International Workers Day 2022 – जागतिक कामगार दिवस किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन एक मे या दिवशी जगभरातील 80 देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस इसवी सन 1890 पासून जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळीचा गौरवासाठी पाळण्यात येणारा दिवस होय.
या दिवसाला राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून संबोधिले जाते. या दिवशी सरकारी असो नाहीतर खाजगी प्रत्येक कामगाराला या दिवशी सुट्टी असते.
आजच्या या लेखात आपण जागतिक कामगार दिन मराठी माहिती (International Workers Day 2022) जाणून घेणार आहोत. यासोबतच जागतिक कामगार दिनाचा इतिहास माहिती मराठी (international workers day history in Marathi) याविषयी देखील माहिती अभ्यासणार आहोत.
Contents
जागतिक कामगार दिन मराठी माहिती (International Workers Day 2022)
दिनविशेष | आंतरराष्ट्रीय कामगार दिन |
वारंवारिता | दरवर्षी एक मे |
साजरा करणारे | जगभरातील कामगार |
जागतिक कामगार दिनाचा इतिहास माहिती मराठी (international workers day history in Marathi)
सध्याचा ‘मे दिन’ हा 19 व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी ‘आठ तासाच्या कामाच्या दिवसाची’ होती. संदर्भातील पहिली मागणी 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी 1 मे 1886 रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात 8 पोलिसांचा मृत्यू आणि 50 पोलीस जखमी झाले.
या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय’च्या 1889 च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. 1891 च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम – Theme Of International Labour Day
2022 म्हणजेच यंदाची आंतराष्ट्रीय कामगार दिनाची थीम आहे.बालमजुरीविरूद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केद्रिंत करणे.
कामगार दिनाविषयी काही तथ्य
- भारतात 1 मे हा दिवस कामगार दिन, हा हिंदीमध्ये ‘कामगार दिन’ किंवा ‘अंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’, तमिळमध्ये ‘उढाओपालर नाल’ आणि मराठीमध्ये ‘कामगार दिवस’ अशा अनेक नावांनी ओळखला जातो.
- भारताने 1923 साली मद्रास प्रांतात (आताचे चेन्नई) पहिला कामगार दिन साजरा केला.
- 80 पेक्षा जास्त देश (भारतासह) कामगार दिन सुट्टी म्हणून साजरा करतात
- सर्व देशांतील संघटनांना मे दिनी काम न करणे बंधनकारक करण्यात आले.
- 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणूनही साजरा केला जातो.
- लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान हा पहिला गट होता ज्याने भारतात मे दिन साजरा केला.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक कामगार दिन मराठी माहिती (International Workers Day 2022) याविषयी माहिती जाणून घेतली. जागतिक कामगार दिनाचा इतिहास माहिती मराठी (international workers day history in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.