Donkey information in marathi : गाढव हा घोड्यांच्या परिवाराशी संबंधित एक प्राणी आहे. पाच हजार वर्षांपासून हा जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये एका ओझ्याप्रमाने वावरत आहे. अनेक देशांमध्ये याचा उपयोग दुधासाठी केला जातो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात महाग पनीर हे गाढवाच्या दुधापासून बनवले जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi)
- 2 गाढव माहिती मराठी (Gadhav mahiti marathi)
- 3 गाढव या प्राण्याविषयी रोचक तथ्य (Facts about Donkey in marathi)
- 4 गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi)
- 5 आशियाई गाढवाच्या उपजाती
- 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 7 सारांश (Summary)
गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi)
प्राणी | गाढव |
वैज्ञानिक नाव | Equus asinus |
श्रेणी | सस्तन प्राणी |
जात | आय आफ्रिकनस |
आयुर्मान | 25-46 वर्षे |
तुम्हाला माहित आहे का?
जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनवलेले जाते. हे पनीर सर्बिया मध्ये जेसविका येथे बनवले जाते.
1) गाढवाला जमिनीवर लोटांगण घालने खूप आवडते तुम्हाला नक्कीच माहित असेल.
2) गाढवाला पाऊस आवडत नाही.
3) गाढव त्या जागेला सुद्धा लक्षात ठेवू शकते जेथे तो या पूर्वी पंचवीस वर्ष होता. तो त्या गाढवांना सुद्धा लक्षात ठेवू शकतो ज्यांना तो पंचवीस वर्षांपूर्वी मिळाला होता.
4) गाढवाची पिल्ले जन्माच्या तीस मिनिटानंतर उठून उभी राहू शकतात.
5) अन्य जनावरांच्या तुलनेने गाढवाचे दूध मानवाच्या दुधाशी अधिक समानता दाखवते.
6) जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनवलेले आहे. हे पनीर सर्बिया मध्ये जेसविका येथे बनवले जाते.
7) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात छोटा गाढव अमेरिका येथील KneeHi हा आहे. जो फक्त 25 इंच उंच होता.
8) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात मोठा गाढव अमेरिका येथील Romulus नावाचा गाढव आहे. जो 5 फूट 8 इंच उंच होता आणि त्याचं वजन 590 किलो होते.
9) अमेरिकन डेमोक्रेटिक पार्टी यांचे निवडणूक चिन्ह गाढव होते. ज्याला त्यांनी 1828 मध्ये निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले होते.
10) मिस्त्र या देशाची राणी Cleopatra आपली सुंदरता राखून ठेवण्यासाठी गाढवाच्या दुधापासून अंघोळ करत होती.
गाढव माहिती मराठी (Gadhav mahiti marathi)
11) जगभरामध्ये जवळजवळ 44 मिलियन गाढव आहेत.
12) जंगली गाढव फक्त उत्तर आफ्रिकेमध्ये मोरॉक्को ते सोमालिया पर्यंत, अरब मध्ये आणि मध्य पूर्वेला रेगिस्तान आणि सवाना येथे आढळतात.
13) पाळीव गाढव जगभरामध्ये सगळीकडे आढळतात. परंतु ते प्रामुख्याने कोरड्या आणि उष्ण क्षेत्रांमध्ये आढळतात.
14) मध्य पूर्व आणि आफ्रिकेच्या वाळवंटी या क्षेत्रामध्ये अश्या परिस्थितीमध्ये जिवंत राहण्यासाठी शारीरिक रूपाने गाढव काबील असते.
15) नर गाढवाला Jacks आणि मादी गाढवाला Jennets म्हणतात.
16) अति शांत प्रदेशांमध्ये गाढव 60 मैल दूर अंतरावरून सुद्धा दुसऱ्या गाढवाचा आवाज ऐकू शकतो. हे त्याच्या मोठ्या काना मुळे शक्य होते.
17) गाढवाचे मोठे कान त्याच्या शरीराला उष्ण आणि वाळवंटी परिस्थितीमध्ये थंड ठेवण्यासाठी मदत करतात.
18) गाढव दिवसाच्या सकाळी आणि संध्याकाळी जास्त सक्रिय असतात. आणि ते दिवसातील सर्वात उष्ण वेळ आराम करण्यात घालवतात.
19) गाढव एक शाकाहारी प्राणी आहे. तो झाडे, फळे, फुले इत्यादी आहार ग्रहण करतो.
20) गाढव खाण्याला खूप शौकीन असतो. The global Invasive Species Database नुसार एक गाढव एका वर्षामध्ये 2772 किलो अन्न खातो.
गाढव या प्राण्याविषयी रोचक तथ्य (Facts about Donkey in marathi)
21) गाढव समान आकाराच्या घोड्याच्या तुलनेने अधिक मजबूत असतो.
22) घोड्याच्या तुलनेने गाढव आपल्या सुरक्षेशी संबंधित विचार करण्यामध्ये अधिक सक्षम असतात.
23) गाढव नेहमी समूहामध्ये राहण्यास पसंद करतो. एक गाढव बकऱ्यांच्या समूहात सुद्धा खुश राहू शकतो.
24) मादी गाढवाचा गर्भधारणा कालावधी 12 महिन्यांचा असतो.
25) गाढवाच्या मांस ला Poopy म्हणतात.
26) जगातील सर्वात जास्त गाढव इथिओपिया येथे आढळतात. ते जवळजवळ सात मिलीयन इतके. त्यानंतर चीन, पाकिस्तान आणि मेक्सिको येथे आढळतात.
27) गाढव अशा गोष्टी मध्ये कधीच भाग घेत नाही तिथे त्याला धोका वाटतो.
28) गाढव या प्राण्याला पूर्ण जगामध्ये फक्त वजन उचलण्याचे काम लावतात.
29) घोड्याच्या तुलनेमध्ये गाढव कठीण रस्त्यावर चालण्या मध्ये महारथी असतो.
30) गाढव एक सामाजिक प्राणी आहे.
गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi)
31) आफ्रिकेत आता गाढवांच्या आढळून येणार्या दोन जाती आहेत; ईक्वस आफ्रिकेनस सोमॅलिकस आणि ईक्वस आफ्रिकेनस आफ्रिकेनस.
32) आशियातील पाळीव गाढवे मूळ रानटी जातीतूनच उत्पन्न झाली आहेत.
33) वाळवंटात खुरटे गवत असणार्या काही भागांना बेटे म्हणतात. अशा बेटांवर रात्रीच्या वेळी गाढवे चरताना आढळतात. प्रसंगी काही गाढवे एकेकटीही भटकतात.
34) गाढवीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असून केसीन या दुग्धप्रथिनांचे प्रमाण कमी असते.
35) गाढवे सुमारे 13,000 वर्षांपूर्वीपासून पाळली जात असावीत असा अंदाज आहे. सुमारे 3000 वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी आणि सवारीसाठी गाढवांचा वापर होत आला आहे.
36) गाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकराला ‘खेचर’ म्हणतात. घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकराला ‘हिनी’ म्हणतात.
37) गाढव हा एकमेव प्राणी आहे जो सर्व अत्याचार मूकपणे सहन करतो. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर अन्यायाविषयी असंतोष कधीच दिसत नाही.
38) गाढव हा त्याच्या स्वभावामुळे मूर्खपणाचा समानार्थी शब्द मानला जातो.
39) गाढव मुख्यतः धोबी व कुंभार वर्गातील लोक पाळतात.
आशियाई गाढवाच्या उपजाती
- ईक्वस हेमिओनस कुलान गाढव
- ईक्वस हेमिओनस ओनेजर
- ईक्वस हेमिओनस कियांग
- ईक्वस हेमिओनस हेमिप्पस
- ईक्वस हेमिओनस
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
गाढव समानार्थी शब्द मराठी
खेचर, गधा.
गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात?
गाढवाच्या पिल्लाला शिंघरू म्हणतात.
गाढव किती वर्ष जगतो?
गाढव 25 ते 46 वर्षे जगतो.
गाढवाचं लग्न
गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
गाढवांचे काही सामान्य उपयोग काय आहेत?
गाढवांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो, विशेषत: खडकाळ प्रदेश असलेल्या भागात. शेतीत गाड्या आणि नांगर खेचण्यासाठी आणि माल वाहून नेण्यासाठी जनावरे म्हणूनही त्यांचा वापर केला जातो. गाढव चांगले पाळीव प्राणी देखील बनवू शकतात आणि बर्याचदा थेरपी कार्यक्रमांमध्ये वापरले जातात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- ऑक्टोपस प्राणी माहिती मराठी (Octopus information in marathi)
- घोडा प्राणी माहिती मराठी (Horse information in marathi)
- सिंह प्राणी माहिती मराठी (Lion Information in Marathi)
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गाढव प्राणी माहिती मराठी (Donkey information in marathi) जाणून घेतली. गाढव माहिती मराठी (Gadhav mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.