सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे | CDS full form in marathi

CDS full form in marathi : मित्रांनो आपल्या भारत देशाची सेवा करणे हे अनेक लोकांचे ध्येय असते. आणि ते प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. काहीजण वेळेवर कर भरून आपले ध्येय पूर्ण करतात तर काहीजण देशाच्या सेवेसाठी भारतीय सैन्यदलामध्ये सामील होतात. परंतु आज आपण अशाच एका करियर संधीबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे सीडीएस. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे (CDS full form in marathi), सीडीएस म्हणजे काय (CDS information in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सीडीएस म्हणजे काय (CDS information in marathi)

सीडीएस म्हणजेच Combined Defence Service यालाच मराठी मध्ये संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा असे म्हणतात. ही एक प्रकारची परीक्षा आहे जी यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दल, भारतीय वायुदल आणि इंडियन नेव्ही मध्ये अधिकारी म्हणून निवडले जाते.

ही परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा घेतली जाते. म्हणजेच ही परीक्षा फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये आयोजित केली जाते. आणि जे विद्यार्थी या परीक्षा मध्ये यशस्वी होतात त्यांना त्यांच्या ॲकॅडमी मध्ये प्रवेश दिला जातो.

CDS full form in marathi
सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे (CDS full form in marathi)

सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे (CDS full form in marathi)

सीडीएस चा फुल फॉर्म आहे Combined Defence Service यालाच मराठी मध्ये संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा असे म्हणतात. आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय भूदल, भारतीय वायुदल आणि भारतीय वायुदलामध्ये अधिकारी म्हणून निवडले जाते.

सीडीएस परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे (Eligibilty criteria for CDS in marathi)

 • सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आपण भारत, नेपाळ किंवा भूतान या देशाचे नागरिक असणे आवश्यक असते.
 • भारतीय सैन्य दल म्हणजेच Indian military academy (IMA) साठी विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते.
 • भारतीय नौदल म्हणजेच Indian Neval Academy (INA) साठी विद्यार्थ्याकडे अभियांत्रिकीची बॅचलर डिग्री असणे आवश्यक असते.
 • भारतीय वायुदल म्हणजेच Airforce Academy साठी विद्यार्थ्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक असते. याबरोबरच बारावी विज्ञान शाखेमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय असणे सुद्धा आवश्यक असते.
 • ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच Officer Training Academy (OTA) साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक असते.

सीडीएस परीक्षेसाठी वयोमर्यादा (CDS exam age limit in marathi)

 • सीडीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याअगोदर आपल्याला सीडीएस परीक्षेसाठी ची वयोमर्यादा लक्षात घेणे आवश्यक असते.
 • भारतीय सैन्य दल म्हणजेच Indian military academy (IMA) साठी अर्जदाराचे वय 19 ते 24 वर्षे असणे आवश्यक असते.
 • भारतीय नौदल म्हणजेच Indian Neval Academy (INA) साठी अर्जदाराचे वय 19 ते 24 वर्षे असणे आवश्यक असते.
 • भारतीय वायुदल म्हणजेच Airforce Academy साठी अर्जदाराचे वय 19 ते 24 वर्षे असणे आवश्यक असते.
 • ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच Officer Training Academy (OTA) साठी अर्जदाराचे वय 19 ते 25 वर्षे असणे आवश्यक असते.

सीडीएस परीक्षेसाठी वैवाहिक स्थिती पात्रता (Marital Status for CDS exam in Marathi)

भारतीय नौदल म्हणजेच Indian Neval Academy (INA) आणि भारतीय सैन्य दल म्हणजेच Indian military academy (IMA) साठी अर्जदार अविवाहित असणे आवश्यक असते. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच Officer Training Academy (OTA) साठी अर्जदार विवाहित आणि अविवाहित असेल तरीही अर्ज करू शकतो. ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच Officer Training Academy (OTA) साठी पुरुष अर्जदार विवाहित किंवा अविवाहित चालू शकतो.

सीडीएस परीक्षेसाठी शारीरिक पात्रता (CDS physical criteria in marathi)

सीडीएस परीक्षेची शारीरिक पात्रता यशस्वी होण्यासाठी अर्जदार शारीरिक आणि मानसिक स्थिती तंदुरुस्त असायला हवा. डोळे वजन आणि उंची याबाबतीत सुद्धा तो योग्य असावा.

सीडीएस परीक्षेचे स्वरूप (Structure of cds exam in marathi)

सीडीएस परीक्षेचे साधारणपणे दोन टप्पे पडतात पहिला म्हणजे लेखी परीक्षा आणि दुसरा म्हणजे मुलाखत. लेखी परीक्षा ही दोन तासांची असते, आणि तीन पेपर असतात. यामध्ये इंग्लिश, गणित आणि जनरल नॉलेज चा समावेश असतो. प्रत्येक पेपर हा 100 गुणांसाठी असतो. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. आणि मुलाखतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अकॅडमी साठी बोलावले जाते.

लेखी परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर Indian Military Academy, Dehradun, Naval Academy, Goa, Air Force Academy, Begumpet किंवा Officers Training Academy, Chennai यापैकी एका ठिकाणी उमेदवाराची निवड होते.

सीडीएस अधिकारी पगार (CDS officer salary)

प्रत्येक सीडीएस अधिकाऱ्यांचा पगार हा त्याच्या अकॅडमी आणि त्याच्या पदाशी संबंधित असतो. सीडीएस अधिकार्‍याच्या पगारामध्ये भत्ता सुद्धा सामील असतो. साधारणपणे सीडीएस अधिकाऱ्यांचा पगार हा 50 हजार ते 3 लाख असतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सीडीएस चा अर्थ काय आहे (CDS meaning in Marathi)

सीडीएस चा अर्थ आहे Combined Defence Service यालाच मराठी मध्ये संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा असे म्हणतात.

महिला सीडीएस परीक्षा देऊ शकतात का?

हो. महिला ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच Officer Training Academy (OTA) साठी अर्ज करू शकतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे (CDS full form in marathi), सीडीएस म्हणजे काय (CDS information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

2 thoughts on “सीडीएस चा फुल फॉर्म काय आहे | CDS full form in marathi

 1. Khup chagle mahiti aahe he aani khup chagle dought pun clear jhale aani cda madhe namki kay aste te kale

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *