भीमा कोरेगाव खरा इतिहास | Bhima koregaon information in marathi

By | April 25, 2023

Bhima koregaon information in marathi : भिमा कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. परंतु या लढाई विषयी समाजामध्ये जास्त माहिती नाही. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. आजच्या या पोस्टमध्ये आपण भीमा कोरेगाव लढाई माहिती (Bhima koregaon information in marathi) जाणून घेणार आहोत.

भीमा कोरेगाव लढाई माहिती (Bhima koregaon information in marathi)

कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगावमध्ये ब्रिटिश व पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांचे 834 सैनिक ज्यात सुमारे 500 महार सैनिक व पेशव्यांचे 28000 सैनिक यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई 24 तास लढली गेली व ब्रिटिश-महार सैनिकांचा या लढाईत विजय झाला होता.

Bhima koregaon information in marathi
भीमा कोरेगाव खरा इतिहास (Bhima koregaon information in marathi)

भीमा कोरेगाव खरा इतिहास (Bhima koregaon history in marathi)

भीमा कोरेगाव ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी, इ.स. 1818 रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता.

इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 28000 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.

पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. 1800 च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त झाला.

कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.

हेन्री टी प्रिंसेप यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचे वर्णन या पुस्तकात आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे कोणाचा पराभव केला?

पेशवाई व मराठा साम्राज्याचा इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे पराभव केला.

भीमा कोरेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

भीमा कोरेगाव पुणे जिल्ह्यात आहे

भीमा कोरेगाव चित्रपट

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा रमेश थेटे निर्मित आणि दिग्दर्शित, रमेश थेटे फिल्म्स यांच्या बॅनरखालील एक भारतीय हिंदी चित्रपट आहे.
1 जानेवारी 1818 रोजी झालेली कोरेगावची लढाई यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात महार योद्धा म्हणून अर्जुन रामपाल आणि दिगंगना सूर्यवंशी आहेत.

Bhima koregaon Pin Code

412216

भीमा कोरेगाव लढाईदरम्यान काय घडलं?

भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवे गटात झाली. ही लढाई महत्त्वाची आहे कारण ती इंग्रजांसोबत लढलेल्या दलित सैनिकांच्या एका छोट्या तुकडीने जिंकली होती. दलित अस्मितेचे आणि जातीय अत्याचाराविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भीमा कोरेगाव लढाई माहिती (Bhima koregaon information in marathi) जाणून घेतली. भीमा कोरेगाव खरा इतिहास (Bhima koregaon history in marathi) तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

2 thoughts on “भीमा कोरेगाव खरा इतिहास | Bhima koregaon information in marathi

  1. Pooja gawande

    Hi mahiti khup changli v mhahtvachi hoti thank you so much.

    Reply
  2. Pradipkumar Sackheray

    अगदी माेलाची माहीती…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *