मराठी लेखकांची माहिती | Marathi writers information in marathi

Marathi writers information in marathi : एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात. आपल्या मराठी भाषेतील लेखकांची यादी खूप मोठी आहे या मध्ये अनेक बडे लेखक होऊन गेले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi) जाणून घेणार आहोत.

Marathi writers information in marathi
मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi)

मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi)

आज आपण पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर, ना. सी. फडके, रणजित देसाई, ग. दि. माडगूळकर, साने गुरुजी, जयंत नारळीकर, व.पु. काळे आणि राम गणेश गडकरी लेखकांची आज आपण माहिती जाणून घेऊ या.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु.ल. देशपांडे)

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पु.ल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.

गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले आहे.

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इ.स.1960 पासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आहे. पु.ल.देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

प्रल्हाद केशव अत्रे (प्र. के. अत्रे)

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

आचार्य अत्रे यांना विष्णुदास भावे पुरस्कार दिला गेला आहे. आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते.

विष्णु वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर)

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात.

वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (27 फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1991 साली साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे. अंतराळातील एका ताऱ्यास “कुसुमाग्रज” हे त्यांचे टोपणनाव दिले गेले आहे.

नारायण सीताराम फडके (ना. सी. फडके)

नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

रत्‍नागिरी येथे 1940 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. 1962 साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.

रणजित रामचंद्र देसाई

हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

त्यांना स्वामी कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 1973 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित ‘नाच गं घुमा’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले आहे.

गजानन दिगंबर माडगूळकर (ग. दि. माडगूळकर)

हे विख्यात मराठी कवी व पटकथा, संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची खूप आवड होती. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे.

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.

1969 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते.

पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)

हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील खोताचे करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर, इ.स. 1899 रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला.

समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946 च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

श्यामची आई ही पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत.

डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जयंत नारळीकर)

हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. ‘नारायण विनायक जगताप’ या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले.

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

1965 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार, 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार आणि 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.

वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु. काळे)

व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.वसंत पुरुषोत्तम काळे, अर्थात व.पु. काळे, मराठी भाषेतील खुूूप प्रसिद्ध असे लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस,वपुर्झा, हुंकार,असे त्यांचे पत्रसंग्रह आणि ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या आहेत.

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले आहे.

राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज, बाळकराम)

हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, आणि ‘भावबंधन’ ही चार पूर्ण नाटके (आणि ‘राजसंन्यास’ आणि ‘वेड्यांचा बाजार’ ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते. विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत. नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना सुद्धा आहे. राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पु ल देशपांडे यांची नाटके कोणती?

दुर्गा, विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक, झुंझारराव, संगीत शारदा, संशयकल्लोळ.

लेखक कोणाला म्हणतात?

एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi) जाणून घेतली. मराठी भाषेमधील साहित्यिकांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *