पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतात

मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक पदे आहेत. काही कारणास्तव त्या अधिकाऱ्यांना कधी कधी राजीनामा द्यावा लागतो. किंवा ते स्वतःहूनही कधीकधी राजीनामा देतात. परंतु याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण आपल्या भारत देशातील काही पदे आणि त्यांचा राजीनामा ते कोणाकडे देऊ शकतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतात
पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतात

Contents

पदे व राजीनामा कोणाकडे देऊ शकतात

पदे राजीनामा कोणाकडे देऊ शकतात
राष्ट्रपतीउपराष्ट्रपतीकडे
उपराष्ट्रपतीराष्ट्रपतींकडे
पंतप्रधानराष्ट्रपतींकडे
राज्यपालराष्ट्रपतींकडे
संरक्षण दलाचे प्रमुखराष्ट्रपतींकडे
महालेखापालराष्ट्रपतींकडे
महान्यायवादीराष्ट्रपतींकडे
लोकसभा सदस्यलोकसभा सभापती पतींकडे
लोकसभा सभापतीलोकसभा उपसभापतीकडे
मुख्य निवडणूक आयुक्तराष्ट्रपतींकडे
मुख्यमंत्रीराज्यपालांकडे
महाधिवक्ताराज्यपालांकडे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशराष्ट्रपतींकडे
उच्च न्यायालयाचे न्यायाधीशराष्ट्रपतींकडे
विधानसभा अध्यक्षविधानसभा उपाध्यक्षांकडे
विधानसभा सदस्यविधानसभा अध्यक्षांकडे
लोकपालराष्ट्रपतींकडे
महाराष्ट्र लोकायुक्तराज्यपालांकडे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?

लोकसभेचे सभापती आपला राजीनामा लोकसभा उपसभापतीकडे देतात.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपले राजीनामा पत्र कोणाला पाठवतात?

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपले राजीनामा पत्र राष्ट्रपतींना पाठवतात.

विधान परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?

विधान परिषद सदस्य आपला राजीनामा विधान परिषद अध्यक्ष कडे सादर करतात.

विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?

विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे देतात.

पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो?

पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात.

सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात.

लॉर्ड रिपनने व्हाईसरॉयपदाच्या ________ मध्ये राजीनामा दिला.

लॉर्ड रिपनने व्हाईसरॉयपदाच्या 1884 मध्ये राजीनामा दिला.

राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य कोणाकडे राजीनामा देतात?

राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य राज्यपालांच्याकडे आपल्या सहीनिशी पदाचा लेखी राजीनामा देऊ शकतात.

महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतो?

महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात.

मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात.

राजीनामा देऊन पदमुक्त झालेले पहिले भारतीय पंतप्रधान कोण?

राजीनामा देऊन पदमुक्त झालेले पहिले भारतीय पंतप्रधान मोरारजी देसाई हे आहेत.

आमदार आपला राजीनामा ……………कडे देतात.

आमदार आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देतात.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात?

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींना देतात.

राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात.

नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?

नगराध्यक्ष आपला राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊ शकतात.

अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?

रिचर्ड निक्सन या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती कडे देतात.

उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंचांकडे देतात.

पंचायत समितीचा उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो?

पंचायत समितीचा उपसभापती आपला राजीनामा पंचायत समिती सभापती कडे देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *