फातिमा शेख माहिती मराठी | Fatima Sheikh information in marathi

Fatima Sheikh information in marathi : Fatima Sheikh biography in marathi : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फमिता शेख यांची आज 191 वी जयंती आहे. यावेळी गुगलने डूडल बनवून त्यांचा गौरव केला. फातिमा शेख यांनी समाजसुधारक ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत 1848 मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. आजच्या या पोस्टमध्ये आपण फातिमा शेख माहिती मराठी (Fatima Sheikh information in marathi) आणि फातिमा शेख बायोग्राफी मराठी (Fatima Sheikh biography in marathi) जाणून घेणार आहोत.

Fatima Sheikh information in marathi
फातिमा शेख माहिती मराठी (Fatima Sheikh information in marathi)

फातिमा शेख माहिती मराठी (Fatima Sheikh information in marathi)

फातिमा शेख यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला. त्या त्यांच्या भावासोबत उस्मानसोबत राहत होत्या. दीनदुबळ्या आणि गरीबांच्या शिक्षणाला विरोध केल्याने फुले दाम्पत्याला वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा यांनी त्यांना आश्रय दिला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात 1848 मध्ये सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

शेख यांच्या घरी स्वदेशी वाचनालयाची स्थापना झाली. इथूनच फातिमा शेख आणि फुले दाम्पत्याने समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं.

सर्च इंजिन गुगलनं आज पहिल्या भारतीय मुस्लीम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त डुडलमधून (Doodle) अभिवादन केलं आहे. फातिमा शेख यांनी शिक्षणासोबत स्रियांच्या प्रश्नावर देखील काम केलं. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख यांनी काम केलं.

फातिमा आणि सावित्रीबाई ज्योतिबांनी स्थापन केलेल्या शाळांमध्ये जाऊ लागल्या, तेव्हा पुण्यातील लोक त्यांना त्रास देत असत, शिवीगाळ करत असत. ते दगडफेक करायचे तर कधी त्यांच्यावर शेण फेकले जायचे कारण ते अकल्पनीय होते.

समतेसाठी काम

फातिमा शेख यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणं फातिमा शेख यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापित वर्गाकडून त्रास सहन करावा लागला. फातिमा शेख यांनी सत्यशोधक समाजाचं देखील काम केलं. भारत सरकारनं फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र 2014 मध्ये उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.

सावित्रीबाई फुले यांच्या पत्रात उल्लेख

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना 10 ऑक्टोबर 1856 मध्ये रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी “फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही” असं लिहिलं आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण फातिमा शेख माहिती मराठी (Fatima Sheikh information in marathi) जाणून घेतली. फातिमा शेख बायोग्राफी मराठी (Fatima Sheikh biography in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *