महाराष्ट्रातील नद्यांची नावे व माहिती | Names of rivers in Maharashtra in Marathi

Names of rivers in Maharashtra in Marathi : महाराष्ट्र हे भारतातील एक विकसनशील राज्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याला संस्कृतीचा, संतांचा, अनेक शूरवीरांचा वारसा लाभलेला आहे. याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या वाहतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्यांची नावे (Names of rivers in Maharashtra in Marathi) आणि महाराष्ट्रातील नद्यांची माहिती (Information about rivers in Maharashtra) जाणून घेणार आहोत.

Names of rivers in Maharashtra in Marathi
महाराष्ट्रातील नद्यांची नावे (Names of rivers in Maharashtra in Marathi)

Contents

महाराष्ट्रातील नद्यांची नावे (Names of rivers in Maharashtra in Marathi)

 • नर्मदा नदी
 • पैनगंगा नदी
 • वर्धा नदी
 • वैनगंगा नदी
 • कृष्णा नदी
 • उल्हास नदी
 • पेंच नदी
 • तापी नदी
 • भीमा नदी
 • गोदावरी नदी

महाराष्ट्रातील नद्या नकाशा (River map of Maharashtra)

महाराष्ट्रातील नद्या नकाशा (River map of Maharashtra)

महाराष्ट्रातील नद्या व उगमस्थान

महाराष्ट्रातील नद्या उगमस्थान
नर्मदा नदीअमरकंटक (मध्यप्रदेश)
पैनगंगा नदीअजिंठा (बुलढाणा)
वर्धा नदीसातपुडा (मध्यप्रदेश)
वैनगंगा नदीसिवनी (मध्यप्रदेश)
कृष्णा नदीमहाबळेश्वर (सातारा)
उल्हास नदीखंडाळा (सह्याद्री)
पेंच नदीछिंदवाडा (मध्यप्रदेश)
तापी नदीबैतूल (सातपुडा,मध्य प्रदेश)
भीमा नदीभीमाशंकर (पुणे)
गोदावरीत्र्यंबकेश्वर (नाशिक)
महाराष्ट्रातील नद्या व उगमस्थान

महाराष्ट्रातील नद्या व त्यावरील धरणे

महाराष्ट्रातील नद्याधरणे
गोदावरीजायकवाडी (औरंगाबाद)
नळगंगानळगंगा (बुलढाणा)
पैनगंगापैनगंगा (बुलढाणा)
तानसातानसा (ठाणे)
गोदावरीगंगापूर (नाशिक)
गिरणाचाणकपूर (नाशिक)
भीमाउजनी (सोलापूर)
वेळवंडीभाटघर (पुणे)
मुळा मुळशी (पुणे)
प्रवरा भंडारदरा (अहमदनगर)
कोयना शिवाजी सागर (सातारा)
अंबि पानशेत (पुणे)
वैतरणामोडक सागर (ठाणे)
पेंच तोळलाडोह (नागपूर)
बिंदुसरा बिंदुसरा (बीड)
महाराष्ट्रातील नद्या व त्यावरील धरणे

महाराष्ट्रातील नद्या

महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या : गोदावरी, कृष्णा, भीमा.

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या : तापी, नर्मदा, दमणगंगा, सूर्या तानसा, वैतरणा, कुंडलिका.

महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या : वर्धा, वैनगंगा.

महाराष्ट्रातील नद्या व संगमस्थळे

नद्यांचा संगमसंगमस्थळे
कृष्णा + पंचगंगानरसोबाची वाडी (कोल्हापूर)
कृष्णा + कोयनाकराड (सातारा)
तापी + पांझरामुडावद (धुळे)
तापी + गोमाईप्रकाशे (नंदुरबार)
कृष्णा + वेण्णा माऊली (सातारा)
कृष्णा + येरळाब्रह्मनाळ (सांगली)
प्रवरा + मुळानेवासे (अहमदनगर)
गोदावरी + प्राणहितासिरोंचा (गडचिरोली)
तापी + पूर्णाचांगदेव (जळगाव)
गोदावरी + प्रवराटोके (अहमदनगर)
वर्धा + वैनगंगा प्राणहिता-चपराळा (गडचिरोली)
कृष्णा + वारणाहरिपूर (सांगली)
प्रवरा म्हाळुंगीसंगमनेर (अहमदनगर)
महाराष्ट्रातील नद्या व संगमस्थळे

महाराष्ट्रातील नद्यांची माहिती मराठी (Information about rivers in Maharashtra)

महाराष्ट्रातील नद्यांची नावे (Names of rivers in Maharashtra in Marathi) आपण जाणून घेतली. आता आपण महाराष्ट्रातील नद्यांची माहिती जाणून घेऊ या.

1) नर्मदा नदी

नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून नर्मदा नदी उगम पावते.

गंगा, यमुना, गोदावरी आणि कावेरी प्रमाणेच ‘नर्मदा नदी’ हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. उगमापासून ते मुखापर्यंत नर्मदा नदीकाठी अनेक तीर्थक्षेत्रे वसलेली असल्याने नर्मदा प्रदक्षिणेला हिंदू धर्मात महत्त्व प्राप्त झाले आहे. यास नर्मदा परिक्रमा असे म्हणतात.

2) पैनगंगा नदी

पैनगंगा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा जिल्ह्यात मढ या गावाच्या शिवारात बुद्नेश्र्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयकडे बुलढाणा वाशीम व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून, बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. पुढे ती यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर (चंद्रपूर) येथे वर्धा नदीस उजव्या तीराला येऊन मिळते.

किनवट तालुक्‍यात, पैनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकांमधून विभागला आहे, त्यामुळे पाणी खाली कोसळताना दोन वेगवेगळ्या धारा पडतात. सोनधाबी आणि सहस्रकुंड धबधबा हे पैनगंगा अभयारण्याचे प्रमुख आकर्षण आहे.

3) वर्धा नदी

वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वाहते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.

राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.

4) वैनगंगा नदी

वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांत समुद्र सपाटीपासून 640 मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे 98 किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यांमधून वाहते. गडचिरोली जिल्ह्यात तिचे अतिशय सुंदर आणि मनमोहक रूप बघायला मिळते.

अंधारी, कथणी, कन्हान, गाढवी, गायमुख, खोब्रागडी, चुलबंद, चोरखमारा, थानवर, पोटफोडी, फुअर, बोदलकसा, वाघ, बावनथडी, सुर या वैनगंगेच्या उपनद्या आहेत.

5) कृष्णा नदी

कृष्णा ही दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे 1400 कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये ती वाई, भुईंज, चिंधवली, लिंब गोवे, उडतरे, माहुली(सातारा) कऱ्हाड, औदुंबर, सांगली,मिरज नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास 282 कि.मी.चा आहे.

आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.

6) उल्हास नदी

उल्हास नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती 122 किलोमीटरचे अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. उल्हास नदीचा उगम लोणावळा येथील राजमाची परिसरातील तुंगार्ली धरणात होतो. धरणापासून 3 कि.मी. अंतरावर नदीवर खंडाळा येथे भारतातील 14 व्या क्रमांकाचा प्रसिद्ध कुणे धबधबा आहे.

कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशीर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात.

7) पेंच नदी

पेंच नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला मिळते. या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातून नागपूर शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो. पेंच नदीवर बांधलेल्या मुख्य धरणामध्ये तोळलाडोह धरणाचा समावेश होतो.

8) तापी नदी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही ‘पश्चिमवाहिनी’ नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. 724 कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

9) भीमा नदी

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे 831 कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.

भीमा नदीची नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. मुळा-मुठा आणि भीमा नदीचा संगम पुणे जिल्ह्यातील वाळकी(रांजणगाव बेट) येथे होतो.

भीमा नदीकाठची मंदिरे :

 • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे मंदिर
 • सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर
 • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर
 • कर्नाटकातल्या गाणगापूरचे दत्त मंदिर

10) गोदावरी नदी

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.

गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. जायकवाडी सिंचन प्रकल्प हा अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य उद्यान आहे.

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

महाराष्ट्रातील नद्याउपनद्या
गोदावरीवारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा , दुधना.
कृष्णा कोयना, वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा
तापी गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर, पाझरा
भिमाइंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा
पैनगंगा कन्हान, वर्धा व पैनगंगा
मांजरातेरणा, कारंजी, घटणी, तेरू
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या पूर्णा, नर्मदा, तापी

कोकणातील नद्या

कोकणातील नद्या : वैतरणा नदी, उल्हास नदी, पाताळगंगा नदी, अंबा नदी, कुंडलिका नदी, सावित्री नदी, वशिष्ठी नदी,

दहा नद्यांची नावे

नर्मदा नदी, पैनगंगा नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, कृष्णा नदी, उल्हास नदी, पेंच नदी, तापी नदी, भीमा नदी, गोदावरी नदी.

पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे

पुणे जिल्ह्यातील नद्यांची नावे : मुळा नदी, मुठा नदी.

तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी

तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी : 724 किमी.

नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कोठे मिळते?

नद्यांचे पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते.

कोणती नदी समुद्राला जाऊन मिळते?

सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी गोदावरी आहे.

महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या

महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या : वर्धा, वैनगंगा.

द्वीपकल्पावरील पूर्व वाहिनी नद्यांची नावे

महानदी, ब्राह्मणी, वैतरणा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नार, पालार, वैगई.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्यांची नावे (Names of rivers in Maharashtra in Marathi) जाणून घेतली. महाराष्ट्रातील नद्यांची माहिती मराठी (Information about rivers in Maharashtra) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आशा करतो महाराष्ट्रातील नद्या व उगमस्थान, महाराष्ट्रातील नद्या व त्यावरील धरणे, महाराष्ट्रातील नद्या व संगमस्थळे, महाराष्ट्रातील नद्यांची माहिती मराठी तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

4 thoughts on “महाराष्ट्रातील नद्यांची नावे व माहिती | Names of rivers in Maharashtra in Marathi

 1. Very very useful information shared on net. By you thanks for sharing valuable time spending you and provide this kind of information without cost thanks once again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *