भारतातील नद्यांची नावे व माहिती | Information of rivers in India

Information of rivers in India : आपल्या भारत देशांमधून वेगवेगळ्या नद्या वाहतात. भारताच्या अनेक राज्यातून वेगवेगळ्या नद्या वाहतात. काही नद्यांच्या उपनद्या सुद्धा होतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील नद्यांची नावे (Names of Indian rivers) व भारतातील नद्यांची माहिती Information of rivers in India) जाणून घेणार आहोत.

भारतातील प्रमुख नद्यांची नावे व लांबी (Names of Indian rivers)

भारतातील नद्यांची नावेलांबी
गंगा नदी2510 किमी.
गोदावरी नदी 1465 किमी.
यमुना नदी1376 किमी.
नर्मदा नदी1312 किमी.
कृष्णा नदी1300 किमी.
सिंधू नदी1114 किमी.
ब्रह्मपुत्रा नदी916 किमी.
महानदी नदी890 किमी.
कावेरी नदी800 किमी.
तापी नदी 724 किमी.
भारतातील प्रमुख नद्यांची नावे व लांबी

भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या

भारतातील प्रमुख नद्याउपनद्या
गोदावरी नदीइंद्रावती, दारणा, दुधना, सिंधफना, प्रवरा, मांजरा.
कृष्णा नदीवेण्णा, कोयना, पंचगंगा, वारणा, वेरळा.
भीमा नदीनीरा, कन्हा, कुंकडी, माण, मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी, वेळ, घोड व सीना
कावेरी नदीशिमशा, हेमवती, अर्कावती, लक्ष्मणतीर्थ, काबिनी.
गंगा नदी यमुना नदी, घागरा, गोमती, शोण नदी
तापी नदीपूर्णा, गिरणा नदी, वाघूर.
यमुना नदीचंबळ, सिंध, केण, बेटवा.
ब्रम्हपुत्रा नदीमानस, चंपावती, दिबांग
सिंधु नदी झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास.
महानदीसेवनाथ, ओंग, तेल
तुंगभ्रद्रा नदी वेदावती, हरिद्रा, वरद
भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या

भारतातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

भारतातील प्रमुख नद्याउगमस्थान
गंगा नदीगंगोत्री (हिमालय)
सिंधू नदीकैलास पर्वत
ब्रह्मपुत्रा नदीमानस सरोवर
यमुना नदीयमुनोत्री
गोदावरी नदीत्र्यंबकेश्वर (नाशिक)
कृष्णा नदीमहाबळेश्वर (पश्चिम घाट)
कावेरी नदी ब्रम्हगिरी (कर्नाटक)
महानदीसिहाव (छत्तीसगड)
दामोदर नदी छोटा नागपूर
नर्मदा नदीअमरकंटक (मध्य प्रदेश)
तापी नदी मुलताई टेकडयामध्ये (मध्य प्रदेश)
तुंगभ्रद्रा नदी गंगामूळ (कर्नाटक)
भीमा नदीभीमाशंकर
भारतातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

भारतातील नद्यांची माहिती (Information of rivers in India)

भारतातील नद्यांची नावे आता आपण जाणून घेतली आता आपण भारतातील नद्यांची माहिती (Bhartatil nadyanchi mahiti) जाणून घेणार आहोत.

गोदावरी नदी

गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर (900 मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून 10 किमी अंतरावर व समुद्रापासून 80 किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

भीमा नदी

भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात. ती महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे 831 कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते. भीमेला उजवीकडून भामा, इंद्रायणी, मुळा, निरा व माण तर डावीकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात. भीमा नदीचे पाणलोट क्षेत्रफळ 46000 चौरस कि.मी.आहे.

कृष्णा नदी

ही दक्षिण भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे 1400 कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये ती वाई, भुईंज, चिंधवली, लिंब गोवे, उडतरे, माहुली (सातारा), कराड, औदुंबर, सांगली, मिरज नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास 282 कि.मी.चा आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो.

तापी नदी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही ‘पश्चिमवाहिनी’ नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजरात येथील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी आहे. 724 कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

नर्मदा नदी

नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (1078 कि.मी), महाराष्ट्र (72-74 कि.मी), गुजरात (160 कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत.मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून नर्मदा नदी उगम पावते.

गंगा नदी

गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी 2900 कि.मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी 2525 कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.

हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

यमुना नदी

यमुना नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. हिमालयात उगम पावून ही नदी गंगेस मिळते. या नदी च्या काठावर दिल्ली, आगरा, मथुरा व इटावा ही प्रमुख शहरे आहेत. यमुना नदी यमुनोत्री येथून उगम पावते आणि प्रयाग (प्रयागराज) येथे गंगेला मिळते. चंबळ, सेंगर, छोटी सिंधू, बेतवा आणि केन या प्रमुख उपनद्या आहेत. दिल्ली आणि आग्राशिवाय यमुना, इटावा, कालपी, हमीरपूर आणि प्रयाग ही किनारपट्टी असलेली शहरे मुख्य आहेत. प्रयागमधील यमुना एक विशाल नदी म्हणून सादर केली जाते आणि तेथील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्याखालील गंगेमध्ये विलीन होते.

गोमती नदी

गोमती ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नदी आहे. ही नदी पिलीभीत शहराजवळ उगम पावते व सुमारे 900 किमी अंतर वाहत जाऊन गंगा नदीला मिळते. वसिष्ठ ऋषींची कन्या अशी पुराणामध्ये ओळख असलेली गोमती नदी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाली आहे.

ब्रह्मपुत्रा नदी

ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते.

बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते. ब्रह्मदेवाचा पुत्र असे ब्रह्मपुत्रा नदीचे नाव पडले असून हिचे नाव काहीजण ब्रह्मपुत्र असे पुल्लिंगी असल्याचे समजतात.

कावेरी नदी

कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तमिळनाडू व कर्नाटक या राज्यातून वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील तळकावेरी, कर्नाटक येथे आहे. कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.

कावेरी ही दक्षिण भारतातील लोकांसाठी पवित्र नदी आहे आणि तिची पूजा देवी देवी म्हणून केली जाते. कावेरी ही भारताच्या सात पवित्र नद्यांपैकी एक आहे.

सिंधु नदी

सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे. तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते. इग्रजी भाषेत या नदीला इंडस (Indus) म्हणतात. सिंधु संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. हिंदू व हिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे.

सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : वितस्ता (झेलम), चंद्रभागा, इरावती, विपाशा (बियास), शतद्रू (सतलज). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर भाक्रा-नांगल धरण आहे. या धरणामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब (भारत) आणि हिमाचल प्रदेश मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला.

महानदी

महानदी नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात उगम पावते. मध्यप्रदेशात नदी 53% आणि छत्तीसगड आणि ओडिशामध्ये 47% वाहते. समुद्रात पडण्यापूर्वी महानदी कटकजवळ एक महत्त्वपूर्ण डेल्टा बनवते. महानदीवर हिराकुड, नारज, गँगरेल, आणि रुद्री असे बहुउद्देशीय प्रकल्प आहेत. महानदीला ‘छत्तीसगड राज्याची गंगा’ असेही म्हटले जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

गंगा नदी (2510 किमी)

भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

ब्रह्मपुत्रा

भारतातील सर्वात रुंद नदी कोणती?

ब्रह्मपुत्रा

दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

गोदावरी

भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती?

नर्मदा नदी

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील प्रमुख नद्यांची नावे (Names of Indian rivers) जाणून घेतली. भारतातील नद्यांची माहिती (Information of rivers in India) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment