कॅपेसिटर म्हणजे काय | Capacitor information in Marathi

Capacitor information in Marathi : मित्रांनो तुम्हाला Capacitor माहित आहे का? तुम्ही इथेपर्यंत आला आहात म्हंटल्यावर तुम्हाला Capacitor बद्दल जाणून घेण्याची नक्कीच आतुरता असेल.

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये Capacitor म्हणजे काय (What is Capacitor in Marathi), Capacitor काय काम करतो (What workes Capacitor in Marathi), Capacitor चे प्रकार कोणते (Types of Capacitor in Marathi) आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

Capacitor information in marathi
कॅपेसिटर म्हणजे काय (Capacitor information in Marathi)

कॅपेसिटर म्हणजे काय (Capacitor information in Marathi)

मित्रांनो Capacitor एक Passive Electric Component आहे जो इलेक्ट्रिक एनर्जी साठवून ठेवतो. Capacitor हा जवळ जवळ सर्व इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो.जसं की रेडिओ असेल किंवा टीव्ही असेल आणि बरेच काही. याला पहिला Condensor च्या नावाने सुद्धा ओळखले जात होते.

Capacitor एका छोट्या बॅटरी प्रमाणे खूप कमी वेळात चार्ज होतो आणि डिस्चार्ज सुद्धा. Capacitor ला हिंदीमध्ये संधारित्र असं सुद्धा म्हणतात. याला मराठीत धारित्र असं सुद्धा म्हणतात.

Capacitor सामान्यपणे दोन प्लेटचा बनलेला असतो. आणि या दोन प्लेट च्या मध्ये Dielectric Material वापरले जाते. ज्यामुळे ते दोन्ही वेगळे होतात. जेव्हा Capacitor ला कोणत्याही पॉवर सोर्स बरोबर जोडले जाते तेव्हा इलेक्ट्रिक चार्ज साठवून ठेवतो. यामध्ये असणाऱ्या दोन्ही प्लेट चार्ज साठवण्याच काम करतात. एका प्लेट वर positive चार्ज असतो तर एका प्लेट वर Negative चार्ज असतो.

कॅपेसिटर (Capacitor) चा शोध कोणी लावला (Who invented Capacitor in Marathi):

Capacitor चा शोध दोन शास्त्रज्ञांनी मिळून लावला आहे. जर्मनीचे Ewald Georg von Kleist आणि डचचे Pieter van Musschenbroek यांनी Capacitor चा शोध लावला.

परंतु याच सर्वात मोठ श्रेय Pieter van Musschenbroek यांना दिलं जातं कारण त्यांनी याचा सर्वप्रथम शोध लावला होता. त्या बरोबरच Capacitor मध्ये येणाऱ्या अनेक प्रकारांचा शोध वेगवेगळया शास्त्रज्ञांनी लावला आहे.

कॅपेसिटरच चिन्ह (Symbol of Capacitor)

Capacitor चे symbol सामान्यपणे तीन प्रकारचे असतात. Fixed Capacitor, Polarized Capacitor, Variable Capacitor यांचे Symbol खाली दिले आहेत: 

Capacitor symbol
Capacitor Symbol
 

कॅपेसिटर काम कसं करत (Working of Capacitor in Marathi)

जर Capacitor च्या एका प्लेटला बॅटरीच्या +ve ने जोडले तर त्यावर +ve चार्ज जमा होतील आणि आणि दुसऱ्या प्लेटला -ve ने जोडले तर त्यावर -ve चार्ज जमा होतील. आणि जर या दोन्ही प्लेटला जवळ आणले तर दोन्ही एक दुसऱ्याच्या विरुद्ध चार्ज होत असल्यामुळे हे दोन्ही आकर्षित होतील.

दोन्ही प्लेटच्या मध्ये Dielectric Material असल्यामुळे दोन्हींमध्ये Electrostatic Field निर्माण होईल. आता बॅटरी जरी काढली तरी दोन्हींमध्ये Potential Difference राहील. आता आपण जर याला कोणताही कंडक्टर जोडला तर या दोन्ही प्लेट मधून करंट फ्लो होईल.

Capacitor एनर्जी निर्माण करत नाही परंतु Electricity जमा करतो. जसं आपण लहानपणी केलेला प्रयोग जेव्हा आपण आपल्या केसातून कंगवा फिरवून कागदाच्या तुकड्याजवळ नेतो तेव्हा ते कागद कंगव्याला चिकटतात. परंतु जर आपण कागद काढले तर परत ते चिकटत नाहीत. याचा सरळ अर्थ होतो की कंगवा डिस्चार्ज झाला.

याचप्रमाणे बॅटरी किंवा दुसरा कोणताही पॉवर सोर्स जेव्हा Capacitor च्या टर्मिनलला जोडला जातो तेव्हा काही मायक्रो किंवा मिनी सेकंदासाठी Capacitor चार्ज होतो. आणि त्याचा वापर केल्यानंतर तो लगेच डिस्चार्ज होतो.

कॅपेसिटरचे प्रकार (Types of Capacitor in Marathi)

मित्रांनो तस तर Capacitor चे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यातील जे महत्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत:

1) Ceramic Capacitor

या प्रकारच्या Capacitor चा वापर अनेक ॲप्लिकेशन मध्ये केला जातो मग ते ऑडियो असेल किंवा रेक्टिफायर असेल. यांच्या किमतीची range ही Picofarade पासून 0.1 Microfarads पर्यंत असते. Ceramic Capacitor चा जास्त करून वापर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये केला जातो. कारण ते स्वस्त आणि विश्वसनीय असतात. तसच त्यांचा Loss Factor खूप कमी असतो. यामध्ये Aluminium च्या दोन प्लेट असतात.

2) Paper Capacitor

ह्या Capacitor ची क्षमता 600 Volt पर्यंत असते. यांचा सर्वात जास्त वापर रेडिओ आणि टीव्ही मध्ये केला जातो.

3) Silver Mica Capacitor

यामध्ये खूप कमी प्रमाणात Capacitance असतो. यावर तापमानाचा खूप प्रभाव पडतो. यांचा वापर रेडिओ आणि Telecommunicatiom सर्किट मध्ये केला जातो. परंतु आता याचा जास्त करून उपयोग केला जात नाही.

4) Electrolytic capacitor

या प्रकारचे Capacitor हे Polarized असतात. यांची Capacitance value खूप जास्त असते. यांचा वापर power supplies, decoupling आणि audio coupling applications मध्ये केला जातो.

5) Tantalum capacitor

Electrolytic Capacitor प्रमाणे हे सुद्धा Polarized असतात. आणि हे सुद्धा खूप जास्त Capacitance देतात.

6) Polyester Film Capacitor

हे Capacitor अशा ठिकाणी वापरले जातात जेथे याच्या किमतीला खूप महत्त्व दिले जाते. यांचा Tolerance खूप कमी असतो.

Capacitance काय आहे

एक Capacitor किती प्रमाणात एनर्जी साठवून ठेवतो याला Capacitance असे म्हणतात. जितका मोठा Capacitor असेल तितकाच तो जास्त चार्ज होतो.

Capacitance कसे मोजतात

Capacitor चा आकार मोजणाऱ्या युनिटला Farads असं म्हणतात. ज्याला इंग्लिश शास्त्रज्ञ Michel Faraday च्या नावावरून नाव देण्यात आले आहे.

Capacitor चा उपयोग

Capacitor चा वापर अनेक सर्किट मध्ये केला जातो. Capacitor AC सप्लाय ला जाऊ देतो आणि DC सप्लाय ला रोखून ठेवतो.घरातील फॅन मध्ये Capacitor चा वापर केला जातो. याचा वापर आपल्याला अनेक सर्किट मध्ये पाहायला मिळतो ते सर्किट पुढीप्रमाणे:

  • Filtration Circuit
  • Coupling Circuit
  • Delay Timing Circuit
  • Capacitor Polority
  • Tuned Circuit
  • Low pass filter
  • Noise Filter
  • High Pass Filter

सारांश (Summary)

आशा आहे की कॅपेसिटर म्हणजे काय (Capacitor information in Marathi) माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. Capacitor म्हणजे काय (What is Capacitor in Marathi) ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

3 thoughts on “कॅपेसिटर म्हणजे काय | Capacitor information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *