण झाले. मात्र ते तसे नसून शरीरातून हवा बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. आपल्या पोटात पचनाच्या प्रक्रियेत काही घटक तयार होताना हवाही तयार होते. ही हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. पचनानंतर आलेली ढेकर शुद्ध असते तर अपचनाची ढेकर आंबट असते. भरभर खाणे, च्युइंगम चघळणे, धूम्रपान, सोडायुक्त पेयांचं सेवन या सवयींमुळेही ढेकर येऊ शकतात.

127) अमेरिकेतील एकुण Hotel Business च्या 40% Hotel Business हा गुजराती लोकांच्या मालकीचा आहे. विशेष म्हणजे या 40% पैकी 70% हॉटेल व्यावसायिकांचे आडनाव “पटेल” आहे.

128) वास्तविकरित्या पाहता झोप येण्याची गोळी खाल्ल्याने आपल्याला झोप येत नाही तर झोप येण्याची गोळी आपल्या मेंदूला कोमा सारख्या स्थितीत पाठवते यामुळेच मनुष्य गाढ झोपी जातो.

129) जर तुम्ही खुप जास्त वेळ तुमचा पाकिट पँटच्या मागच्या खिशात ठेवून बसत असाल तर तुमचा पाय Paralyzed देखील होऊ शकतो.

130) “Smart Guns” या अशा Guns असतात ज्या मुळ मालकाच्या हातात असल्यावरच Unlocked असतात इतर कोणतीही व्यक्ती या गनचा वापर करू शकत नाही.

131) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या “A Promise Land” या आत्मकथेमध्ये अनेक खुलासे केले आहेत, त्यामध्ये त्यांनी ‘मी लहानपणी रामायण आणि महाभारत ऐकायचो’ असे सांगितले आहे.

132) सर्वात जास्त वेगाने सायकल चालवण्याचा विश्वविक्रम हा डच सायकलपटू फ्रेड टोम्पेलबर्ग यांच्या नावावर आहे. फ्रेड टोम्पेलबर्ग यांनी तब्बल 166.4 kmph च्या वेगाने सायकल चालवुन या विक्रमाला गवसणी घातली होती.

133) जगप्रसिद्ध अभिनेते आणि कराटेपटू जॅकी चॅन यांनी एकदा हाताच्या मुठीत अंडा ठेवून 12 सिमेंट ब्लॉक्स तोडले होते व तेही अंड्याला थोडीशीही इजा न पोहचवता.

134) सामान्य मनुष्य आपला श्वास पाण्यामध्ये 30 ते 40 सेकंड थांबवू शकतो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य बसे कि, ब्लू व्हेल मासा आपला श्वास पाण्यामध्ये तब्बल 40 मिनिटे ते 2 तासांपर्यंत थांबवू शकतो.ब्लू व्हेल हा पाण्यामध्ये श्वास नाही घेऊ शकत, त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर यावं लागतं.

135) जगातील पहिले अंतराळवीर म्हणजे लाइका नावाची एक कुत्री, तिला तत्कालीन सोव्हिएत युनियन सरकारने 3 नोव्हेंबर 1957 रोजी अंतराळ प्रवासावर पाठवले होते.परंतु अंतराळ यानातील अति उष्णतेमुळे तिचा मृत्यू झाला.

136) ‘संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वात अनुकूल आहे. जर्मनीमधील 14 विद्यापीठांमध्ये संस्कृत हा प्रमुख विषय आहे. संस्कृत उत्तराखंडची राज्यभाषा आहे. कर्नाटक राज्यातील मत्तुर या गावातील लोक केवळ संस्कृतमध्ये संवाद साधतात. 95% पेक्षा अधिक संस्कृत साहित्यामध्ये धर्माविषयी लिहिलं गेलं नसून तत्त्वज्ञान, कायदा, विज्ञान, साहित्य, व्याकरण इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

137) आपण भगवदगीता, रामायण आणि महाभारत ही हिंदूंची धार्मिक पुस्तकं वाचली असतील, तर तुमच्या हे लक्षात येईल की या पुस्तकांमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. हिंदू हा शब्द पर्शियन आणि ग्रीक या विदेशी लोकांमुळे लाभला आहे. ते सिंधू नदीच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना हिंदू असे संबोधत होते.

138) प्रत्येक 5 मिनिटांत पृथ्वी 10 हजार किमी एवढा प्रवास करते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, असा आपला समज आहे. मात्र पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद लागतात.

139) दर बारा वर्षांनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भरणारा ‘कुंभमेळा’ हा जगातील सर्वात मोठा हिंदू भाविकांचा मेळा आहे. 2013 साली कुंभमेळ्याला मौनी अमावस्येच्या एकाच दिवशी तब्ब्ल 3 कोटी भाविकांनी भेट दिली होती. ही संख्या इतकी जास्त होती की हे दृश्य अवकाशातूनही दिसत होते.

140) आपल्याला नेहमी सांगितलं जातं की भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर फडकवला होता. मात्र 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकात्याच्या ग्रीन पार्क येथे सर्वप्रथम भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता.

160 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (160 rochak tathya in marathi)

141) फिमर हे मांडीत असणारे मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. हे हाड काँक्रिटएवढे मजबूत असते.

142) दिवसातून रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधिवात यासारखे आजार बरे होण्यास मदत मिळते. टाळ्या वाजवल्यामुळे हातातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया जलद गतीने होते. परिणामी, रक्तदाब हात थरथर कापणे, लकवा असणं अशा आजारात रोज सकाळी आणि संध्याकाळी शक्य होतील तितक्या टाळ्या वाजवाव्यात.

143) जगभरात आढळणाऱ्या सर्व पशु-पक्ष्यांपेक्षा “हरीण” या प्राण्याचे डोळे सर्वात मोठे असतात.

144) 20 फेब्रुवारी 1947 रोजी अमेरिकेन V-2 या रॉकेटमधून माशी या कीटकाला सर्वप्रथम अंतराळात पाठवण्यात आले. 1950 ते 1960 च्या दरम्यान 57 श्वानांना अंतराळात पाठवण्यात आलं होतं. तसेच 1957 साली ‘लायका’ ही कुत्री पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणारी पहिला जीव ठरली.

145) साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन पासून ते रशियातील मगदानपर्यंत असलेला रस्ता पृथ्वीवरील सर्वात जास्त लांबीचा रस्ता आहे ज्यावरून मनुष्य चालु शकतात. 22,837 किमीचा हा रस्ता न थांबता पार करण्यासाठी अंदाजे 187 दिवस लागतील.

146) अमेरिकेच्या Jessica Cox या जगातील पहिल्या हात नसलेल्या परवानाधारक विमानचालक बनल्या आहेत त्याचबरोबर त्या अमेरिकन तायक्वांदो असोसिएशनच्या पहिल्या हात नसलेल्या ब्लॅक बेल्टधारक आहेत. एका दुर्मीळ आजारामुळे जन्मतःच त्यांना हात गमवावे लागले होते.

147) महाराष्ट्रातील स्ट्रिट फूडपैकी सर्वाधिक प्रसिद्ध अस
पदार्थ पाव-भाजी हा मुळ पोर्तुगीज पदार्थ आहे. पोर्तुगीज लोक विविध पालेभाज्या एकत्रित करून भाजी बनवतात आणि ती ब्रेडसोबत खातात.ज्याला पोर्तुगालमध्ये पाव असे म्हटलं जाते.

148) जगभरात एका वेळेस सर्वाधिक पुशअप्स मारण्याचा विश्वविक्रम जपानच्या “मिनोरु योशिदा” यांच्या नावावर आहे. त्यांनी सन 1980 मध्ये एका वेळेस तब्बल 10570 पुशअप्स केले होते.

149) “Parachute” नारळ तेलाच्या बाटलीवर कधीही हेअर ऑईल असे लिहिलेले नसते कारण हे केवळ सौंदर्य प्रसाधन नसुन त्याला FSSAI द्वारा मंजुरी दिली गेली आहे त्यामुळे हे तेल खाद्यपदार्थांमध्येही वापरले जाऊ शकते.

150) किम गुडमॅन ही महिला तिचे डोळे 12 मिलीमीटर पर्यंत बाहेर काढण्यात सक्षम आहे. डोळे इतके बाहेर काढणे ही खुप आश्चर्यजनक आणि अजब गोष्ट आहे त्यामुळे हा एक विश्वविक्रम आहे.

151) नॉर्वे या देशामध्ये जर कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये TV वापरत असेल तर त्याला दरवर्षी TV ची लाइसेंसिंग फी द्यावी लागते, जी जवळपास 25 हजार रुपये इतकी आहे.

152) एका सामान्य Toyota Car ला बनवण्यासाठी केवळ 15 ते 17 तास एवढाच वेळ लागतो परंतु एका Rolls Royce कार ला बनवण्यासाठी 6 महिने इतका कालावधी लागतो विशेष म्हणजे Toyota Car चे सरासरी आयुष्य 15 वर्षे इतके असते परंतु एक Rolls Royce कारचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा जास्त असते.

153) जगात सर्वात जास्त काळ गायन करण्याचा विक्रम नागपूरच्या सुनील वाघमारे यांच्या नावावर आहे. त्यांनी २०१२ साली ३ मार्च ते ७ मार्च असे सलग चार दिवस (१०५ तास) गायन केले होते. विशेष म्हणजे प्रत्येकी चार तासांमध्ये त्यांनी कोणतेही गाणे पुन्हा गायले नाही. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये आहे.

154) मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या, लाल किंवा काळ्या रंगाच्याच असतात. मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडण्याची मुभा असते. फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू होत नाहीत.

155) आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी 25% हाडे ही केवळ पायांमध्ये असतात. आपल्या एका पायात 26 हाडे म्हणजेच दोन्ही पायात मिळुन 52 हाडे असतात. आपल्या शरीरात एकुण 206 हाडे असतात आणि त्यातील 25% केवळ आपल्या पायांमध्ये असतात.

156) खऱ्या आयुष्यातील “रँचो” सोनम वांगचुक यांनी अतिशय कमी तापमानात पहारा देत असलेल्या जवानांसाठी सोलर हिटेड मिलेटरी टेन्ट शोध लावला आहे. यामध्ये उणे तापमानातही जवानांना कोणतीही थंडी वाजणार नाही आणि प्रदूषणाचा प्रश्नही मिटेल.

157) अमेरिकेतील अलास्का येथे साधारण भाज्यांच्या
आकारापेक्षा अतिशय मोठ्या आणि महाकाय आकाराच्या भाज्या उगवतात कारण येथे 20 तास सुर्यप्रकाश असतो.

158) Sunglasses चा अविष्कार हा 12 व्या शतकात चीनमधील न्यायाधीशांना कोर्टात त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव लपवण्यासाठी करण्यात आला होता.

159) एखाद्या रुग्णाच्या शरीरातुन सर्वात जास्त मुतखडे बाहेर काढण्याचा विश्वविक्रम महाराष्ट्राचे डॉ. आशिष रवांदळे यांच्या नावावर आहे. डॉ. वांदळे 9 डिसेंबर 2009 रोजी धुळे येथील Institute Of Urology मध्ये धनराज वाडीले या रुग्णाच्या डाव्या मुत्राशयातुन 1,72,155 मुतखडे 3 तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेतून शरीराबाहेर काढले होते.

160) प्राचीन ग्रीस आणि रोम साम्राज्यातील डॉक्टर्स त्यांच्या रुग्णांसाठी कोळीच्या जाळ्यांचा वापर “बँडेज” म्हणुन करत असत. या जाळ्यांमध्ये नैसर्गिक Antiseptic आणि AntiFungal गुणधर्म असतात जे जखम बरी करण्यास मदत करतात.

180 मराठी फॅक्ट (180 intresting facts in marathi)

161) एखाद्या व्यक्तीच्या श्वास घेण्याचा किंवा काहीतरीचघळण्याचा आवाज ऐकल्यास आपल्याला राग येतो, या परिस्थितीस “Misophobia” असे म्हणतात. हे एक Actual Brain Disorder आहे. 

162) जपानमधील लोक सही करत नाहीत तर त्यांच्याकडे स्वतःचे स्टॅम्प असतात, या स्टॅम्पना जपानी भाषेत “हंको” असे म्हणतात.

163) केवळ 1 महिने मद्यपान करणे सोडल्यास लिव्हरची कार्यक्षमता सुधारते, रक्तदाब नियंत्रणात येतो आणि लिव्हर संबंधित आजार व डायबिटीस होण्याची रिस्क कमी होते.

164) वास्तविक पाहता मानवी डोळा केवळ तीनच रंग पाहू शकतो: निळा, लाल आणि हिरवा. उर्वरित रंग हे 3 रंग एकत्रित करून तयार होतात. या तीन रंगाच्या मदतीने आपण 1 करोड रंग ओळखू शकतो.

165) पोलंड या देशामध्ये Jesus च्या एका भल्यामोठ्या पुतळ्याचा उपयोग हा सभोवतालच्या गावांमध्ये WiFi Distribute करण्यासाठी केला जातो.

166) रात्री झोपल्यानंतर स्वप्न पाहत असल्यास नेहमी आपल्या मृत्यूच्या आधी जाग येते, कारण मृत्यूनंतर काय होते हे आपल्या मेंदूला माहिती नसते.

167) देशातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी सर्वाधिक म्हणजे 18.62 टक्के ग्रामीण लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यात राहते; तर देशातील एकूण नागरी लोकसंख्येपैकी सर्वाधिक म्हणजे 13.48 टक्के नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.

168) सन 2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार देशात दरहजार पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत. हेच प्रमाण दरहजार स्त्रियांमागे देशात किती पुरुष आहेत, असे सांगावयाचे झाल्यास त्याचे उत्तर 1061 पुरुष असे द्यावे लागेल.

169) आफ्रिकेत आढळणाऱ्या Giant African Swallowtail या फुलपाखराच्या शरीरात एका वेळेस सहा मांजरींना मृत्युमुखी पाडू शकेल एवढे विष असते.

170) आफ्रिकेच्या पुर्व भागात असलेल्या मादागास्कर या देशात जगातील 90% असे पशु-पक्षी आढळतात जे जगात इतर कोणत्याही ठिकाणी आढळत नाहीत.

171) जगातील सर्वात उंच पर्वत ‘माऊंट एव्हरेस्ट’ची निर्मिती 6 कोटी वर्षापूर्वी झाली. 1830 ते 1843 दरम्यान भारतात सर्वेक्षण करण्यासाठी आलेले अधिकारी जॉर्ज एव्हरेस्ट’ यांनी सर्वप्रथम माऊंट एवरेस्टचा शोध लावला. 19 मे 1953 रोजी एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे हे माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती ठरले.

172) शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेता ‘अरनॉल्ड श्वानिगर’ यांनी 1911 सालच्या टर्मिनेटर-२’ या चित्रपटात केवळ 700 शब्द बोलण्याचे 15 दशलक्ष डॉलर्स (42 कोटी) इतके मानधन घेतले होते. तसेच त्यांनी चित्रपटातील ‘हस्ता ला विस्ता बेबी’ या प्रसिद्ध डायलॉगसाठी 2 कोटी 38 लाख रुपये घेतले होते.

173) जगातील सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान 15 ते 19 मार्च 1877 रोजी खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 45 धावांनी विजय मिळवला होता.

174) जगप्रसिद्ध रॅप गायक ‘एमिनेम’ याने त्याच्या ‘रॅप गॉड’ या गाण्यात 6 मिनिटांत तब्बल 1560 शब्द बोलून गिनीज बुकात आपले नाव नोंदवले होते. विशेष म्हणजे त्याने 6 शब्द बोलण्यासाठी केवळ 1 सेकंद लावला.

175) शल्यचिकित्सक ‘महर्षी सुश्रुत यांनी 5 हजार वर्षापूर्वी शस्त्रक्रियेचा शोध लावला होता. त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या 120 पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथात केले आहे. जगभरात शल्यक्रियेचे पितामह म्हणून सुश्रुत यांची ओळख आहे.

176) बॉलिवूडमधील मेरा नाम जोकर (1970) आणि LOC कारगिल (2003) हे दोन्ही चित्रपट तब्बल 255 मिनिटांचे म्हणजेच 4 तास 15 मिनिटांचे आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे दोन सर्वात जास्त वेळेची लांबी असलेले चित्रपट आहेत.

177) स्वीडन या देशातील Stockholm हा जगातील असा एकमात्र शहर आहे जिथे भिकाऱ्यांना भिक मागण्यासाठी लायसेन्स काढावे लागते.

178) स्त्रिया त्यांच्या मृत्यूनंतरही बाळाला जन्म देऊ शकतात याला “कॉफीन बर्थ” असे म्हणतात. या प्रक्रियेत गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या शरीरात निर्माण होणारा वायू बाळाला आईच्या पोटातून बाहेरच्या बाजुस ढकलतो.

179) Virtual Shopping Stores मध्ये ग्राहक LCD स्क्रीनवर दिसणाऱ्या वस्तुंपैकी त्यांना हव्या असलेल्या वस्तु वर क्लिक करून त्या वस्तु निवडतात आणि ज्यावेळेस ते काऊंटर वर Checkout करतात त्यावेळेस निवडलेल्या वस्तु बॅगेत पॅक करून दिल्या जातात.

200 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (200 marathi rochak tathya in Marathi)

180) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 ची आकडेवारी समोर आली. यानुसार, दारू पिण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील पुरुष देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकमधील पुरुष सर्वाधिक दारू पित दारूबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी पुरुष दारू पितात. महिलांचा विचार केल्यास सिक्कीम राज्यातील महिला देशात सर्वाधिक दारु (16.2%) पितात. संपूर्ण देशात दारूपेक्षा तंबाखूचे अधिक सेवन होते.

181) फॅशनच्या नावाखाली कधी कोणती स्टाईल येईल याचा नेम नाही. फाटलेल्या, विरलेल्या जीन्स, फाटलेले स्टॉकिंग्स याची उत्तम उदाहरणे. त्यात आता जगप्रसिध्द इटालियन फॅशन ब्रँड गुचीने चक्क उलटा चष्मा आणलाय. त्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ आलीय. या चष्याची किंमत 56 हजार रुपये आहे. या चष्याचे नाव इन्व्हर्टेड कॅट आय सनग्लासेस असे आहे.

182) जगभरात मधमाशांचा एकूण 20 हजार जाती आहेत. मात्र त्यापैकी केवळ 4 मध बनवू शकतात. मध हजारो वर्षांपर्यंत खराब होत नाही. तसेच मध हे एकमेव खाद्य आहे ज्यामध्ये मानवासाठी आवश्यक सर्व जीवनसत्व उपलब्ध असतात. मधामध्ये ‘फ्रुक्टोज’चे जास्त प्रमाण असते. जे साखरेपेक्षाही 25% अधिक गोड आहे.

183) ईराण या देशाचा रहिवासी असलेला “अबु हाजी” हा जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती आहे. कारण या व्यक्तीने गेल्या 65 वर्षांपासून अंघोळ केलेली नाही, त्याचबरोबर तो मेलेल्या जनावरांचे सडलेले मांस खातो. स्वतःची स्वच्छता केल्यास त्याला आजारपण येते, असे त्याचे मत आहे.

184) म्यानमार या देशात असे एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्ही शरीराने जेवढे बारीक असाल तेवढ्या प्रमाणात डिस्काउंट दिले जाते.

185) Social Distancing चे नियम पाळून पॅरिसमध्ये गव्हाच्या शेतात अशाप्रकारे फॅशन शो भरवण्यात आला होता.

186) आपल्या Footwear साठी जगप्रसिद्ध BATA ही कंपनी भारतीय कंपनी नसून स्वित्झर्लंडची Footwear उत्पादक कंपनी आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमधे आपण 100 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (100 Intresting facts in marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *