यूट्यूब विषयी 20 रोचक तथ्य | Amazing facts about youtube in marathi

यूट्यूब विषयी काही रोचक तथ्य (Amazing facts about youtube in marathi) मित्रांनो यूट्यूब वर व्हिडिओ पाहायला तर सर्वांना आवडते याच यूट्यूब च्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल करिअर सुद्धा बनवलं आहे आता यूट्यूब चा वापर तर सर्वजण करतात. आणि यूट्यूब पूर्ण जगामध्ये गूगल नंतर सर्वात जास्त वापरला जाणारा सर्च इंजिन बनला आहे.

एक काळ होता जेव्हा लोक कोणताही कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही ची वाट बघत होते. परंतु यूट्यूब मुळे हे अगदी सोपे झाले आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण यूट्यूब विषयी काही रोचक तथ्य (Amazing facts about youtube in marathi) जाणून घेणार आहोत.

Amazing facts about youtube in marathi
यूट्यूब विषयी काही रोचक तथ्य (Amazing Facts about Youtube in Marathi)

यूट्यूब विषयी काही रोचक तथ्य (Intresting Facts about Youtube in Marathi)

1) यूट्यूब ची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 ला झाली होती ज्याला Steve Chain, Chad Hurleya आणि Javed Karim यांनी बनवले होते. हे तिघेही PayPal मध्ये काम करत होते.

2) यूट्यूब वर पाहिलं व्हिडिओ जावेद नावाच्या चॅनल वर 23 एप्रिल 2005 ला रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी टाकला होता. हे यूट्यूब चे Co-founder जावेद करीम यांचच चॅनल होत. हा व्हिडिओ फक्त 19 सेकंदाचा होता आणि त्याच नाव होत Me at the zoo.

3) यूट्यूब बनल्यानंतर जवळजवळ 18 महिन्या नंतर 9 ऑक्टोबर 2006 ला गुगल ने 1 अरब 65 डॉलर ला यूट्यूब ला विकत घेतले.

4) आता पूर्ण जगामध्ये 1,300,000,000 इतके लोक यूट्यूब चा वापर करतात.

5) प्रत्येक मिनिटाला यूट्यूब वर जवळजवळ 400 तासांचा व्हिडिओ अपलोड केला जातो.

6) दररोज यूट्यूब वर 5 बिलियन अपेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जातात.

7) ज्याप्रमाणे यूट्यूब ची प्रसिध्दी वाढत आहे ते पाहिलं तर अस वाटत की 2025 पर्यंत 32 वर्षाच्या खालील कोणीही टीव्ही चॅनल चा पॅक खरेदी करणार नाही.

8) भारताच्या मुंबई शहरासहित जगातील 10 शहरांमध्ये यूट्यूब स्पेस नावाची जागा आहे जेथे 10 हजार पेक्षा जास्त Subscribers असलेले लोक जाऊन आपला व्हिडिओ शूट करू शकतात. येथे ग्रीन स्क्रीन पासून sound stage सारख्या अनेक सुविधा आहेत.

9) सन 1998 मध्ये गुगल कंपनी ची सुरुवात करण्यासाठी आपलं Garage देणारी महिला Susan Vojsiki नंतर यूट्यूब ची सीईओ बनली.

10) यूट्यूब वर जवळजवळ 10,113 असे व्हिडिओ आहेत ज्यांचे 1 बिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

यूट्यूब विषयी 20 रोचक तथ्य | 20 Amazing facts about youtube in marathi

11) तुम्हाला माहित आहे का जवळजवळ 80% पेक्षा जास्त यूट्यूब चे views अमेरिकेच्या बाहेरून येतात.

12) जगातील चीन, इराण आणि उत्तर कोरिया हे असे देश आहेत जेथे यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी बंदी आहे.

13) यूट्यूब वर येणाऱ्या सर्व views मध्ये सर्वात जास्त views हे मोबाईल वरून येतात.

14) यूट्यूब वर सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडिओ हा Despacito हा आहे. हे एक साँग आहे जे 4 मिनिट आणि 42 सेकंदाच आहे.

15) आज पूर्ण जगातील सर्वात मोठ यूट्यूब चॅनल भारताच T-Series आहे.

16) यूट्यूब वरील सर्वात लांब व्हिडिओ च नाव The Longest video on YouTube हे आहे. हा व्हिडिओ 596 तास 31 मिनिटे आणि 21 सेकंदाचा आहे.

17) आज यूट्यूब पूर्ण जगामध्ये 76 भाषेमध्ये आणि 88 देशांमध्ये उपलब्ध आहे.

18) इतक्या मोठ्या यूट्यूब कंपनीला चालवण्यासाठी 6,350,000,000 डॉलर इतका खर्च येतो.

19) यूट्यूब वरील सर्वात कमी वयाचा स्टार हा Ryans World channel. या चॅनल चा मालक 6 वर्षाचा असताना 2017 मध्ये यूट्यूब वरून 1 करोड 10 लाख रुपये कमवले होते.

20) यूट्यूब वर काम करणारे लोकांपैकी 50% चॅनल असे आहेत जे वर्षाला 6 फिगर पैसे कमवतात.

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण यूट्यूब विषयी काही रोचक तथ्य (Intresting facts about youtube in Marathi) जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *