अस्वल प्राणी माहिती मराठी | Bear information in marathi

Bear information in marathi : मदारीच्या खेळामध्ये तुम्ही अस्वलाला नक्कीच पाहिले असेल. अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण अस्वल प्राणी माहिती मराठी (Bear information in marathi) जाणून घेणार आहोत.

Bear information in marathi
अस्वल प्राणी माहिती मराठी (Bear information in marathi)

अस्वल प्राणी माहिती मराठी (Bear information in marathi)

प्राणीअस्वल
वंशपृष्ठवंशीय
वर्गसस्तन प्राणी
वैज्ञानिक नावUrsidae
आयुष्यमान 30-50 वर्षे
अस्वल माहिती मराठी (Bear animal in marathi)

1) अस्वलाच्या तोंडातील दात आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावू शकतो.

2) अस्वलाचे कातडे त्याला उष्ण ठेवण्यास मदत करते.

3) अस्वल खूप बुद्धिमान प्राणी आहे. जर कोणी शिकारी त्याची शिकार करण्यासाठी चारा घालत असेल तर अस्वल त्याला लगेच शोधू शकतो.

4) जंगलामध्ये अस्वल जवळ जवळ तीस वर्षापर्यंत जगतो. परंतु प्राणीसंग्रहालयामध्ये हाच अस्वल 50 वर्षापर्यंत शकतो.

5) फक्त ध्रुवीय अस्वल मांसाहारी असतात. आणि बाकीचे सर्व अस्वल सर्वभक्षी म्हणजेच जनावरे आणि झाडाची पाने दोन्ही खातात.

6) सर्व अस्वलांचे पंजे खूप मोठे असतात. याशिवाय त्यांची जीभ सुद्धा खूप लांब असते. जी साडेनऊ इंच असते.

7) अस्वल 64 किलोमीटर प्रतितास वेगाने धाऊ शकतो. जे की एका धावत्या घोड्याला पकडण्यासाठी उपयोगी पडते.

8) एका अस्वलाची हृदयगती चाळीस प्रतिमिनिट असते.

9) काही अस्वल आपल्या पाठीमागच्या दोन्ही पायांनी सुद्धा चालू शकतात.

10) काळे अस्वल पूर्णपणे काळे नसतात. परंतु ते इंद्रधनुष्य प्रमाणे दिसतात.

अस्वल विषयी माहिती (Bear animal in marathi)

11) अस्वल एक असा स्तनधारी प्राणी आहे जो आपल्याला वेगवेगळ्या रंगांमध्ये सुद्धा दिसू शकतो.

12) एक पोहणारा ध्रुवीय अस्वल पाण्यामध्ये आठ फूट लांब उडी मारू शकतो.

13) एक झुबिया अस्वल न थांबता 160 किलोमीटर चालू शकतो.

14) अस्वल मनुष्या प्रमाणेच पोहू शकतो. परंतु त्याची ऐकण्याची क्षमता थोडी कमी असते.

15) अस्वलाला जास्तीत जास्त 42 दात असतात.

16) अस्वलाच्या एकूण आठ प्रजाती जिवंत आहेत.

17) अस्वल जास्त करून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि दक्षिण अमेरिका या बेटांवर आढळतो.

18) अस्वल झाडावर सुद्धा चढू शकतात.

19) सर्वात जास्त वजन असणाऱ्या ध्रुवीय अस्वलाचे वजन 1002 किलोग्रॅम आहे.

20) अस्वल पाण्यामध्ये काही तासांपासून ते एक दिवसांपर्यंत राहू शकतो.

अस्वल प्राण्याविषयी काही रोचक तथ्य (Facts about bear in marathi)

21) पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखील काळ्या रंगाची असते, फक्त त्यांच्या केसांचा रंग पांढरा असतो.

22) अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.

23) उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो, तर चीन मधील पांडा जातीचा अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खातात. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकतात.

24) कळपात राहण्यापेक्षा अस्वल एकटे राहणे पसंत करतात.

25) नर आणि मादी फक्त पिल्लांना जन्म देण्यासाठी एकत्र येतात आणि नंतर वेगळे होतात. बाळांच्या जन्मानंतर, हे लहान अस्वल काही काळ त्याच्या आईकडे राहते.

26) अस्वल बहुतेक वेळा दिवसा सक्रिय असतात, परंतु ते कधीकधी फिरताना किंवा रात्री अन्न शोधताना आढळतात.

27) अस्वल अनेकदा गुहांमध्ये किंवा जमिनीतील मोठ्या खड्ड्यांमध्ये त्यांची घरे बनवतात.

28) अस्वलाला संस्कृतमध्ये “रिक्ष” म्हणतात, ज्यावरून “अस्वल” हा शब्द आला आहे. अस्वलाला इंग्रजीत “Bear” म्हणतात. पर्शियन भाषेत अस्वलासाठी ” खुर्स ” ( خرس ) हा शब्द आहे.

29) अस्वलाला अनेक प्रकारच्या मनोरंजनासाठी आणि नृत्य करण्यासाठी सुद्धा वापरले जाते.

30) ध्रुवीय अस्वल ही सर्वात मोठी अस्तित्वात असलेली प्रजाती मानली जाते.

31) अस्वलाचा गर्भधारणा कालावधी सहा ते नऊ महिने असतो.

32) अस्वलांचा अधिवास नष्ट होण्यापासून संरक्षण करण्यासाठी जगाच्या अनेक भागात कायदे केले गेले आहेत.

ध्रुवीय अस्वल माहिती मराठी (Polar bear information in marathi)

ही आर्क्टिक महासागर व आसपासच्या भागात राहणारी अस्वलाची एक प्रजाती आहे. जरी बहुतेक ध्रुवीय अस्वल जमिनीवर जन्माला आले असले तरी ते त्यांचा बराचसा वेळ समुद्रात घालवतात म्हणून त्यांना समुद्री अस्वल असे सुद्धा म्हणतात. IUCN ने ग्लोबल वार्मिंगचा ध्रुवीय अस्वलासाठी सर्वात मोठा धोका म्हणून सूचीबद्ध केले आहे.

ध्रुवीय अस्वलाला स्वतंत्र प्रजाती म्हणून वर्णन करणारे कॉन्स्टंटाइन जॉन फिप्स हे पहिले व्यक्ती होते. हवामान बदलामुळे आणि अपेक्षित अधिवास नष्ट झाल्यामुळे, ध्रुवीय अस्वल एक असुरक्षित प्रजाती म्हणून ओळखली जाते. अनेक दशकांपासून, मोठ्या प्रमाणावर शिकार केल्यामुळे प्रजातींच्या भविष्याबद्दल आंतरराष्ट्रीय चिंता निर्माण झाली होती, परंतु नियम आणि कायदा लागू झाल्यानंतर त्यांची लोकसंख्या पुन्हा वाढली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ध्रुवीय अस्वल “पांढरे अस्वल” म्हणून देखील ओळखले जातात.

तपकिरी अस्वल माहिती मराठी (Brown bear information in marathi)

  • तपकिरी अस्वल मुख्यतः वनस्पती खातात. परंतु जेव्हा ते उपलब्ध नसते तेव्हा ते त्यांच्या आहारात मासे आणि लहान प्राणी यांचा सुद्धा समावेश करतात.
  • जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे तपकिरी अस्वल हिवाळ्याच्या दीर्घ झोपेची तयारी करत असतात.
  • जगभरात सुमारे 180,000 ते 200,000 तपकिरी अस्वल आहेत. त्यापैकी बहुतेक अस्वल अलास्का, कॅनडा आणि रशियामध्ये आहेत.
  • तपकिरी अस्वल वय, लिंग आणि हंगामानुसार 150 ते 370 किलोग्रॅम वजनापर्यंत पोहोचू शकतात.
  • जन्माच्या वेळी, अस्वलाची पिल्ले अंध जन्माला येतात.
  • जंगलात तपकिरी अस्वल 20 ते 30 वर्षांपर्यंतच जगू शकतात. प्राणी संग्रहालयात ते जास्त काळ जगू शकतात.
  • तपकिरी अस्वल त्यांच्या लांब नखांनी आरामदायी गुहा खोदतात. आणि ते हिवाळ्यात गुहेत झोपतात.
  • तपकिरी अस्वलाच्या उपप्रजातींमध्ये ग्रिझली अस्वलांचा समावेश होतो, ज्यांना उत्तर अमेरिकन तपकिरी अस्वल असेही म्हणतात.
  • दुर्दैवाने जर अस्वलाला तो धोक्यात आहे असे वाटत असेल, तर तो त्याची गुहा सोडू शकतो आणि गुहेत लहान पिल्ले असले तरीही ते परत येणार नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अस्वल काय खातो?

उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो, तर चीन मधील पांडा जातीचा अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खातात. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकतात.

अस्वलाच्या शरीराची वैशिष्ट्ये

मोठे शरीर, जाड पाय आणि हात, लांब नाक, संपूर्ण शरीरावर जाड केस आणि पायाच्या बोटात कठोर नखे.

अस्वलाच्या पिल्लांना काय म्हणतात?

शावक

अस्वल समानार्थी शब्द मराठी

भालू, समुद्री अस्वल

बिअर चा अर्थ काय आहे (Bear meaning in Marathi)

अस्वल

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण अस्वल प्राणी माहिती मराठी (Bear information in marathi) जाणून घेतली. अस्वल विषयी माहिती (Bear in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “अस्वल प्राणी माहिती मराठी | Bear information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *