Indian Army Day 2022 in Marathi : भारतीय लष्करातर्फे आज 74 वा सैन्य दिवस साजरा केला जातोय. देशात दरवर्षी 15 जानेवारीला सेना दिवस साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी 1949 साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती.ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल फ्रान्सिस बचर हे ब्रिटिश भारताचे शेवटचे लष्कर प्रमुख होते.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही काही काळ त्यांनीच भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व केलं. नंतर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सूत्रे हातात घेतली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय सैन्य दिवस माहिती (Indian Army Day 2022 in Marathi) जाणून घेणार आहोत.
भारतीय सैन्य दिवस 2022 माहिती (Indian Army Day 2022 in Marathi)
जनरल करियप्पा असे पहिले भारतीय अधिकारी होते ज्यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं . सैन्य दिनानिमित्त भारतीय लष्कराचे साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं. या दिवशी सैन्याचे परेड कार्यक्रम, प्रदर्शन आणि इतर महत्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. हे कार्यक्रम सैन्यदलाच्या दिल्ली येथील मुख्यालयासोबतच इतर मुख्यालयातही साजरे करण्यात येतात. सैन्य दिनानिमित्त ज्या जवानांनी देशाचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते.
कोण होते फील्ड मार्शल जनरल करियप्पा? सन 1899 साली कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात करियप्पा यांचा जन्म झाला. वयाच्या केवळ 20 व्या वर्षी त्यांनी लष्करात नोकरी सुरु केली. जनरल करियप्पा यांनी 1947 सालच्या भारत पाकिस्तान युध्दावेळी देशाच्या पश्चिम सीमेवर लष्कराचे नेतृत्व केलं होतं.
देशाची फाळणी करण्यात आली तशी लष्कराचीही विभागणी भारत आणि पाकिस्तान या दोन देशात करण्यात आली. त्यावेळी या सैन्याच्या विभागणीची जबाबदारी जनरल करियप्पा यांच्यावर सोपवण्यात आली होती. 1953 साली जनरल करियप्पा हे सैन्य दलातून निवृत्त झाले.
भारतीय फील्ड मार्शल हे पद सर्वोच्च पद असते. हे पद सन्मानाच्या स्वरुपात देण्यात येत असतं. भारतीय लष्कराच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच अधिकाऱ्यांना हे पद बहाल करण्यात आले आहे. देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ हे आहेत. त्यांना जानेवारी 1973 साली फील्ड मार्शल हे पद देण्यात आले. जनरल करियप्पा हे देशाचे दुसरे फील्ड मार्शल आहेत. त्यांना 15 जानेवारी 1986 साली हे पद बहाल करण्यात आलं.
भारतीय लष्कराची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने 1776 साली केली होती. भारतीय लष्कराची जगातील प्रमुख बलाढ्य लष्करांमध्ये गणना होते. भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे. 2013 साली उत्तराखंडमध्ये पुराच्या वेळी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन राहत’ हा बचाव कार्यक्रम राबवला होता. हा जगातील सर्वात मोठा बचाव कार्यक्रम होता.
देशभरात परेडचं आयोजन
आर्मी डे निमित्तानं संपूर्ण देश आपल्या जवानांचं असामान्य धैर्य, साहस, शहीद जवानांचे बलिदान याची आठवण काढतो. या दिवशी देशातील सर्व कमांड मुख्यालयासह नवी दिल्लीत भारतीय सैन्याच्या मुख्यालयात सेना दिवस साजरा केला जातो. यावेळी सैन्य परेड होते. तसंच या दिवशी भारतीय सैन्याने मिळवलेल्या किंवा सैन्यात सहभागी केलेल्या नव्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं जातं. तसंच फील्ड मार्शल एम करियप्पा परेड ग्राऊंडवर कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. संख्येच्या दृष्टीनं भारताकडे जगातील दुसरं सर्वात मोठं लष्कर आहे. भारतीय लष्करातील जवानांची संख्या जवळपास 14 लाख आहे.
सैन्यावरील खास गीत प्रदर्शित होणार
महत्वाची बाब म्हणडे भारतीय लष्करावर आज एक खास गीत प्रदर्शित केलं जाणार आहे. ‘माटी’ असं या गीताचं शिर्षक असेल. गायक हरिहरन यांनी हे गीत गायलं आहे. त्याची माहिती भारतीय लष्कराच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Indian Army Day 2022 quotes in Marathi)
देशासाठी झटणाऱ्या शूरवीरांना सलाम!
देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपले सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय जवानांना सलाम!
राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!
कितीही श्रीमंती असली तरीही हा पोशाख आणि हा रुबाब तुम्ही विकत घेऊ शकत नाही तो कमवावा लागतो भारतीय सेनेला सलाम!
भारतमातेच्या संरक्षणासाठी आपल्या जीवावर उदार होऊन रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..
भारतीय सैन्य दिवस फोटो (Indian army day images in marathi)
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय सैन्य दिवस माहिती (Indian Army Day 2022 in Marathi) याची माहिती जाणून घेतली. भारतीय सैन्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Indian Army Day quotes in Marathi) तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
क्रेडिट : ABP LIVE