20+ मराठी भाषा दिन घोषवाक्ये | Slogans on marathi language

Slogans on marathi language : मराठी भाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी राज्यभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी भाषा दिन (Slogans on marathi language) घोषवाक्ये जाणून घेणार आहोत.

Slogans on marathi language
मराठी भाषा दिन घोषवाक्ये (Slogans on marathi language)

मराठी भाषा दिन घोषवाक्ये (Slogans on marathi language)

1) परदेशात वाजती मराठीचे चौघडे, मराठीचे विश्व वसे जगती चोहीकडे.

2) मराठीचा बोलबाला आसमंतात दुमदुमु दया, मायबोली मराठीत मराठी मनामनात रमू दया.

3) मी मराठी भाषा मराठी, प्रत्येक हृदयी आम्ही जपतो मराठी.

4) विकासाचे प्रगतीचे महाद्वार,मराठीचा झेंडा अटकेपार.

5) मराठी माझा अभिमान,मराठी माझा स्वाभिमान.

6) मराठी भाषा नांदे जिथे, ज्ञानाचा काय उणे तिथे.

7) ध्यास मराठीचा मनी रुजवा, मराठीची गोडी भावी पिढीत रुजवा.

8) माझ्या मराठीचा जागर जागर, भरू ज्ञानाची घागर घागर.

9) मराठी भाषा आहे सक्षम, करण्या संस्कृतीचे रक्षण.

10) मराठी भाषा गोड,वाढवी शिक्षणाची ओढ.

मराठी भाषा घोषवाक्ये (Marathi bhasha slogans)

11) मराठी ज्ञानाचा कल्पतरू, हात मराठीचा धरू.

12) मराठीला देऊनिया आकार, कुसुमाग्रजांचे स्वप्न करू साकार.

13) मराठी भाषा पोहचवू घरोघरी, नांदल सर्वत्र ज्ञानाची पंढरी.

14) व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास, चला धरूया मराठीची कास.

15) आपण बाण शान, मराठी असे आपुला पंचप्राण.

16) ध्यास मराठीचा मनी रुजवा, मराठी अस्मिता मनी रुजवा.

17) धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,एवढया जगात माय मानतो मराठी.

18) स्वराज्य तोरण चढे,गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे.

19) साहित्याचा हा खजिना,मराठी वाचवूनी जाणून घ्याना.

20) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.

21) वाहते रक्तातं माझ्या मराठी गर्वांना सांगतो, आहे मी मराठी, संस्कृती माझी माय ती मराठी. अभिमानाची ती माय मराठी !

22) अभंगाचा रचूनी पाया, संतानी घडवली मराठीची काया.

23) जय जय महाराष्ट्र माझा, मनोमनी बसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा, नभी गर्जतो जय महाराष्ट्र माझा!

24) आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहेतमराठी मातीशी !

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मराठी भाषा दिन केव्हा साजरा केला जातो?

27 फेब्रुवारी

27 फेब्रुवारी कोणाचा जन्मदिवस आहे?

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी भाषा दिन घोषवाक्ये (Slogans on marathi language) जाणून घेतली. मराठी भाषा घोषवाक्ये (Marathi bhasha slogans) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे सुद्धा marathi bhasha ghoshvakye असतील तर ती आमच्या पर्यंत नक्की पोहचवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *