सीव्ही म्हणजे काय | CV full form in marathi

CV full form in marathi : जेव्हा तुम्ही कोठेही नोकरीसाठी अर्ज करत असता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे सीवी (CV) आहे का असं विचारलं जातं. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीव्ही चा फुल फॉर्म (CV full form in marathi) काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

सीव्ही चा फुल फॉर्म काय आहे (CV full form in marathi)

सीव्ही म्हणजे काय (CV information in marathi)

सीव्ही ला आपण बायोडाटा असेसुद्धा म्हणतो. यामध्ये आपण आपल्या जीवनाविषयी लिहितो. परंतु बायोडाटा प्रमाणे आपण यामध्ये प्रत्येक माहिती लिहू शकत नाही. सीव्ही मध्ये आपण नोकरी आणि त्या संबंधित उपयुक्त माहिती लिहू शकतो. सीव्ही मध्ये आपण आपल्या शिक्षणाविषयी माहिती लिहू शकतो.

सीव्ही हा एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीचे शिक्षण, कार्यअनुभव, कौशल्ये, कामगिरी आणि इतर संबंधित माहितीचा सारांश प्रदान करतो. हे प्रामुख्याने नोकरीच्या अर्जांमध्ये वापरले जाते आणि सामान्यत: रेझ्युमेपेक्षा लांब असते.

सीव्ही चा फुल फॉर्म काय आहे (CV full form in marathi)

सीव्ही चा फुल फॉर्म आहे (CV full form in marathi) Curriculum Vitae. यालाच मराठी मध्ये बायोडाटा किंवा शैक्षणिक जीवनाचा अनुभव असे म्हणतात. यालाच हिंदी मध्ये शैक्षिक अभिलेख एवं कार्य अनुभव असे म्हणतात. सीव्ही मध्ये आपण आपली शैक्षणिक योग्यता, कामाचा अनुभव आणि आपल्या विषयी वैयक्तिक माहिती देऊ शकतो.

सीव्ही चा अर्थ काय आहे (CV meaning in Marathi)

सीव्ही म्हणजेच Curriculum Vitae meaning in Marathi चा अर्थ आहे बायोडाटा किंवा शैक्षणिक जीवनाचा अनुभव. सीव्ही बनवताना आपण नेहमी नोकरीच्या अनुसारच त्यामध्ये माहिती द्यावी. . सीव्ही बनवताना आपण नेहमी नोकरीच्या अनुसारच त्यामध्ये माहिती द्यावी.

सीव्ही चा फॉरमॅट कसा असावा (CV format in Marathi)

सीव्ही बनवताना आपण नेहमी नोकरीच्या पदानुसारच त्यामध्ये माहिती द्यावी. ज्यामुळे आपला सीव्ही  recruiter ला समजणे सोपे होईल. कारण कंपनीकडे इतका वेळ नसतो की ते आपली पूर्ण माहिती वाचत बसतील. आणि त्यांना आपल्या विषयी जास्त माहिती जाणून घेण्या मध्ये काही इच्छा नसते. कारण त्यांना आपल्याकडे काय स्किल्स आहेत याविषयी जाणून घ्यायचे असते. 

सीव्हीमध्ये आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, कौशल्ये, आवडी निवडी आणि संदर्भ समाविष्ट असले पाहिजेत. हे आपण अर्ज करत असलेल्या विशिष्ट नोकरीनुसार देखील तयार केले पाहिजे.

सीव्ही बनवणे खूप सोपे असते. सीव्ही बनवताना आपण काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपला सीव्ही दुसऱ्याला समजून घेण्यास खूप सोपे जाईल.

करिअर ऑब्जेक्टिव्ह (Career Objectives)
यामध्ये आपण आपल्या उद्देशा विषयी लिहायला हवे, आणि नेहमी आपल्या उद्देशा विषयी सकारात्मक लिहावे. हेसुद्धा नोकरीच्या पदानुसार विचार करून लिहितात.

शैक्षणिक योग्यता (Educational Details)
यामध्ये आपण आपल्या शैक्षणिक योग्यते विषयी माहिती द्यायला हवी. जसे की आपण आपल्या हायस्कूल पासून ते कॉलेज पर्यंत काय काय शिकले आणि किती मार्क्स पडले इत्यादी.

कार्याचा अनुभव (Work Experience)
यामध्ये आपण या आधी कोणत्या संस्थेमध्ये किंवा कंपनी मध्ये काम केले असेल तर त्या विषयी लिहावे. किंवा आपण सध्या कोणत्या कंपनी मध्ये काम करत आहोत हे लिहिलेले पाहिजे.

इतर कौशल्य (Other Skills)
यामध्ये आपण आपल्या कौशल्य विषयी माहिती लिहू शकतो. आपण कोणत्या नवीन गोष्टी शिकल्या आहेत त्याविषयी सुद्धा आपण येते माहिती लिहू शकतो.

वैयक्तिक माहिती (Personal Information)
यामध्ये आपण आपल्या स्वतः विषयी माहिती लिहावी. जसे की नाव, पत्ता, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयता, लिंग, धर्म आणि भाषा.

सीव्ही मध्ये आपण कोणत्या गोष्टी लिहू नयेत?

सीव्ही मध्ये आपण कधीही आपला फोटो किंवा आपल्याला आधी मिळत असणारा पगार याविषयी लिहू नये. आपल्याविषयी प्रोफेशनल कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा नोकरी सोडण्याचे कारण लिहिण्याची आवश्यकता नसते.

सीव्ही मध्ये आपण आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी किंवा घरातील मेम्बर्स विषयी माहिती लिहिणे आवश्यक नसते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सीव्ही चा फुल फॉर्म (CV full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *