Cow information in marathi : गाय एक पाळीव प्राणी आहे, ज्याला भारतामध्ये मातेसमान मानले जाते. असं म्हणतात की गायीमध्ये 33 करोड देवी देवतांचा वास आहे. गाय दुध देत असल्यामुळे ती खूप उपयोगी प्राणी आहे. गाय एक सरळ आणि शांत प्राणी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण गाय विषयी माहिती मराठी (Cow information in marathi) जाणून घेणार आहोत.
तुम्हाला माहित आहे का ?
विमानातून प्रवास करणारी पहिली गाय Elm Farm Ollie ही होती. जिने 18 फेब्रुवारी 1930 मध्ये विमानातून प्रवास केला होता.

Contents
- 1 गाय विषयी माहिती मराठी (Cow information in marathi)
- 2 गाय बद्दल माहिती (Gai chi mahiti marathi)
- 3 गाय विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Facts about cow in marathi)
- 4 गाय या प्राण्याविषयी माहिती (Cow information in marathi)
- 5 गाय बद्दल माहिती (Gai chi mahiti marathi)
- 6 वारंवार विचारले जाणारे शब्द (FAQ)
- 6.1 गायीच्या प्रजाती विषयी माहिती
- 6.2 सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती
- 6.3 गाईचे वैज्ञानिक नाव काय
- 6.4 गाय किती वर्ष जगते?
- 6.5 गिर गायीची माहिती
- 6.6 गाय किती महिने दूध देते?
- 6.7 गायीच्या घराला काय म्हणतात?
- 6.8 गायीच्या आवाजाला काय म्हणतात?
- 6.9 महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात कोणत्या जातीची गाय आढळते?
- 6.10 ज्या ठिकाणी गायींचा सांभाळ केला जातो त्याला काय म्हणतात?
- 7 निष्कर्ष
गाय विषयी माहिती मराठी (Cow information in marathi)
प्राणी | गाय |
वैज्ञानिक नाव | Bos taurus |
जात | सस्तन |
कुटुंब | बोविडे |
जीवन काळ | 15 वर्ष |
1) मानवाप्रमाणे गाय सुद्धा इतर गायी सोबत दोस्ती निभावते. आणि काही गायी पासून वेगळी सुद्धा राहते.
2) गाय आणि तिचे अनेक प्रकार हिरवा आणि लाल रंग ओळखू शकत नाहीत.
3) गाईचे रुदय एका मिनिटांमध्ये कमीत कमी 60 ते 70 वेळा धडकते.
4) गाईची ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा चांगली असते.
5) एक गाय कमीत कमी पाचशे किलोची असते.
6) गाईच्या शरीराचे तापमान 38 डिग्री सेल्सिअस च्या आसपास असते.
7) एका मिनिटाच्या आत एक गाय कमीत कमी 50 वेळा आपले अन्न चावते.
8) एका दिवसांमध्ये एक गाय साधारणपणे 14 वेळा उठते आणि बसते.
9) एका गाईचा जबडा एका दिवसामध्ये कमीत कमी 40 हजार वेळा हलतो.
10) गाय कधीही गवताला चाऊन खात नाही, ती आपल्या जीभेने गुंडाळून खाते.
गाय बद्दल माहिती (Gai chi mahiti marathi)
11) गाईच्या पोटा मध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे पचन करणारे भाग असतात.
12) मानवा प्रमाणे गाय सुद्धा नऊ महिने गर्भवती असते.
13) एका दिवसामध्ये गाय आठ तास खाते. त्यानंतर आठ तास त्याच अन्नाला चावते आणि त्यानंतर आठ तास झोपते.
14) गाय सीडीच्या वरती चढू शकते. परंतु तिला त्यावरून खाली उतरता येत नाही.
15) गाय कधीही उलट्या करत नाही.
16) गाय एका दिवसामध्ये कमीत कमी 113 लिटर पाणी पिते.
17) गायच्या तोंडामध्ये फक्त खालच्या भागांमध्ये दात असतात.
18) प्रत्येक गायच्या अंगावर लागलेले डागाचे पॅटर्न वेगवेगळे असतात.
19) गाय मुळे एका वर्षात कमीत कमी 22 लोकांचा मृत्यू होतो.
20) प्रत्येक गाय कमीत कमी एकातरी बछड्याला जन्म देते.
गाय विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Facts about cow in marathi)
21) गायचे अनेक प्रकार आहेत.
22) अंटार्टिका सोडून गाय जगातील प्रत्येक ठिकाणी आढळते.
23) फक्त भारतामध्ये जवळजवळ 30 करोड गायी आढळतात.
24) गायीला सुद्धा 32 दात असतात.
25) एका गायीचा जीवन काळ जवळजवळ 35 वर्षाचा असतो.
26) मातीमध्ये गाय घोड्या पेक्षा जास्त वेगाने धावू शकते.
27) गाय त्या गोष्टी सुद्धा खाऊ शकते, ज्या गोष्टी आपण पचवू शकत नाही.
28) गाय नेहमी आपल्याला बछडा जन्मल्यानंतर दूध देते.
29) गाय एक शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे ती कधीही मांस खाऊ शकत नाही.
30) गाय नेहमी एकटे राहणे पसंत करते. ती आपल्या गर्भावस्था मध्ये सुद्धा एकटी असते.
गाय या प्राण्याविषयी माहिती (Cow information in marathi)
31) गाय उभी राहून सुद्धा झोपू शकते.
32) सर्व ऋतूंमध्ये गाईची मोठी चमडी आणि तिचे केस तिचे रक्षण करतात.
33) गाईच्या दुधा मुळेच आपल्याला दुधापासून बनवलेल्या खाण्याच्या वस्तू खावयास मिळतात.
34) एक साधारण गाय दोन वर्षामध्ये एका लहान बछड्याला जन्म देऊ शकते.
35) गाय आपल्या नाकाला आपल्या जीभेने सहजपणे पकडू शकते.
36) खुप वर्षा पूर्वी जेव्हा पैशाचा शोध लागला नव्हता तेव्हा गाईच्या द्वारे लोक गोष्टी खरेदी करत होते किंवा विकत होते.
37) गायी मध्ये बदला घेण्याची भावना खूप लांब काळापर्यंत टिकून राहते.
38) जेथे काही लोक गाईची पूजा करतात तेथेच काही लोक गायीचे मांस खातात. ही एक आपल्या समाजाची शोकांतिका आहे.
39) गाय आपल्या जीवन काळामध्ये जवळजवळ 200000 ग्लास दूध उत्पादन करते.
40) गाय सहा मैल अंतरावरील गंध ओळखू शकते.
गाय बद्दल माहिती (Gai chi mahiti marathi)
41) एका दिवसामध्ये सर्वात जास्त दूध देण्याचे रेकॉर्ड उरबे ब्लैंका (Urbe Blanca) नावाच्या गाईच्या नावावर आहे. जिने एका दिवसामध्ये 241 लिटर दूध दिले होते.
42) जगातील सर्वात जास्त काळ जिवंत राहणारी गाय बिग बर्था (Big Bertha) ही आहे. जिचा 1993 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हा तिचे वय 48 वर्ष 11 महिने आणि 27 दिवस होते.
43) विमानातून प्रवास करणारी पहिली गाय Elm Farm Ollie ही होती. जिने 18 फेब्रुवारी 1930 मध्ये विमानातून प्रवास केला होता.
44) गाईला इंग्लिश मध्ये Cow म्हणतात. सर्व गायी मादी असतात. नराला बैल म्हणतात.
45) गायीचे वैज्ञानिक नाव बोस टौरस (Bos Taurus) आहे.
46) गायीच्या पिल्लाला बछडा (Calf) म्हणतात.
47) गाय साधारणपणे 18 ते 22 वर्षापर्यंत जिवंत राहू शकते. हे तिच्या जातीवर अवलंबून असते.
वारंवार विचारले जाणारे शब्द (FAQ)
गायीच्या प्रजाती विषयी माहिती
जर्सी (Jersey), ब्राऊन स्विस (Brown swiss), होलस्टिन फ्रिजियन (Holatein Friesian) या काही गाईच्या प्रजाती आहेत.
सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती
सर्वात जास्त दूध देणारी गाय गिर गाय आहे.
गाईचे वैज्ञानिक नाव काय
गाईचे वैज्ञानिक नाव बॉस टौरस (Bos Taurus) आहे.
गाय किती वर्ष जगते?
गाईचे आयुष्य जास्तीत जास्त 15-20 वर्ष असते.
गिर गायीची माहिती
गीर गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर प्रतिदिन आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४०-५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे. अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे.
गाय किती महिने दूध देते?
गाय साधारण सात ते आठ महिने दुध देते.
गायीच्या घराला काय म्हणतात?
गायीच्या घराला गोठा म्हणतात.
गायीच्या आवाजाला काय म्हणतात?
गायीच्या आवाजाला रामभण म्हणतात.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात कोणत्या जातीची गाय आढळते?
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लाल कंधारी जातीची गाय आढळते.
ज्या ठिकाणी गायींचा सांभाळ केला जातो त्याला काय म्हणतात?
गाय ठेवलेल्या जागेला गोशाळा म्हणतात.
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण गाय विषयी माहिती मराठी (Cow information in marathi) जाणून घेतली. गाय बद्दल माहिती (Gai chi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.