आपण कोणत्या खंडात राहतो ? Which continent do we live in

Which continent do we live in : मित्रांनो या जगामध्ये सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे ते सात खंड आहेत. तर मित्रांनो आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की आपण कोणत्या खंडात राहतो? चला तर मित्रानो या पोस्टमध्ये आपण आपण कोणत्या खंडात राहतो (Which continent do we live in) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Contents

खंड म्हणजे काय (Continent information in marathi)

खंड हा एक विस्तृत भूभाग आहे जो पृथ्वीवरील महासागरापासून वेगळा दिसतो. खंड व्यक्त करण्यासाठी कोणतेही स्पष्ट निकष नाहीत. वेगवेगळ्या सभ्यता आणि शास्त्रज्ञांनी खंडाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत. परंतु सामान्य मत असे आहे की खंड हे पृथ्वीचे एक खूप मोठा क्षेत्र आहे ज्याच्या सीमा स्पष्टपणे ओळखल्या जाऊ शकतात.

पृथ्वीच्या 7 सर्वात मोठ्या घन पृष्ठभागाच्या तुकड्यांना खंड म्हणतात आणि त्यांना वेगवेगळी नावे देखील दिली गेली आहेत : खंडांची नावे (Continent names in Marathi)

  1. आशिया
  2. आफ्रिका
  3. उत्तर अमेरिका
  4. दक्षिण अमेरिका
  5. अंटार्क्टिका
  6. युरोप
  7. ऑस्ट्रेलिया
आपण कोणत्या खंडात राहतो (Which continent do we live in)

आपण कोणत्या खंडात राहतो (Which continent do we live in)

खंडआशिया
क्षेत्रफळ44,579,000 चौकिमि
लोकसंख्या 4,560,667,108 (2018)
प्रमाण वेळ UTC+2 ते UTC+12
आशिया खंड माहिती (Asia continent information in marathi)

तर मित्रांनो आपण आशिया खंडामध्ये राहतो. आशिया हा पृथ्वीवरील सात भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातील सर्वांत मोठा व सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील 60% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे.

सिंधू संस्कृती, बॅबिलोनियन संस्कृती, सुमेरियन संस्कृती इ. प्राचीन संस्कृतींचा उगम याच खंडात झाला आहे. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, शिख इ. धर्मांचा उदय देखील याच खंडात झाला आहे.

आशिया खंड माहिती मराठी (Asia khand mahiti Marathi)

आशिया खंड भूमध्य समुद्र , गडद समुद्र , आर्क्टिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यांनी वेढलेला आहे. काकेशस पर्वतरांग आणि उरल पर्वत नैसर्गिकरित्या आशियाला युरोप पासून वेगळे करतात.

सूर्य उगवणाऱ्य बाजूचा म्हणून ग्रीक लोकांनी याला आसू हे नाव दिले. आणि त्यानंतर हेच नाव पुढे रूढ झाले. आशिया खंडामध्येचे जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट, पृथ्वीवरील सर्वात कमी उंचीचा भुभाग मृत समुद्र, पृथ्वीवरील सर्वात उंच भूभाग सागरमाथा आहे. आशिया मधील सर्वात जास्त तापमानाचे स्थान जाकोबाबाद आहे. अशियातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण व्हर्कोयानस्क आहे. आशियातील सर्वात जास्त पावसाचे समजले जाणारे ठिकाण मॉसीनराम आहे. आशियातील जास्तीत जास्त दाट लोकवस्तीचा भाग इंडोनेशिया, चीन, भारत या देशात आहे. आशियातील विरळ लोकवस्तीचा भाग वाळवंटे, सायबीरिया या देशात आहे.

आशिया खंडातील देश नकाशा (Asia continent countries map)

आशिया खंडातील देश नकाशा
Source : Nations Online Project

आशिया खंडातील देश आणि त्यांच्या राजधान्या (Countries in Asia and their capitals)

आशिया खंडातील देशराजधानी
भारत नवी दिल्ली
श्रीलंकाश्री जयवर्धनेपुरा कोट्टे
भूतानथिंफु
नेपाळ काठमांडू
कझाकस्ताननुरसुल्तान
तुर्कमेनिस्तान अश्गाबाद
किर्गिझस्तानबिश्केक
ताजिकिस्तानदुशान्बे
उझबेकिस्तानताश्केंत
चीनबीजिंग
जपानटोकियो
उत्तर कोरियाप्यॉंगयांग
दक्षिण कोरियासोल
मंगोलियाउलानबातर
रशियामॉस्को
ब्रुनेईबंदर सेरी बेगवान
कंबोडियाफ्नोम पेन्ह
इंडोनेशियाजकार्ता
लाओसविआंतिआन
मलेशियाक्वालालंपूर
म्यानमारनॅपिडॉ
फिलिपाईन्समनिला
सिंगापूरसिंगापूर
थायलंडबॅंगकॉक
व्हिएतनामहनोई
अफगाणिस्तानकाबुल
बांगलादेशढाका
भूतानथिंफू
इराणतेहरान
मालदीवमाले
पाकिस्तानइस्लामाबाद
येमनसना
संयुक्त अरब अमिरातीअबु धाबी
तुर्कस्तानअंकारा
सिरीयादमास्कस
सौदी अरेबियारियाध
कतारदोहा
ओमानमस्कत
कुवैतकुवैत शहर
इस्रायलजेरुसलेम
इराकबगदाद
आशिया खंडातील देश आणि त्यांच्या राजधान्या

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आशिया खंडातील देशांची नावे सांगा.

आशिया खंडात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, सिक्कीम, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कॉटार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, येमेन, जॉर्डन, सिरिया, इझ्राएल, लेबानन, तुर्कस्तान, रशियाचा आशियांतर्गत भाग, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलीपीन्स, उत्तर व दक्षिण व्हिएटनाम, लाओस, ख्मेर (कंबोडिया), थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनाइ, इंडोनेशिया व मालदीव हे देश आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता

चीन हा आशिया खंडातील सर्वात मोठा देश आणि रशियानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

आपण कोणत्या खंडात राहतो (Aapan kontya khandat rahto)

आपण आशिया खंडात राहतो.

भारत कोणत्या खंडात आहे?

भारत हा आपला देश आशिया खंडात आहे.

आशिया खंडातील बेटे

सिमिलन बेटे
पेरेन्टियन बेटे
पोम पोम बेटे

रशिया कोणत्या खंडात आहे?

रशिया आशिया खंडात आहे.

दक्षिण आशियाई देश

भारत
पाकिस्तान
श्रीलंका
बांगलादेश
नेपाळ
मालदीव
भूतान

पृथ्वीवर किती देश आहेत?

आज जगात 195 देश आहेत. यापैकी 193 देश हे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य राष्ट्र आहेत.

सर्वात मोठा खंड कोणता?

जगातील सर्वात मोठा खंड आशिया आहे.

आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे?

भारत
चीन
जपान
रशिया
इंडोनेशिया

आशिया खंडातील सर्वात प्राचीन पर्वत प्रणाली कोणती?

ट्रान्स हिमालय किंवा टेथिस हिमालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरा हिमालय ही हिमालयातील सर्वात प्राचीन श्रेणी आहे.

आशिया खंडात किती देश आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार आशियामध्ये आज 48 देश आहेत.

आशिया खंडाची लोकसंख्या किती आहे?

4.68 बिलियन म्हणजेच 4680 मिलियन.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आपण कोणत्या खंडात राहतो (Which continent do we live in) याविषयी माहिती जाणून घेतली. आशिया खंड माहिती मराठी (Asia khand mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला aapan kontya khandat rahto ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *