सांगली जिल्ह्याविषयी माहिती | Sangli Information in Marathi

Sangli information in marathi : मित्रांनो सांगली हा आपला जिल्हा. संस्कृती आणि परंपरेने नटलेल्या या जिल्ह्यांविषयी (Sangli District Information in Marathi) आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या या पोस्टमध्ये आपण सांगली जिल्ह्याविषयी माहिती जाणून घेणार  आहोत.

सांगली जिल्ह्याविषयी माहिती | Sangli Information in Marathi

 • सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे.
 • सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8572 चौ किमी इतके असून 2011 च्या जनगणनेनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या 28,20,575 इतकी आहे.
 • सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत.
 • सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुके येतात. यामध्ये मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, विटा, कडेगाव, पलूस, वाळवा आणि शिराळा यांचा समावेश होतो.
 • सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत.
 • सांगली जिल्हा कृष्णा नदी व वारणा नदी आणि उत्तरेस महादेवाच्या डोंगरावरील पठार व मानगंगा नदीच्या पात्रात वसलेला आहे.
 • सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो.
 • सांगली जिल्हा महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असल्याने येथील जास्त व्यवहार कानडी भाषेतून होतात.
 • पेशवाईच्या काळात सांगली एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थनावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हे देखील एक संस्थान होते.
 • सांगली येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीता स्वयंवर सादर केले होते.
 • सांगलीची हळद व येथील हळद बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ऊसाचे पीकही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
 • राष्ट्रीय महामार्ग क्र.4 हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग सांगली जिल्ह्यातून जातो.
 • मिरज – पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
 • अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध होत असून मिरज व तासगाव तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत.
 • सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रसिध्द आहे.
 • मराठी नाटकांचे उगमस्थान म्हणून सुद्धा सांगली जिल्ह्याला ओळखले जाते.
 • औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण यांना जन्म देणारी सुधा हीच भूमी आहे.
 • कलावंताचा जिल्हा म्हणून सुद्धा सांगलीला ओळखलं जातं.
 • उत्तम प्रकारच्या तंतू वाद्याची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे एक वैशिष्ठ्य आहे. मिरज येथील तंतू वाद्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे ती जगभर पाठवली जातात.
 • वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.
 • स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता.
 • सांगली जिल्ह्याचा साक्षरता दर 82.62 टक्के इतका आहे.
 • सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
 • सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर, खानापूर, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव, मिरज,शिराळा आणि सांगली हे विधानसभा मतदारसंघ आहेत.
 • सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.
 • सांगली जिल्ह्यात एकूण 25 नागरी सहकारी बँका आहेत.

सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Sangli District Famous Tourist destinations) :

सांगली जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळे लोकांना नेहमीच आकर्षित करतात.

सांगली जिल्ह्यात गणेशदुर्ग किल्ला, गणेश मंदिर, कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम, मिरज, सागरेश्वर अभयारण्य, चांदोली धरण, औदुंबर, प्रचीतगड, बानुरचा भोपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठेएकंदचे सिद्धरामाचे मंदिर, दंडोबा येथील उंच टेकडीवरील शंकराचे प्राचीन मंदिर, विटा तालुक्यातील रेवणसिद्ध प्रसिद्ध मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत.

सांगली जिल्ह्यातील थोर व्यक्ती (Great people of Sangli district):

सांगली जिल्ह्यात अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील, समाजसुधारक लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे, कवी व पटकथा-संवाद लेखक ग. दि. माडगूळकर, थोर नाटककार विष्णुदास भावे, कादंबरीकार लेखक विष्णू सखाराम खांडेकर, लेखक चित्रकार व्यंकटेश माडगूळकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेता गायक आणि नाट्यनिर्माते नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, थोर नाटककार गोविंद बल्लाळ देवल, दादासाहेब वेलणकर, कादंबरीकार ना. स. इनामदार.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, भारतीय क्रिकेटपटू विजय हजारे, दलित चळवळीचे लढाऊ नेते आणि मराठी साहित्यातील लेखक संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक अरुण कांबळे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील, सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणजे सांगलीच.

निष्कर्ष:

आशा करतो सांगली सांगली जिल्ह्याविषयी माहिती (Sangli Information in Marathi) तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद…

Leave a comment