25 भारतीय संविधान घोषवाक्य मराठी 2021| Bhartiy sanvidhan ghoshvakye

Bhartiy sanvidhan ghoshvakye : संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय संविधान घोषवाक्य मराठी (Bhartiy sanvidhan ghoshvakye) जाणून घेणार आहोत. याच निमित्ताने महाराष्ट्र सरकारने माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम राबविला आहे.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008 ला आदेश काढून ’26 नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

Bhartiy sanvidhan ghoshvakye
भारतीय संविधान घोषवाक्य मराठी (Bhartiy sanvidhan ghoshvakye)

भारतीय संविधान घोषवाक्य मराठी (Bhartiy sanvidhan ghoshvakye)

नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही
संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही
संविधान भारताचा आधार, 
कोणी नसेल निराधार
वंचितांना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी
स्वातंत्र्य, समता, बंधुता, 
संविधान सांगते एकात्मता
संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एक समान. 
लोकशाहीचा जागर, 
संविधानाचा आदर
अरे डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है!
भारत माझी माऊली 
संविधान त्याची सावली
संविधानाची कास धरू, 
विषमता नष्ट करू

25 भारतीय संविधान घोषवाक्य मराठी

सर्वांना देई दर्जा समान, 
संविधानाचे काम महान
उठ नागरिका जागा हो,
संविधानाचा धागा हो
संविधानाची अफाट शक्ती, 
मुक्त विचार आणि अभिव्यक्ती
हक्क बजाऊ कर्तव्य पाळू,
प्राणपणाने संविधान संभाळू 
कर्तव्य हक्कांचे भान,
मिळवून देते संविधान
विवेक पसरवू जना जनात,
सविधान जागवू मनामनात!
संविधानाची महानता, 
विविधतेत एकता!
समता बंधुता लोकशाही,
संविधाना शिवाय पर्याय नाही
लोकशाही गणराज्य घडवू,
संविधानाचे भान जागवू 
संविधानावर निष्ठा,
हिच व्यक्तीची प्रतिष्ठा
सविधान एक परिभाषा है
मानवता की आशा आहे
आपला देश आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकारी
जातीयतेच्या बेड्या तोडू, 
संविधानाने भारत जोडू
ना एक धर्म से, ना एक सोच से,
ये देश चलता है संविधान से 
अरे सब के मुह मे एक ही नारा,
संविधान हमारा सबसे प्यारा 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कोणत्या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले?

26 नोव्हेंबर 1949

संविधान दिन कधी साजरा केला जातो?

26 नोव्हेंबर

हे देखील वाचा

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय संविधान घोषवाक्य मराठी (Bhartiy sanvidhan ghoshvakye) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *