भारतीय संविधान माहिती मराठी | Indian constitution information in marathi

Indian constitution information in marathi : आपल्या भारत देशामध्ये भारतीय संविधानाला सर्वात उच्च पद आहे. सरकार, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान यामधील कोणीही संविधानाच्या वरती नाही. सर्वजण संविधानाच्या कक्षेमध्ये राहूनच काम करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi) जाणून घेणार आहोत.

भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi

Contents

भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi)

शीर्षकभारतीय संविधान
स्वीकारल्याचा दिनांक26 नोव्हेंबर 1949
अंमलबजावणीचा दिनांक26 जानेवारी 1950
एकूण घटना दुरुस्त्या105
दस्तऐवज जतन स्थानसंसद भवन, नवी दिल्ली, भारत
भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi)

1) भारताचे संविधान हे हाताने लिहिलेले एक दस्तऐवज आहे. याला प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या हाताने इट्यालिक स्टाईल मध्ये लिहिलेले आहे. आणि याच्या प्रत्येक पानाला शांतिनिकेतन मधील दोन कलाकार बेवहार राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांनी आपल्या हाताने सजवलेले आहे.

2) भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ज्याला 25 भागांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये 448 आर्टिकल्स आणि 12 पत्रके आहेत. संविधानाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये एक लाख 17 हजार 369 शब्द आहेत, ज्यांना लिहिण्यासाठी एकूण 254 पेनच्या निबचा वापर केलेला आहे. आणि हे संविधान लिहिण्यासाठी जवळ जवळ सहा महिने इतका कालावधी लागला होता. आणि या संपूर्ण कार्यासाठी जवळजवळ 6.3 कोटी इतका खर्च आला होता.

3) आपल्या भारताच्या संविधानाची इंग्रजी आणि हिंदी आवृत्ती आणि तिची सत्यप्रत संसद भवनातील लायब्ररीमध्ये हेलियम च्या बॉक्स मध्ये ठेवलेली आहे.

4) आपल्या भारताचे संविधान बनवण्यासाठी पहिली सभा 9 डिसेंबर 1946 ला झाली होती. आणि बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

5) संविधान सभेमधील एकूण सदस्यांची संख्या 389 होती.

6) भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्णपणे तयार झाले. परंतु अधिकृत रूपाने 26 जानेवारी 1950 ला ते लागू करण्यात आले. आणि हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

7) भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यापूर्वी याला चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. तेव्हा यामध्ये दोन हजार पेक्षा अधिक वेळा संशोधन केले गेले होते.

8) भारताच्या संविधानावर संविधान सभेतील 284 सदस्यांची स्वाक्षरी सुद्धा आहे. ज्यामध्ये 15 महिलांचा सुद्धा समावेश आहे. अधिकतर सदस्यांनी आपली स्वाक्षरी इंग्रजीमध्ये केली आहे.

9) 24 जानेवारी 1950 ला म्हणजेच संविधान लागू होण्याच्या दोन दिवस आधी, संसदेमध्ये स्वाक्षरी करण्यासाठी जाताना पाऊस पडत होता. संविधान सभेतील सदस्यांनी याला शुभ मानले होते. ही संविधान सभेची अंतिम बैठक होती, आणि याच दिवशी संविधान सभेद्वारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.

10) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री, आणि मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष होते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात.

भारतीय संविधानाविषयी काही रोचक तथ्य (Indian constitution information in marathi)

11) भारताचे संविधान जगातील दहा वेगवेगळ्या देशापासून घेतले गेलेले आहे. यामुळे याला उधार घेतलेली बॅग असे सुद्धा म्हणतात. आपले संविधान हे Government of India Act, 1935 वर आधारित आहे.

12) भारताचे राष्ट्रीय प्रतीक सारनाथ ज्यामध्ये वाघ आणि अशोक चक्र आणि घोडे सुद्धा आहेत. याला 26 जानेवारी 1950 रोजी घोषित केले गेले होते.

13) भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुच्छेद अनुसार भारत सर्व राज्यांचा एक संघ आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला स्पष्ट सुद्धा केले होते, भारत एक संघ आहे, आणि कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही.

14) भारतीय संविधानाच्या प्रति जागरूकता वाढविण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

15) भारताच्या संविधानाला जगातील सर्वात चांगल्या सविधाना पैकी एक मानले जाते. कारण आत्तापर्यंत आपल्या संविधानामध्ये फक्त 102 वेळा संशोधन झाले आहे.

16) भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे.

17) संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते.

18) संविधान निर्मात्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानांचे निरीक्षण केले होते आणि ज्या तरतुदीत भारतासाठी राज्यघटना सर्वोत्तम वाटली ती तरतूद भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली होती.

19) भारतीय राज्यघटना डेहराडून येथे प्रकाशित करण्यात आली आणि भारतीय सर्वेक्षणाद्वारे छायाचित्रित करण्यात आली.

20) मूळ संविधान हस्तलिखित आहे, ज्यामध्ये प्रत्येक पान शांतीनिकेतनच्या कलाकारांनी अनोख्या पद्धतीने सजवले आहे. या कलाकारांमध्ये राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांचा समावेश आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

संविधान म्हणजे काय (Sanvidhan mhanje ky)

संविधान हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात.भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi)

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

संविधान सभेत एकूण किती सदस्य होते?

संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते.

घटना संविधान म्हणजे काय?

संविधान किंवा राज्यघटना म्हणजे एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच.

भारताचे संविधान कोणी लिहिले?

भारतीय संविधान प्रेम बिहारी नारायण रायजादा या महनीय व्यक्तीच्या सुंदर अक्षरात लिहिले गेले आहे.

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2021?

भारतीय संविधानात 459 कलमे आहेत.

कोणत्या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले?

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले.

संविधानातील तरतुदी चा अर्थ लावण्याचा अधिकार कोणास आहे?

संविधानातील तरतुदी चा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायव्यवस्था ला आहे.

संविधानाचे प्रकार मराठी

लिखित आणि अलिखित असे राज्यघटनेचे दोन प्रकार केले जातात.

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?

संविधान सभेनं 2 वर्षे ११ महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले आहे.

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?

बी. एन. राव संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते.

संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव

संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

सच्चिदानंद सिन्हा संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते.

संविधान सभेतील महिला सदस्यांची नावे?

अम्मू स्वामीनाथन
दक्षिणानी वेलायुद्ध
सुचेता कृपलानी
दुर्गाबाई देशमुख
हंसा जिवराज मेहता
लीला रॉय
मालती चौधरी
पूर्णिमा बनर्जी
राजकुमारी अमृत कौर
रेनुका रे
सरोजिनी नायडू
विजया लक्ष्मी पंडित
एनी मास्कारेन
कमला चौधरी

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय संविधान माहिती मराठी (Indian constitution information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. भारतीय संविधानाविषयी काही रोचक तथ्य (Facts about Indian constitution in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

One thought on “भारतीय संविधान माहिती मराठी | Indian constitution information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *