सावित्रीबाई फुले जयंती 2022 | Savitribai Fule Jayanti in Marathi

Savitribai Fule Jayanti in Marathi : अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 191 वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. आजच्या या पोस्टमध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती 2022 (Savitribai Fule Jayanti in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सावित्रीबाई फुले जयंती 2022 (Savitribai Fule Jayanti in Marathi)

सावित्रीबाई फुले जयंती 2022 (Savitribai Fule Jayanti in Marathi)

  • 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा सुरु केल्या होत्या.
  • महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
  • केवळ शिक्षिका म्हणून नाही तर कवयित्री आणि समाजसुधारक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
  • त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे 1955 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • जोतिरावांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाई यांनी समर्थपणे चालवले. तेथील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच वाढवले. तेथेच जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवा महिलेचे बाळ त्यांनी दत्तक घेतले. त्याला ‘यशवंत’ असे नाव ठेवले.
  • जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे ‘स्त्रियांनी शिकावे’ हेच ब्रीदवाक्य होते. 1897 साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले. अखेर प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश (savitribai phule jayanti quotes marathi)

मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी ॥ आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी ॥ क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार ॥ सावित्रीचा वसा – वारसा आम्ही पुढे नेणार।।

भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणा-या, पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!

स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया, बालिकांना जगण्याचा हक्क द्याया, सदा दिली ज्योतिबांनी साथ, केली अनंत अडचणींवर मात, ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती, ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती, अशा त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन….

अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले, चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची…. झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे…. दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे… निर्मळ गंगा तु अक्षराची तु तु प्रेरणा नव्या युगाची…

सावित्रीबाई फुले यांचे कार्य

शिक्षणाशिवाय सावित्रीबाईंनी इतर अनेक सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम चालविला. 19व्या शतकात हिंदूंमध्ये प्रचलित बालविवाहाविरूद्ध लोकांना जागरूक करण्याचे कामही त्यांनी केले. त्यांच्या मुलासह त्यांनी पुढे समाजासाठी चांगले कार्य केले. 1897 मध्ये सावित्रीबाई व त्यांचा मुलगा यशवंतराव यांनी प्लेगच्या रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालय सुरू केले होते. पुण्याच्या या रुग्णालयात यशवंतराव रूग्णांवर उपचार करायचा आणि सावित्रीबाई रुग्णांची काळजी घेत असत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सावित्रीबाई चे लग्न कोणत्या दिवशी झाले?

1940 मध्ये जेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती, तेव्हा तिचे लग्न 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाले.

सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली?

1 जानेवारी 1848

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

सातारा

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू

1897 साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले. अखेर प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सावित्रीबाई फुले जयंती 2022 (Savitribai Fule Jayanti in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश (savitribai phule jayanti quotes marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *