हरिण प्राणी माहिती मराठी | Deer information in marathi

Deer information in marathi : हरिण हा प्राणी जास्त करून मोठे गवत असलेल्या ठिकाणी राहणारा एक प्राणी आहे. हरीण जगातील सर्व खंडामध्ये आढळून येतो. तो दरवर्षी आपली शिंगे टाकतो. आणि त्या जागी नवीन शिंगे येतात. नवीन हरिणाला शिंगे जन्मानंतर दोन वर्षानंतर विकसित होऊ लागतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi) जाणून घेणार आहोत.

Deer information in marathi
हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi)

हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi)

प्राणीहरिण
वंश पृष्ठवंशीय प्राणी
जातसस्तन प्राणी
वैज्ञानिक नाव Cervidae
आयुष्यमान15-20 वर्षे परंतु प्रजाती आणि स्थानावर अवलंबून.
हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi)

1) जगभरामध्ये हरिणाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आहेत.

2) अंटार्टिका सोडले तर सर्व खंडांवर हरीण पाहायला मिळते.

3) हरीण पर्वतीय क्षेत्रापासून ते उष्ण आणि बर्फाळ प्रदेशात सुद्धा राहू शकते.

4) आफ्रिकेमध्ये आढळणारे हरीण एकमेव असे हरीण आहे ज्याची जात Barbary Red Deer आहे.

5) नर हरणाला Buck म्हणतात. परंतु आकाराने मोठ्या असणार्‍या नरांना Stages म्हणतात. मादा हरिणाला Doe किंवा Hind म्हणतात. एका युवा हरणाला Fawn म्हणतात.
हरणाची सर्वात मोठी प्रजाती आयरिश विशालकाय हिरण (Irish Giant Deer) ही आहे.

6) दक्षिणी पुडु (Southern pudu) हि हरिणाची सर्वात लहान प्रजाती आहे.

7) हरीण प्राण्याची फक्त एक प्रजाती रेनडिअर पाळीव आहे.

8) प्रजातीच्या आधारावर हरिण दहा ते पंचवीस वर्षे जगते.

9) हरीण एक शाकाहारी प्राणी आहे, त्याचा आहार गवत, पाने हे आहे. 

10) पृथ्वीवरील सर्व जीवजंतू पैकी हरणाचे डोळे सर्वात मोठे असतात. या बरोबरच ते खूप सुंदर सुद्धा असतात.

हरिण विषयी माहिती (Harin information in marathi)

11) हरणाला रात्री पाहण्याची क्षमता खूप चांगली असते.

12) हरणाकडे वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता खूप तीव्र असते.

13) हरणाची पिल्ले जन्मल्यानंतर दहा मिनिटांमध्ये उभी राहू शकतात आणि 7 तासानंतर चालू शकतात.

14) जेव्हा हरणाला असं वाटतं की आता आपल्याला धोका आहे तेव्हा ते हरीण दुसऱ्यांना सांगण्यासाठी आपली शेपटी उंच करते.

15) हरीण या प्राण्याच्या शरीरामध्ये पित्ताशय नसतो.

16) हरीण खूप चांगल्या प्रकारे पोहू शकते.

17) हरिणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक सारंग हरीण (Cervidae) आणि दुसरे कुरंग हरीण (Antelope).

18) सारंग हरीण उर्फ सारंगाद्य कुळ, यात सांबर, चितळ, कस्तुरी मृग, बाराशिंगा, भेकर, थामिन, रेनडियर, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण (Hogdeer) तसेच पिसोरी इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.

19) कुरंग हरीण हे गवयाद्य कुळातील उप कुळ आहे. यात काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण इत्यादी प्रकार मोडतात. यांच्यात एकदा आलेली शिंगे गळून पडत नाहीत.

20) हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात, त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे.

हरिण माहिती मराठी (Harin mahiti marathi)

21) जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते.

22) बहुतेक सर्व नर हरणांना शिंगे असतात. अपवादात्मक जातींच्या माद्यांना शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे नरांच्या शिंगापेक्षा लहान आणि नाजूक असतात.

23) हरिण हा प्राणी सहसा कळपाने राहतो. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात.

24) हरणांचा गर्भधारणा कालावधी 180 ते 240 दिवसांच्या दरम्यान असतो.

25) हरणांची शिंगे खूप वेगाने वाढतात.

26) हरणाच्या काही प्रजाती लहान पक्ष्यांना खातात.

27) उत्तर अमेरिकेत, सर्व सस्तन प्राण्यांमध्ये हरिण हा मानवांसाठी सर्वात मोठा धोका मानला जातो.

28) याकुशिमा या जपानी बेटावर मकाक माकडांकडून हरणांची देखभाल केली जाते आणि त्यांना अन्न दिले जाते. त्या बदल्यात माकडांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या पाठीवर स्वार होऊ देतात.

29) हरिण 10 फूट उंचीपर्यंत उडी मारू शकते.

30) हिवाळ्यात, अन्न उपलब्ध नसल्यामुळे ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हरीण कमी सक्रिय असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हरिण च्या पिल्लाला काय म्हणतात?

Fawn (फौन)

हरिण समानार्थी शब्द मराठी

मृग, हरण

हरणाची लहान आकाराची जात

पिसूरी हरीण तथा पिसोरी

स्वतःचा निवारा स्वतः तयार करणारे कोणकोणते प्राणी आहेत?

कस्तुरी हरिण

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण हरिण प्राणी माहिती मराठी (Deer information in marathi) माहिती जाणून घेतली. हरिण माहिती मराठी (Harin mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *