चित्ता प्राणी माहिती मराठी | Cheetah information in marathi

Cheetah information in marathi : चित्ता जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. हा शंभर किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो. आज पूर्ण जगामध्ये फक्त आफ्रिकेतील काही भागांमध्ये चित्ता आढळून येतो. भारताबरोबरच आशियातील अनेक देशांमध्ये चित्ता लुप्त होत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Cheetah information in marathi
चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi)

चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi)

प्राणीचित्ता
शास्त्रीय नाव ॲकिनोनिक्स जुबेटस
जातसस्तन प्राणी
कुळमांजर कुळ
आयुर्मान 14-20 वर्षे
चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi)

1) चित्ता म्हटले की आपल्याला आफ्रिकेच्या जंगलाची आठवण होते. कारण आपल्याला माहित आहे कि बाकी जगातून चित्ता लुप्त होत आहे. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. आजसुद्धा इराणमध्ये 60 ते 100 इतके चित्ते आढळतात. एक काळ होता जेव्हा भारत-पाकिस्तान आणि रशियाबरोबर मध्यपूर्वेतील देशांमध्ये चित्ता आढळत होता. पण आता अशियातील इराणमध्ये फक्त चित्ते आढळतात.

2) चित्ता खूप कठीण परिस्थितीमध्ये जगतो. याच कारणामुळे चित्ता विलुप्त होत आहे. आफ्रिकेमध्ये नव्वदच्या दशकामध्ये एका संशोधनानुसार असं समजलं की चित्त्याची 95 टक्के पिल्ले वयस्क होण्याच्या आधीच मरतात. म्हणजे चित्त्याच्या 100 पिला मधील मोठी होईपर्यंत फक्त पाच पिल्ले जिवंत राहतात. परंतु 2005 मध्ये आफ्रिकेमध्ये एका पार्क मध्ये केल्या गेलेल्या संशोधनानुसार की त्याची पिल्ले वाचण्याची आशा 36 टक्के झाली होती. चीत्याची पिल्ले मरण्यापाठीमागे शिकारी जनावरे आहेत. यामध्ये वाघ आणि इतर प्राणी सामील होतात. अरबी देशांमध्ये चीत्या ची पिल्ले पाळण्यासाठी खरेदी केली जातात. याची किंमत दहा हजार डॉलर पर्यंत असते.

3) चित्या ची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे त्याचा पळण्याचा वेग. परंतु त्याचा पळण्याचा वेग किती असतो यावर अनेक जणांनी खूप दावे केले आहेत. बीबीसी न्यूज च्या एका रिपोर्टनुसार चित्ता 95 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळतो. हा वेग जगातील सर्वात वेगाने धावणारा माणूस हुसेन बोल्ट त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. चित्ता जेव्हा पूर्ण ताकतीने पळत असतो तेव्हा तो सात मीटर लांब उडी मारू शकतो.

4) चित्ता डरकाळी फोडू शकत नाही. चित्ता हा मांजर कुळातील प्राणी आहे. परंतु चित्ता वाघाप्रमाणे डरकाळी फोडू शकत नाही. तो मांजराप्रमाणे आवाज काढतो. काही चित्ते भुंकतात सुद्धा. परंतु ही गोष्ट सत्य आहे की ते डरकाळी फोडू शकत नाहीत.

5) चित्याला रात्री पाहणे मुश्किल होते. रात्री चीत्याची परिस्थिती माणसाप्रमाणेच असते. यामुळे चित्ता सकाळी किंवा दुपारी शिकार करतो. चित्ता झाडावर सुद्धा चढू शकतो.

6) मादा चित्याचे आयुष्य खूप कठीण असते. त्याला सरासरी नऊ महिने एकटे रहावे लागते. याचाच अर्थ असा की दररोज शिकार करावी लागते. नाहीतर तर तो पिलांचे पोट कसं भरणार. शिकारीच्या वेळी पिल्लांची सुद्धा काळजी घ्यावी लागते. कारण अनेक खतरनाक जनावरे येथे फिरत असतात.

7) चित्ता या प्राण्याचे पाय लांब आणि पातळ असतात त्यामुळे तो अत्यंत वेगाने धावू शकतो.

8) चित्ता या प्राण्याची नजर माणसापेक्षा पन्नास टक्के चांगली असते. कोणत्याही गोष्टीला हे जनावर तीन मैल दूर अंतरावरून अत्यंत सूक्ष्मपणे पाहू शकते.

9) या प्राण्यांमध्ये नर आणि मादी ओळखणे थोडे कठीण असते.

10) अत्यंत वेगाने पळत असताना अचानक आपला वेग कमी करणे हीसुद्धा चित्ता या प्राण्याची खासियत आहे.

चित्ता माहिती मराठी मध्ये (Chitta mahiti marathi)

11) जेव्हा चित्ता या प्राण्याला धोका जाणवू लागतो तेव्हा तो आपले पाय जमिनीवर मारतो.

12) चित्ता मोठ्या आणि मोकळ्या जागेमध्ये राहणे पसंद करतो.

13) एका चीत्याचे हृदय खूप मोठे असते. या कारणामुळे तो खूप वेगाने धावू शकतो. आणि त्याच्या शरीरातील रक्त खूप वेगाने पोहोचते.

14) चित्ता जास्तकरून ससा आणि शहामृग यांची शिकार करतो.

15) चित्ता एका मिनिटांमध्ये दीडशे वेळा श्वास घेतो आणि सोडतो.

16) चित्ता शिकार केलेल्या प्राण्यांची चामडी आणि हाडे खात नाही.

17) चित्ता या प्राण्याला पाण्याची आवश्यकता नसते. त्याने केलेली शिकार खाल्ल्यानंतर त्याला त्यातून पाणी मिळते.

18) एका चीत्याचे आयुष्य जवळ जवळ वीस वर्षे असते.

19) चित्ता या प्राण्याचे शरीर जवळ जवळ तीन ते सहा फूट असते. आणि वजन जवळजवळ 63 किलो असते. 

20) चित्ता या प्राण्याचे 36 प्रकार आहेत.

चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah animal information in marathi)

21) भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता.

22) भारतातील शेवटचा जंगली चित्ता 1951 मध्ये आंध्रप्रदेशात दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. आणि विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत.

23) केनिया, झिंबाब्वे, बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका, नामीबिया, युगांडा इत्यादी देशांत चित्ता आढळतो.

24) 1777 मध्ये, जोहान ख्रिश्चन डॅनियल फॉन श्रेबर यांनी केप ऑफ गुड होपच्या त्वचेवर आधारित चित्ताचे वर्णन केले आणि त्याला फेलिस जुबॅटस असे वैज्ञानिक नाव दिले होते.

25) मादी साधारणपणे एका वेळी दोन ते आठ शावकांना जन्म देते. ती तिच्या लहान मुलांना 16 ते 24 महिन्यांचे होईपर्यंत आणि स्वत: ची काळजी घेण्यास सक्षम होईपर्यंत उंच झाडांनी लपलेल्या कुंडीत पाळते.

चित्ता प्राण्याचे वर्णन

चित्त्याच्या अंगावरचे ठिपके भरीव असतात व चेहऱ्यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्ता ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके. ठिपक्यांमुळे बिबट्या आणि चित्त्यामध्ये लोक नेहेमी गफलत करतात. परंतु दोन्ही प्राण्यात मूलभूत फरक आहे. चित्त्याची शेपटी साधारणपणे 84 सें.मी.पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला पळताना दिशा बदलायला होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख काळा पुंजका असतो.

चित्ता आणि बिबट्या यातील फरक

  • चित्त्याच्या अंगावरचे ठिपके हे भरीव असतात तर बिबट्याचे आतून पोकळ असतात.
  • बिबट्यांची शरीरयष्टी ही भरभक्कम मांजरांसारखी गुबगुबीत असते, तर चित्त्याची कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते.

चित्त्याचा आहार व पद्धत

चित्ता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोट्या हरिणांचा समावेश होतो. आफ्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गॅज़ेल, स्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. तो कधीकधी झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याचे कारण त्याचे खाद्य आहे. हरणे ही देखील अतिशय वेगाने पळू शकतात व त्यांना गाठण्यासाठी चित्त्याला अतिवेग मिळवावा लागतो.

चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरून शिकार टेहळल्यावर भक्ष्याच्या जास्तीत जास्त जवळ दबा धरून जातो व भक्ष्य साधारणपणे 10 ते 20 मीटरवर आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्त्याची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्त्याचा हा क्षण टिपण्यास आतुर असतात.

चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्यापाशी नसते. साधारणपणे 1 ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास शिकारीचा नाद तात्पुरता सोडून देतो. पाठलाग करताना चित्ता आपल्या भक्ष्याला सरळसरळ गळा पकडून ठार मारत नाही. पाठलागादरम्यान सुरुवातीला भक्ष्याला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग तो त्याला मारतो. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागादरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.

चित्ता हा प्राणी नामशेष होण्यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो?

  • चित्त्याच्या भागांपासून बनवलेली उत्पादने खरेदी करू नका.
  • बिग कॅट पब्लिक सेफ्टी ॲक्ट सारख्या चित्त्यांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्याचे समर्थन करा.
  • बेकायदेशीर पाळीव प्राण्यांचा व्यापार चित्ता आणि इतर धोक्यात असलेल्या प्राण्यांना कसा हानी पोहोचवतो याबद्दल संदेश पसरवा.
  • चित्ता संवर्धन निधी सारख्या संवर्धन संस्थांच्या कार्यास समर्थन करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

चित्ता कोठे राहतो?

पूर्वी, चित्ता आफ्रिकन आणि आशियाई खंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला होता, परंतु आता तो मुख्यतः उप-सहारा आफ्रिकेच्या कोरड्या खुल्या गवताळ प्रदेशात मर्यादित आहे, चित्ते नैसर्गिक साठे किंवा उद्यानांमध्ये राहतात.

चित्ता काय खातो?

चित्ता हा मांसाहारी आहे, म्हणून तो जगण्यासाठी मांसावर अवलंबून असतो. त्यांचा आहार प्रामुख्याने स्प्रिंगबोक, स्टीनबोक, थॉमसन गझेल, इम्पालास आणि ड्यूकरसह लहान मृगांचा बनलेला असतो. चित्ता वाइल्डबीस्ट वासरांना आणि कधीकधी, ससा आणि पक्ष्यांसह लहान प्राणी देखील खातो.

आशियाई चित्ता ही प्रजाती मागील शतकात नामशेष का झाली?

शेतकऱ्यांनी केलेल्या शिकारीमुळे, आणि मानवाने जंगलात केलेल्या हस्तक्षेपामुळे.

चित्ता किती वर्ष जगतो?

14-20 वर्ष

चित्त्याचे शास्त्रीय नाव काय आहे?

ॲकिनोनिक्स जुबेटस

चित्ता समानार्थी शब्द मराठी

बिबट्या

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण चित्ता प्राणी माहिती मराठी (Cheetah information in marathi) जाणून घेतली. चित्ता माहिती मराठी मध्ये (Chitta mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “चित्ता प्राणी माहिती मराठी | Cheetah information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *