आर्द्रता माहिती मराठी | Humidity information in marathi

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आर्द्रता म्हणजे काय (humidity information in marathi), सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.

Humidity information in marathi
आर्द्रता म्हणजे काय (Humidity information in marathi)

Contents

आर्द्रता म्हणजे काय (Humidity information in marathi)

हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते.या आर्द्रतेवर वृष्टी व पाऊस अवलंबून असतात. आर्द्रता नसलेली हवा कोरडी असते. जास्त आर्द्रतेची हवा दमट असते. आर्द्रता म्हणजे हवेतील पाण्याची वाफांची एकाग्रता.

हवामानशास्त्रामध्ये आर्द्रता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती पर्जन्यमानावर आणि विविध प्रकारच्या पर्जन्यमानावर आधारित आहे. आर्द्रतेचे साधारणपणे तीन प्रकार पडतात :

  1. सापेक्ष आर्द्रता
  2. निरपेक्ष आर्द्रता
  3. विशिष्ट आर्द्रता

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय (What is relative humidity in marathi)

हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण (आर्द्रता) मोजण्याचे परिमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. हवेच्या बाष्प धारण क्षमतेला मर्यादा असते. त्या मर्यादेपेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक झाले तर जास्तीच्या बाष्पाचे द्रवीकरण होऊन पाणी बनते.

सापेक्ष आर्द्रतेचे मापन कसे केले जाते?

या पद्धतीत हायग्रिस्टरचा वापर करतात. सापेक्ष आर्द्रता वाढली की हायग्रिस्टरचा विद्युत विरोध कमी होतो. हायग्रिस्टरमधून पसार होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा दाब मोजून सापेक्ष आर्द्रतेचे अनुमान करता येते.

सापेक्ष आर्द्रता व्याख्या

हवेतील बाष्परूपात असलेल्या पाण्याचे प्रमाण (आर्द्रता) मोजण्याचे परिमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता.

साठवणुकीच्या धान्यात किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही?

साठवणुकीच्या धान्यात दहा टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही.

हवेत अधिक आर्द्रता आणि तापमान असेल तर त्यास……………असे म्हणतात.

हवेत अधिक आर्द्रता आणि तापमान असेल तर त्यास हवा दमट झाली असे म्हणतात.

हवेतील आर्द्रता मोजण्याचे साधन

हायग्रोमीटरचा उपयोग हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण मोजण्यासाठी केला जातो.

निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय (What is absolute humidity in Marathi)

हवेच्या दिलेल्या खंडामध्ये असलेल्या एकूण आर्द्रतेला निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. ही आर्द्रता हवेच्या दिलेल्या खंडावर पाण्याच्या वाफेचे वजन दर्शवते .

वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते?

वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रिभवन म्हणतात.

हवेतील बाष्पाचे जलबिंदू रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात

हवेतील बाष्पाचे जलबिंदू रूपांतर होण्याच्या क्रियेला सांद्रिभवन म्हणतात.

हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते?

हवेतील आर्द्रता पावसाळ्यात जास्त असते.

आर्द्रता व ढग फरक स्पष्ट करा.

हवेतील बाष्पामुळे हवेस प्राप्त झालेला ओलसरपणा म्हणजे हवेची आर्द्रता होय.

वातावरणातील बाष्पकण हवेतील धूलीकणांभोवतीएकत्र येऊन तयार झालेला समुच्चय म्हणजे ढग होय.

हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते.

ढग दृश्य स्वरूपात असतात.

निरपेक्ष आर्द्रता कशी काढली जाते?

एका घन मीटर हवेमध्ये किती ग्रॅम आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते.

कृष्ण प्रवाहांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते?

उष्ण प्रवाहाची निर्मिती वाळवंटी प्रदेशात होते.

सागरी प्रवाह म्हणजे काय?

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते.

उष्ण प्रवाहांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते?

उष्ण प्रवाहांची निर्मिती वाळवंटी प्रदेशात होते.

भूकवचाचे दोन भाग कोणते त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय?

खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत.

ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत?

ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह उबदार समुद्र प्रवाह आणि थंड महासागर प्रवाह प्रकारचे आहेत.

भरती ओहोटी म्हणजे काय?

चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते.

वाळवंटी प्रदेशात कोणती आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते?

वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते.

उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात कशाची निर्मिती होते?

उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात दाट धुक्याची निर्मिती होते.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आर्द्रता माहिती मराठी (Humidity information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *