फिजिक्स म्हणजे काय | Physics meaning in Marathi

Physics meaning in Marathi : फिजिक्स या विषयाबद्दल तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. त्यामुळेच तर तुम्ही या शब्दाचा अर्थ शोधत आहात. तर मित्रांनो फिजिक्स म्हणजेच भौतिक शास्त्र. हा विषय विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतो. भौतिकशास्त्र हा विषय त्या विद्यार्थ्यांना खूप आवडतो ज्यांना गणित खूप आवडतो. इतरांना भौतिकशास्त्र हा खूप अवघड विषय वाटतो. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फिजिक्स म्हणजे काय (Physics meaning in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

फिजिक्स म्हणजे काय (Physics information in marathi)

फिजिक्स म्हणजे काय (Physics information in marathi)

मित्रांनो आपल्याला दहावीपर्यंत फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र हा विषय विज्ञान या विषयांमध्येच शिकवला जातो. परंतु जेव्हा आपण अकरावी बारावीला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतो तेव्हा आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय पाहायला मिळतात. या मधीलच आजचा हा विषय म्हणजे फिजिक्स. अकरावी आणि बारावी ला फिजिक्स हा एक स्वतंत्र विषय असतो. आणि याचा पेपर सुद्धा वेगळा घेतला जातो. तर या मधून आपण फक्त इतकेच समजून घेऊ की फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र.

मित्रांनो तुम्ही आपल्या अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि नासा या बद्दल नक्कीच ऐकले असेल. या संस्था दरवर्षी नवीन काहीतरी चाचण्या घेत असतात. आणि पृथ्वीच्या बाहेर अंतरिक्ष यान पाठवण्यासाठी निरीक्षण करत असतात. त्यासाठी ते सॅटॅलाइट, स्पेस क्राफ्ट इत्यादी पाठवतात. या सर्व यशस्वी चाचण्यांमध्ये फिजिक्स म्हणजे भौतिक शास्त्र खूप उपयुक्त ठरते.

फिजिक्स चा अर्थ काय आहे (Physics meaning in Marathi)

फिजिक्स ला मराठीमध्ये भौतिकशास्त्र असे म्हणतात. भौतिकशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा आहे ज्यामध्ये निसर्गामध्ये घडणाऱ्या नैसर्गिक घटनांचे विश्लेषण केले जाते. भौतिकशास्त्र हे पदार्थ आणि ऊर्जेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आणि हे क्षेत्र खूपच जुने आणि व्यापकपणे पसरलेले अभ्यासाचे क्षेत्र आहे. फिजिक्स हा शब्द ऐकूनच अनेक वेळा लोक खूप घाबरतात. परंतु या विषयाने आपल्याला जर रोजच्या जीवनामध्ये वेढलेले आहे.

भौतिकशास्त्राची व्याख्या (Physics definition in marathi)

Physics is the branch of science in which the nature and properties of matter and energy are studied. Physics includes the mechanics, heat, light, radiation, sound, electricity, magnetism and the structure of an atom.

भौतिकशास्त्र ही विज्ञानाची शाखा आहे ज्यामध्ये पदार्थ आणि उर्जेचे स्वरूप आणि गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. भौतिकशास्त्रामध्ये पदार्थ, उष्णता, प्रकाश, रेडिएशन, ध्वनी, वीज, चुंबकत्व आणि अणूची रचना समाविष्ट आहे.

शास्त्रीय भौतिकशास्त्र

भौतिकशास्त्राचे ढोबळमानाने दोन भाग करता येतील. सन 1900 च्या आधी प्राप्त झालेले भौतिक ज्ञान आणि जे नियम व तत्त्वे मांडण्यात आली होती ती शास्त्रीय भौतिकशास्त्रात समाविष्ट करण्यात आली होती. गॅलिलिओ (1564–1642) आणि न्यूटन (1642–1727) हे त्या काळातील विचारसरणीचे प्रेरणास्थान होते. शास्त्रीय भौतिकशास्त्र हे प्रामुख्याने यांत्रिकी, ध्वनीशास्त्र, उष्णता, विद्युत चुंबकत्व आणि ऑप्टिक्समध्ये विभागलेले आहे. या शाखा अभियांत्रिकी आणि हस्तकला विज्ञानाचा आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्यापासून भौतिकशास्त्राचे प्राथमिक शिक्षण सुरू केले जाते.

आधुनिक भौतिकशास्त्र

सन 1900 नंतर, अनेक क्रांतिकारी तथ्ये ज्ञात झाली, जी शास्त्रीय भौतिकशास्त्राच्या चौकटीत बसणे कठीण होती. भौतिकशास्त्राच्या ज्या शाखेचा उगम या नवीन तथ्यांचा अभ्यास करणे आणि त्यांचे गूढ सोडवणे यातून झाला तिला आधुनिक भौतिकशास्त्र असे म्हणतात. आधुनिक भौतिकशास्त्र थेट पदार्थाच्या संरचनेशी संबंधित आहे. अणू, केंद्रक आणि मूलभूत कण हे त्याचे मुख्य विषय आहेत. भौतिकशास्त्राच्या या नव्या शाखेने वैज्ञानिक विचारांना नवे आणि क्रांतिकारी वळण दिले आहे आणि त्याचा सामाजिक विज्ञान आणि तत्त्वज्ञानावरही लक्षणीय प्रभाव पडला आहे.

भौतिकशास्त्राच्या शाखा (Branches of physics in Marathi)

जसजसा विज्ञानाचा विकास होत गेला तशा तशा भौतिकशास्त्राच्या शाखा सुद्धा वाढत गेल्या. भौतिकशास्त्राच्या काही शाखा विषयी आता आपण जाणून घेऊया

  • शास्त्रीय भौतिकशास्त्र (Classical physics)
  • आधुनिक भौतिकशास्त्र (Modern physics)
  • आण्विक भौतिकशास्त्र (Nuclear physics)
  • यांत्रिकी (Mechanics)
  • ध्वनीशास्त्र (Acoustics)
  • अणु भौतिकशास्त्र (Atomic physics)

काही प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ

  • आयझॅक न्यूटन
  • अल्बर्ट आइनस्टाइन
  • जेम्स क्लार्क मॅक्सवेल
  • मॅक्स प्लांक
  • गॅलिलिओ
  • ॲंपियर
  • नील्स बोर
  • लॉर्ड केल्विन
  • मॅक्स बॉर्न

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

भौतिकशास्त्र म्हणजे काय (Physics meaning in Marathi)

फिजिक्स चा अर्थ आहे भौतिकशास्त्र. ही एक विज्ञानाची शाखा आहे जी पदार्थ आणि उर्जेच्या प्रकृति आणि गुणधर्मांशी संबंधित आहे.

भौतिकशास्त्र व्याख्या) (Bhautik Shastra meaning in marathi)

भौतिकशास्त्र ही विज्ञानाची शाखा आहे ज्यामध्ये पदार्थ आणि उर्जेचे स्वरूप आणि गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. भौतिकशास्त्रामध्ये पदार्थ, उष्णता, प्रकाश, रेडिएशन, ध्वनी, वीज, चुंबकत्व आणि अणूची रचना समाविष्ट आहे.

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते

डॉ. सी.व्ही. रमण
सुब्रम्हण्यन चंद्रशेखर

सामाजिक भौतिकशास्त्र या संज्ञेचा वापर कोणी केला?

ऑगस्टे कॉम्टे (Auguste Comte)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फिजिक्स चा अर्थ काय आहे (Physics meaning in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. फिजिक्स म्हणजे काय (Physics information in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *