पेपॅल काय आहे | How to create PayPal account in Marathi

आपण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी खूप सारे ॲप्स जसे की Paytm, Google Pay, Phone Pay इत्यादीचा वापर करतो.परंतु जर आपल्याला इंटरनॅशनल पेमेंट करायचे करायचे असेल किंवा विदेशातील कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा कंपनी कडून स्वीकारायचे असतील तर हे ॲप्स आपल्या कमी येत नाही.(How to create PayPal account in Marathi) 

या स्थिती मध्ये आपण पेपॅल (PayPal) चा वापर करू शकतो. जे या कामाला खूप सोपे बनवते. ज्याप्रकारे आपल्याला एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर गरजेचा असतो त्याप्रमाणे PayPal मध्ये ईमेल आयडी महत्वाचा असतो. आपल्याला यासाठी बँक अकाऊंट ची माहिती देण्याची आवश्यकता नसते, फक्त ईमेल आयडी सांगितल्यानंतर आपण पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकतो. (PayPal Information in Marathi)
 
Paypal इंटरनॅशनल transction साठी खूप प्रसिद्ध आहे. याचा अनेक देशांमध्ये वापर केला जातो. तुम्हालाही PayPal बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे का? तर आजच्या या पोस्टमध्ये आपण
(PayPal) म्हणजे काय (What is PayPal in Marathi),
पेपॅल (PayPal) अकाऊंट कसे काढावे (How to open PayPal account in Marathi), पेपॅल (PayPal) चे फायदे काय आहेत (PayPal Advantages in Marathi) हे जाणून घेणार आहोत. 
 
 

पेपॅल (PayPal) काय आहे (What is PayPal in Marathi):

PayPal एक अमेरिकन कंपनी आहे ज्याचा उपयोग जगभर ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी केला जातो. हा पैसे पाठवण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. यावर आपण Personal किंवा Business Account बनवून सुरक्षित पद्धतीने व्यवहार करू शकतो. 

 
जगभरामध्ये PayPal चे 35 करोड पेक्षा जास्त युजर्स आहेत. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की PayPal किती प्रसिद्ध आहे आणि किती जास्त लोक याचा उपयोग करतात. 
 
PayPal ही US मध्ये सर्वात जास्त उपयोगात येणारी Online Payment Service आहे. यावरून हे समजते की ऑनलाईन पेमेंट साठी PayPal किती विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. 
 
PayPalवरून पैसे स्वीकारण्यासाठी कोणत्याही Account Number ची गरज लागत नाही. आपला Registered Email Id हा आपला Payment Address असतो. आपण PayPal website किंवा मोबाईल ॲप चा वापर करून transaction करू शकतो.
 

पेपॅल (PayPal) ची स्थापना:

PayPal ची स्थापना डिसेंबर 1998 मध्ये Confinity नावाच्या कंपनी च्या नावाने झाली होती. त्यावेळेस ही कंपनी security software Develop करत होती. 

PayPal चे Founders आहेत Max Levchin, Peter Thiel, Luke Nosek आणि Ken Howery. PayPal साल 1998 मध्ये स्थापन झाली आणि काही वर्षामध्ये eBay ने ही कंपनी खरेदी केली.
 

पेपॅल (PayPal) कसे काम करते (How to work PayPal in Marathi):

सर्वात पहिला आपल्याला Registration करावे लागते. यावेळेस आपल्याला आपला ईमेल आयडी द्यावा लागतो. सर्व व्यवहार याच ईमेल वरून केले जातात. 
 
जेव्हा आपल्याला कोणत्याही PayPal यूजर कडून पैसे स्वीकारायचे असतील तर आपल्याला फक्त आपला ईमेल आयडी सांगावा लागतो. पेमेंट करणारा व्यक्ती PayPal website किंवा ॲप मध्ये लॉगिन करून आपल्या ईमेल आयडी वर पेमेंट करतो. 
 
यामुळे पैसे आपल्या PayPal Account मध्ये येतात. आपण आपल्या PayPal Account मधून पैसे withdraw करु शकतो. त्यासाठी आपल्याला ते पैसे बँक अकाऊंट मध्ये पाठवावे लागतात. परंतु PayPal द्वारे केलेल्या Transaction मध्ये काही चार्जेस लागतात. 
 
 

पेपॅल (PayPal) अकाऊंट चे प्रकार ( Types of PayPal account in Marathi):

जेव्हा आपण PayPal account बनवण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला कोणत्या प्रकारचं अकाउंट काढायचं आहे?
 
PayPal मध्ये Individual, Personal आणि Business असे तीन प्रकारचे अकाउंट असतात. ज्यामधून आपल्याला एक निवडायचे असते. चला जाणून घेऊ या त्या प्रकाराबद्दल:
 

1) Personal Account:

याच नाव Personal यासाठी आहे की याचा उपयोग personal use साठी केला जातो. या अकाउंट मध्ये आपण जवळजवळ 5 क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट एका वर्षामध्ये स्वीकारू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्येक Transaction साठी Transaction fee द्यावी लागते. 
 

2) Premier Account:

हे अकाउंट त्या लोकांसाठी आहे जे जास्त किमतीचे Transaction करतात. याचा वापर आपण बिझनेस उद्देशाने करू शकत नाही. Personal Account च्या तुलनेत येथे आपण Unlimited Credit किंवा Debit card Transaction करू शकतो. आपल्याला प्रत्येक Transaction साठी फी द्यावी लागते. 
 

3) Business Account:

या अकाउंटला जास्त करून बिझनेस साठी तयार केले जाते. येथे आपण बिझनेस साठी एक कंपनी किंवा ग्रुपच्या नावाने अकाउंट चालवू शकतो. 
 
Premier Account प्रमाणे आपण येते Unlimited number Credit आणि Debit card payment स्वीकारू शकतो. परंतु येथे फक्त payment receive करण्यासाठी चार्जेस द्यावे लागतात. यातील जास्तकरून personal आणि Business हेच दोन पर्याय आपल्याला अकाउंट उघडताना पाहायला मिळतात. 
 

पेपॅल (PayPal) अकाऊंट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Important documents for PayPal account in Marathi):

जर आपल्याला एक PayPal अकाऊंट काढायचं असेल तर आपल्याला या तीन डॉक्युमेंट्स ची गरज पडते
  • Bank Account
  • Pan Card
  • Debit Card किंवा Credit Card
 

पेपॅल (PayPal) अकाऊंट कसे बनवावे (How to create PayPal account in Marathi):

जर आपल्यालाही PayPal account काढायचं असेल तर आपण अगदी सहजपणे हे अकाउंट काढू शकतो. फक्त काही मिनिटात आपण अकाउंट काढू शकतो. त्यासाठी या स्टेप्स नक्की फॉलो करा:

 

Step 1:

सर्वात पहिला आपल्याला PayPal.com या PayPal च्या वेबसाईट वर जावे लागेल. येथे Sign up बटणावर करा. त्यानंतर तुम्हाला Personal अकाऊंट पाहिजे की Business अकाऊंट पाहिजे ते सिलेक्ट करा. 
 
यानंतर आणखी काही ऑप्शन्स तुम्हाला भरावे लागतील:
  • आपली Country निवडा. 
  • आपला Email Id टाका. 
  • एक मजबूत पासवर्ड सेट करा. जो की सर्वांपेक्षा वेगळा असेल. 
  • त्यानंतर आणखी एक वेळा Password टाका. 
  • Captcha व्यवस्थित भरा. 
  • आता Continue बटन वर क्लिक करा. 
 

Step 2:

आपण Continue बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन window open होईल. चला मग जाणून घेऊ या आता पुढं काय करायचं
 
  • First Name, Middle Name आणि Last Name टाका. 
  • आता आपली Birth Date टाका. 
  • आपला देश सिलेक्ट करा. 
  • त्यानंतर आपला पत्ता टाका. 
  • त्यानंतर पुन्हा एकदा आपला पत्ता टाका. 
  • आता आपल्याला आपल राज्य select करावं लागेल. 
  • आपल्या शहराचा पिनकोड टाका. 
  • आपला मोबाईल नंबर टाका. 
  • आता आपल्याला Agree Privacy Policy वर क्लिक कराव लागेल. 
  • आता पुढे जाण्यासाठी Agree and Create account वर क्लिक करावे लागेल. 
वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर ईमेल वर एक मेल येईल. त्यानंतर तो मेल verify करावा लागेल. 
 

पेपॅल (PayPal) चे फायदे (Advantages of PayPal in Marathi):

 
तस तर PayPal चे अनेक फायदे आहेत. परंतु आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊ या PayPal च्या फायद्याबद्दल:
 
1) PayPal आपल्याला 100% पेमेंट सुरक्षा देते. 
 
2) आपण घरात बसून आपल्या PayPal account वरून शॉपिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची काही गरज नाही. 
 
3) आपण कोणत्याही दुसऱ्या देशांतही पैसे पाठवू शकतो. तेही खूप कमी चार्जेस मध्ये आणि अगदी सुरक्षित. 
 
4) जर तुम्हाला वाटत असेल की कोणी सेलर तुमच्याबरोबर fraud करत आहे तर आपण त्याच्या वर case file करू शकतो. यामध्ये PayPal सुद्धा आपल्याला मदत करेल. 
 
5) कोणत्याही Transcation मध्ये जर काही प्रोब्लेम आला तर आपण PayPal Support ची मदत घेऊ शकतो. 
 
6) PayPal आपल्याला मध्ये मध्ये काही ऑफर देतो. काही वेळेस शॉपिंग साठी काही coupons सुद्धा PayPal कडून भेटतात. 
 

पेपॅल (PayPal) चे तोटे (Disadvantages of PayPal in Marathi):

 
फायद्याच्या तुलनेने PayPal चे खूप कमी तोटे आपल्याला पाहायला मिळतात. चला मग जाणून घेऊ या PayPal च्या तोट्याबद्दल:
 
1) जर आपल्या अकाउंट मध्ये काही Fraud Activities किंवा Policy Violation झालं तर आपलं अकाउंट PayPal कधीही Freeze करू शकतो. 
 
कारण PayPal एक प्रायव्हेट कंपनी आहे. ज्यावर fedral banking चे rules लागू होत नाहीत. यामुळे आपल्या अकाउंट ला Freeze करण्यासाठी आपली Permission किंवा approval ची गरज नसते. 
 
जर आपल्या अकाउंट ला PayPal ने Freeze केलं तर आपण अकाउंट मधील फंड काढू शकत नाही. यासाठी PayPal ची वाट पाहावी लागेल. 
 

आज आपण काय शिकलो: 

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पेपॅल (PayPal) म्हणजे काय (What is PayPal in Marathi), पेपॅल (PayPal) अकाऊंट कसे काढावे (How to create PayPal account in Marathi), पेपॅल चे फायदे (Advantages of PayPal in Marathi) याची माहिती पाहिली. 
 
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *