शेळी माहिती मराठी | Goat information in marathi

Goat information in marathi : शेळी हा एक प्राणी आहे, जो बोविडे कुटुंबाशी संबंधित आहे, त्याचे वैज्ञानिक नाव कॅप्रा एगॅग्रस हिर्कस आहे, जे जंगली कॅप्रा एगॅग्रसची पाळीव उपप्रजाती आहे. शेळ्यांची 45% लोकसंख्या प्रामुख्याने आशियामध्ये आढळते, त्यात सर्वाधिक संख्या चीनमध्ये आढळते, त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा क्रमांक लागतो. शेळीला गरिबांची म्हैस असेसुद्धा म्हणतात. कारण भारतातील गावांमध्ये जे मध्यमवर्गीय लोक राहतात ते म्हैस ऐवजी दुधाळ जनावर म्हणून शेळी पाळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण शेळी माहिती मराठी (Goat information in marathi) जाणून घेणार आहोत.

Goat information in marathi
शेळी माहिती मराठी (Goat information in marathi)

शेळी माहिती मराठी (Goat information in marathi)

प्राणी शेळी
वैज्ञानिक नावCapra aegagrus hircus
आयुष्य १५ – १८ वर्ष
उपप्रजातीकॅप्रा एगॅग्रस
शेळी माहिती मराठी (Goat information in marathi)

1) शेळी नेहमी समूहामध्ये राहणे पसंत करते. शेळी म्हणजेच बकरी परिवाराची भाषा समजून घेते. त्यामुळे ती एकटी न राहता परिवारा मध्ये राहते.

2) शेळी झाडावर सुद्धा चढू शकते. आणि सहजपणे ती उतरू सुद्धा शकते.

3) सर्वात पहिल्यांदा शेळीला सुद्धा कुत्र्याप्रमाणे पाळले जात होते. मानव गेल्या 9000 वर्षापासून बकरीचा दुधासाठी वापर करत आला आहे.

4) शेळी एक असा प्राणी आहे जो संपूर्ण विश्वामध्ये आढळला जातो. शेळीच्या आत्तापर्यंत 300 प्रजाती सापडल्या आहेत.

5) जगातील सर्वात महाग शेळी एक लाख 94 हजार 547 अमेरिकन डॉलर मध्ये विकली गेली होती.

6) जगातील काही देशांमध्ये शेळीला लाकडाची गाडी बरोबर जोडून शेळीची गाडी बनवली जाते. आणि त्यामध्ये लहान मुलांना बसवून फिरवले जाते.

7) गाईच्या दुधापेक्षा शेळीचे दूध चांगले असते. शेळीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा पाच पटीने कमी अणू असतात. याच कारणामुळे शेळीचे दूध पचवणे सहज सोपे होते.

8) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, शर्यतीमध्ये धावणाऱ्या घोड्यांना नेहमी एक दोस्त म्हणून शेळी म्हणजेच बकरी दिली जाते. कारण ते स्टॉल मध्ये स्वतःला एकटे समजू नयेत.

9) शेळी हा जीव पाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पोहू शकतो.

10) शेळीच्या फक्त खालच्या भागांमध्ये दात असतात.

बकरी माहिती मराठी (Bakari mahiti marathi)

11) शेळ्यांच्या केलेल्या एका निरीक्षणानुसार सन 2011 मध्ये संपूर्ण जगभरामध्ये शेळ्यांची संख्या 92 करोड होती.

12) आपल्याला नेहमी असे वाटते की शेळी खूप धाडसी असते. परंतु शेळी हा खूप भित्रा जीव आहे.

13) शेळीचा गर्भकाळ हा जवळजवळ पाच महिन्यांचा असतो.

14) काश्मिरी शेळी लोकरीचे उत्पादन करते. ही शेळी जवळजवळ एक पाउंड लोकरीचे उत्पादन करते.

15) सन 1986 मध्ये युनायटेड स्टेटस मधील टेक्सास शहरातील एका छोट्या गावांमध्ये बियर पिणार्‍या शेळीला महापौर म्हणून निवडून दिले होते.

16) जगभरामध्ये खाल्ले जाणारे सर्व लाल रंगाचे मांस जवळजवळ 70 टक्के शेळीचे असते.

17) एक आरोग्यदायी बकरी जवळ जवळ पंधरा ते अठरा वर्षे जिवंत राहू शकते.

18) बकरीची पिल्ले त्यांच्या जन्माच्या काहीवेळा नंतरच लगेच चालू लागतात.

19) नर बकरी सोबतच मादा बकरी ला सुधा दाढी असते.

20) बकरी एकमेकांसोबत लढण्यासाठी डोके आणि पायांचा वापर करते.

शेळी माहिती मराठी (Sheli chi mahiti marathi)

21) शेळी पर्वतावरील कठीण रस्त्यावर सहजपणे चालू शकते.

22) जगभरामध्ये शेळ्यांच्या अशा सुद्धा अनेक प्रजाती आहेत ज्यांना शिंगे नसतात.

23) जेव्हा शेळीची पिल्ले जन्माला येतात तेव्हा त्यांना शिंगें नसतात, परंतु काही दिवसानंतर त्यांना हळूहळू शिंगे येऊ लागतात.

24) जागतिक अन्न व शेती संघटनेच्या आकडेवारीनुसार 1977 च्या सुमारास भारतात सर्वाधिक शेळ्या होत्या. मात्र 1982 साली जगात  47कोटी 27लाख शेळ्या होत्या. त्या मुख्यतः आफ्रिका, इराण, भूमध्य समुद्रालगतचे प्रदेश व भारतीय उपखंडातील प्रदेश येथे होत्या.

25) उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत काश्मिरी, चांगथांगी, चेंगू किंवा पश्मिना शेळ्या आढळतात.

26) पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांत जमुनापरी, बारबेरी, बीटल या प्रजातीच्या शेळ्या आहेत.

27) गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या कोरड्या भागांत कच्छी, काठेवाडी, जाखराणी, झालावाडी, मारवाडी, मेहसाणा, बेरारी, सिरोही या प्रजाती आढळतात.

28) महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, कोकण कन्याळ, बोएर, संगमनेरी , काठेवाडी शेळ्या आढळतात. उस्मनाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागांत आढळतात.

शेळीपालन

चीन, यूरोपातील देश व उ. अमेरिका येथे शेळ्या मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी पाळतात. अमेरिकेत दुग्धशाळेत 400पर्यंत शेळ्या असतात. मात्र सर्वसाधारणपणे त्या दुधाची कौटुंबिक गरज भागविण्यासाठीच पाळण्याची प्रथा जगभर आढळते. दुग्धोत्पादनाच्या बाबतीत गायीपेक्षा शेळी कमी प्रतीची असली तरी शारीरिक आकारमानाचा विचार करता दुधाळ शेळ्या गायीपेक्षा किती तरी अधिक दूध देतात. समशीतोष्ण कटिबंधातील शेळ्या पचण्याजोग्या दर 100 किग्रॅ. अन्नापासून 185 किग्रॅ. दूध तयार करू शकतात तर गायी एवढ्या अन्नापासून 162 किग्रॅ. दूध तयार करतात. शिवाय ओसाड निर्जल प्रदेशांत त्या गायीपेक्षा सरस आहेत. मात्र वर्षभर सतत दुग्धोत्पादन करण्याच्या दृष्टीने शेळी कमी प्रतीची आहे.

मध्य व्हेनेझुएला, ईशान्य कोलंबिया, अरब देश व भारतीय उपखंड येथे शेळ्या दूध व  मांस यांसाठी पाळल्या जातात. भारतात बंगाल,उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू  , मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र इ. राज्यांत शेळ्या अधिक प्रमाणात पाळल्या जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उस्मानाबादी शेळी किंमत

मोठी शेळी (35 ते 65 किलो वजन) 200 रुपये प्रति किलो तर बोकड 250 रुपये किलो दराने विक्री केली जाते.

शेळीचा गर्भ काळ किती महिन्यांचा असतो?

शेळीचा गर्भ काळ पाच महिन्यांचा असतो.

बोअर शेळी

बोअर ही शेळ्यांमध्ये सर्वांत जास्त वाढीचा वेग असणारी जात आहे. आपल्याकडील वातावरणामध्ये ही जात चांगल्या प्रकारे वाढते. विल्यानंतरचे लहान नर करडाचे वजन 3 किलो, तर मादी करडाचे वजन 2.5 किलो असते. सात महिन्यांच्या नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 45 ते 50 किलो होते.
या शेळीचा गाभण काळ 148 ते 150 दिवसांचा असतो. 50 टक्के शेळ्या दोन करडे देतात. या शेळ्यांची वाढ जास्त असल्याने त्यांच्या वजन वाढीच्या प्रमाणात खाद्य द्यावे लागते. खाद्यामध्ये एक भाग सुका चारा, दोन भाग ओला चारा आणि खुराकही द्यावा लागतो.

उस्मानाबादी शेळी

उस्मानाबादी शेळी ही जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखली जाते. ही  शेळी काटक आहे तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये जुळवून घेणारी आहे. या शेळीची वाढ जलद गतीने होते. साधारणतः वर्षभरातच तिचे वजन ४० किलोच्या जवळपास होते. एकाचवेळी ही शेळी किमान दोन ते पाच पिलांना जन्म देते. त्यामुळे शेळीपालन करणाऱ्यांना फायदा होतो. या शेळीच्या मांसाला जगभर मागणी आहे. शेळी दूध उत्तम दर्जाचे असते तसेच बाजारपेठेत चामड्यालादेखील चांगली मागणी असते. जिरायती शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा चांगला पूरक व्यवसाय ठरतो. 

सानेन शेळी

सानेन ही शेळीची अशी जात आहे जिला दुधाची राणी या नावाने संबोधले जाते. सानेन (sanen) ही जगातील चांगली विकसित झालेली, आणि इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. सानेन शेळीचे मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या (switzerland ) सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे. या जातीच्या कासेवर, कानावर आणि नाकावर काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.  या शेळ्यांचे (goat) कान ताठ, मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो.

शेळीच्या जाती

हिमालयाच्या आसपासच्या भागात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग येथे चंबा, गद्दी व काश्मीरी, पश्मिना, चेगू, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशाचा काही भाग या ठिकाणी जमनापारी, बीटल व बारबारी या जाती आहेत. मध्य भारतात राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशाच्या काही भागांत मारवाडी, मेहसाण, झेलवाडी, बेरारी व काठियावाडीया शेळ्याच्या जाती आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, आंध प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळून येतात.
बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसा व बिहार राज्यात बंगाली शेळी म्हणून ओळखली जाणारी एकच जात प्रामुख्याने आढळते. आसाम मध्ये आसाम हिल ब्रीड (गोट) ही स्वतंत्र जात आहे असे मानतात.

शिरोही शेळी

शेळीची ही जात राजस्थान मध्ये जास्त प्रमाणात आढळते. ती सगळ्यांची विशेष प्रकारचे प्रजाती असून या जातीच्या नाव राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यात पडले आहे. शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या शेळ्यांचे पालन करणे फायदेशीर आहे. या शेळ्या हरणा सारख्या दिसतात आणि चमकदारपने सुंदर अशी शेळी आहे. या जातीची शेळी राजस्थानातील अजमेर व जयपूर मध्ये पाळले जाते. तसेच उत्तर प्रदेश राज्यात देखील या शेळ्यांचे पालन केले जाते.

संगमनेरी शेळी

संगमनेरी शेळी ही जात मांस व दूध उत्पादनासाठी वापरली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले आहे. सोबतच ही शेळी पुणे जिल्ह्याच्या इतरही काही भागात आढळून येते.

बिटल शेळी

या शेळ्याचे मुळस्थान पंजाबमधील गुरुदास हे आहे.
ही शेळी दुधासाठी चांगली मानली जाते.    
या शेळ्या आकाराने मोठ्या असतात.  
कान लांब लटकलेले असतात आणि आत वाकलेले असतात.

शेळी किती महिन्यात येते?

शेळी पाच महिन्यात येते.

निष्कर्ष

मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये आपण शेळी माहिती मराठी (Goat information in marathi) जाणून घेतली. शेळी माहिती मराठी (Sheli chi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *