Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din : आपली राज्यघटना घडवण्यात डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी (Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din) जाणून घेणार आहोत.
Contents
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी | Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din mahiti Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी 1 डिसेंबर पासून येत असतो.
या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. 25 लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
- जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?
- यशवंत बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती – yashwant babasaheb ambedkar information in marathi
इ.स. 2002 पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. 2017 मध्ये 61 वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी 15 मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.
संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी वर्षानुवर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. निधनापूर्वी आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांच्यासोबत त्यांचे सुमारे ५ लाख अनुयायीही बौद्ध धर्मात सहभागी झाले होते. त्यांना लोक ‘बोधिसत्व’ मानतात. डॉ.आंबेडकर हे बौद्ध गुरू होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात.
या दिवशी जगभरातील आंबेडकर वादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौध्द विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये इ. ठिकाणी महापरिनिर्वाण दिन या दिवशी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतात.
त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते. त्यांचे गुरू भगवान बुद्धाइतकेच प्रभावी आणि सद्गुरु होते असे त्यांचे अनुयायी मानतात. डॉ. आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळेच निर्वाण मिळाले असे ते मानतात. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून मानली जाते.
महापरिनिर्वाण म्हणजे काय?
महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दशः अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.
भीमज्योत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेला साडे 21 लाख रुपये खर्च आला. 11 सप्टेंबर 2019 रोजी या भीमज्योतीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ही भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाऱ्या ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे.
आठ मिलीमीटर काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहते. या ज्योतीला महानगर गॅसतर्फे 24 तास अखंड गॅस पुरवठा केला जातो. गौतम बुद्धांचा, ‘अत्त दीप भव’ म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. याच्या तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली भीमज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर बसवली होती. दुसरी अखंड भीमज्योत ही दादर येथील चैत्यभूमी परिसरातील आहे.
भेटी देणारे उल्लेखनीय व्यक्ती
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2016 रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे 1978 मध्ये चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कोणता दिवस ‘महापरीनिर्वाणदिन’ म्हणून साजरा केला जातो?
6 डिसेंबर
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय?
चैत्यभूमी
दीक्षाभूमी नागपूर
दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर इ.स. 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हटले जाते.
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी (Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din) जाणून घेतली. Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din mahiti Marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
Credits