ओळखा पाहू मी कोण | who I am riddles in marathi

(who I am riddles in marathi) ओळखा पाहू मी कोण : मित्रांनो लहानपणापासून आपल्याला आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी मराठी कोडी घालत आली आहेत. आणि बऱ्याचदा आपण त्यांची उत्तरे सुधा सहज देतो. तुम्ही अनेक वेळा ओळखा पाहू मी कोण (Olkha pahu mi kon marathi Kodi) सुद्धा ऐकली असतील. आजच्या या पोस्टमध्ये आपण ओळखा पाहू मी कोण (who I am riddles in marathi) जाणून घेणार आहोत.

who I am riddles in marathi
ओळखा पाहू मी कोण (who I am riddles in marathi)

Contents

ओळखा पाहू मी कोण (who I am riddles in marathi)

लांब आहे पण साप नाही,
बांधतात पण दोरी नाही, ओळखा पाहू मी कोण?

वेणी

असे काय आहे जे आले तरी त्रास होतो आणि गेले तरी त्रास होतो?

डोळे

तीन जन वाढायला, बारा जण जेवायला, ओळखा पाहू मी कोण?

घड्याळ

मी जगभर प्रवास करते, परंतु एका कोपर्‍यात राहते, ओळखा पाहू मी कोण?

टपाल तिकिट

दोन भाऊ शेजारी, ओळख नाही जन्मांतरी ओळखा पाहू मी कोण?

डोळे

डोंगराच्या आड आहे एक मित्र, तेजान त्याच्या दिपती नेत्र, पाहून त्याला हसती फुले, निद्रे मधून उठती मुले, ओळखा पाहू मी कोण?

सूर्य

पाय नाही चाक नाही तरीही चालते, खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते, ओळखा पाहू मी कोण?

पेन

बिना पायाचा पळतो, आणि मी कधीही परत येत नाही, ओळखा पाहू मी कोण?

वेळ

थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक आणि लांब आहे पण काठी नाही, दोन तोंडे आहेत पण साप नाही, ओळखा पाहू मी कोण?

बासरी

पांढरी जमीन, काळे बीज, देता ध्यान होऊ सज्ञान, ओळखा पाहू मी कोण?

पुस्तक

पाण्यात पडल्यावर सुद्धा मी ओली होत नाही, ओळखा पाहू मी कोण?

सावली

माझ्याजवळ गळा आहे पण डोके नाही, बाजू आहेत पण हात नाही, ओळखा पाहू मी कोण?

टी शर्ट

पाण्यापासून जन्माला येते आणि पाण्यातच मरण पावते ओळखा पाहू मी कोण?

मीठ

जेव्हा माझी त्वचा सोलून काढली जाते, तेव्हा मी रडत नाही पण तुमच्या डोळ्यातून पाणी येते, ओळखा पाहू मी कोण?

कांदा

हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली, सांगा पाहू मी कोण?

भेंडी

लगाम सुटला खूप नाचला, घोडा लाकडी मुलांना आवडी, ओळखा पाहू मी कोण

भोवरा

उन्हाळ्यात तुम्ही मला घाबरता, पण हिवाळ्यात मलाच खाता, माझ्यामुळेच दिसते तुम्हाला एक इंद्रधनुष्य, ओळखा पाहू मी कोण?

उन

दिवसाढवळ्या मुक्काम करूनी बाहेर पडतो रात्रीला, असा कोणता फिरे प्रवासी दिवा बांधूनी पाटीला, ओळखा पाहू मी कोण?

काजवा

पुरुष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो, ओळखा पाहू मी कोण?

कंडक्टर

छोटी छोटी आखूड शिंग, पिवळा चॉकलेटी रंग, काटकुळे पाय छान ,झाडाच्या टोकापर्यंत उंच मान ओळखा पाहू मी कोण?

जिराफ

मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा झगा याच्या अंगावर, काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून, ओळखा पाहू मी कोण?

वांगे

हिरवा, पिवळा रंग आंबट गोड चव क’ जीवनसत्वाने भरपूर “गाँव माझ नागपूर, ओळखा पाहू मी कोण

कडूलिंब

घरात येते लपून छपून दूध पिते डोळे झाकून, उदिरमामा हवा फराळाला. वाघांची मावशी म्हणतात हिला ओळखा पाहू मी कोण ?

काळा काळा रंग,वस्तू कुरतडण्यात दग मुनीमाऊ येताच पळून जातो बिळात जाऊन दंडन बसतो ओळखा पाहू मी कोण ?

उंदीर

मोट ओढतो, शेतात राबतो. घाणा चालवितो, गोठ्यात राहतो. वर्षश्वर काम करतो, पोळ्याला हक्काचा आराम करतो. ओळखा पाहू मी कोण?

बैल

तिक्ष्ण डोळे वाकदार चोच उंच भरारी घेतो आकाशति विष्णच वाहन, सापाचा शत्रू पक्षी मी शक्तीमान, ओळखा पाहू मी कोण?

गरुड

पंख आहे पण पक्षी नाही, जादू आहे पण जादूगार नाही प्रेमळ आहे पण आई नाही म्हटले तर आहे. म्हटले तर नाही ‘गोष्टीची पुस्तक वाचा खरी, स्वप्नात येईल मग तुमच्या घरी, ओळखा पाहू मी कोण?

परी

हिरवी काळी फळ कशी एकावर एक ठेवली रचून आंबट आहे अस म्हणून कोल्हा गेला लांब निघून वेलीवर नक्षीदार पान नाशिकची प्रसिध्द असा मान, ओळखा पाहू मी कोण?

द्राक्षे

कधी भिंतीवर, कधी हातावर दिमाखात बसतो मी, अहोरात्र करतो मी वेळ दाखवण्याचं प्रामाणिक काम, ओळखा पाहू मी कोण ?

घड्याळ

मराठी कोडी व उत्तरे (riddles in marathi with answers)

मराठी कोडी व उत्तरे (riddles in marathi with answers)

दिवसागणिक पुढे सरकतो महिन्यातून थोडा बदलतो मी सण, वार, सुट्ट्या आणि बरंच काही तुम्हाला दाखवत राहतो मी, ओळखा पाहू मी कोण ?

कॅलेंडर

चार पायावर ठाण मारून स्वयंपाक घरातच राहतो मी जेवायला एकत्र कुटुंब करणं यातच समाधान मानतो मी, ओळखा पाहू मी कोण ?

डायनिंग टेबल

सत्य चित्र सदैव दाखवणारा प्रामाणिक तुमचा सोबती मी काच जरी नाजूक असलो तरी धन्यता मानतो सेवेतच मी, ओळखा पाहू मी कोण ?

आरसा

किचन कट्ट्याखाली जागा माझी सोबती तुमच्या आईचा मी कणाकणाने जळून तुमची सोय करतो जेवणाची मी, ओळखा पाहू मी कोण ?

सिलेंडर

दरवाजाजवळची जागा माझी विविध आकारात असते मी घर स्वच्छ ठेवता ठेवता स्वत: मात्र मळते मी, ओळखा पाहू मी कोण?

पायपुसणी

कधी भिंतीवर कधी टेबलावर हातातील बटणावर नाचतो मी अबालवृद्धांच्या आवडी जपतो म्हणून सर्वांचाच आवडता आहे मी, ओळखा पाहू मी कोण?

टी.व्ही. (दूरदर्शन)

घरातील प्रसन्न जागा मी सर्वांचेच श्रद्धा स्थान मीईशान्य कोपऱ्यात राहतो मी घरातले छोटे घर मी, ओळखा पाहू मी कोण?

देवघर

वीजेवर पेटलो जरी गरम मात्र नाही मीपदार्थ सुरक्षित ठेवण्या कामीसदैव तत्पर असतो मी, ओळखा पाहू मी कोण?

फ्रीज (शीतकपाट

तुझ्या मामाची बहीण मी तझ्या आजीची सून मी तुझ्या काकांची वहिणी मी, ओळख तुझी कोण मी?

आई

तुझ्या आजीची नात मी तुझ्या मामाची भाची मीतुझ्या काकांची पुतणी मी, ओळख तुझी कोण मी?

बहीण

तुझ्या आजोबांचा मुलगा मी तुझ्या आत्यांचा भाऊ मीतुझ्या काकीचा पती मी, ओळख तुझा कोण मी?

काका

तुझ्या काकीचा पुतण्या मी तुझ्या आत्यांचा भाचा मीतुझ्या ताईचा दादा मी, ओळख तुझा कोण मी?

भाऊ

तुझ्या आजीची लेक मी तुझ्या आईची नणंद मी तुझ्या काकांची बहीण मी, ओळख तुझी कोण मी?

आत्या

तुझ्या आजीचा मुलगा मी तुझ्या बाबांचा मेहुणा मीतुझ्या मावशीचा भाऊ मी, ओळख तुझा कोण मी?

मामा

तुझ्या आजोबांची लेक मी तुझ्या बाबांची मेहुणी मीतुझ्या आईची ताई मी, ओळख तुझी कोण मी?

मावशी

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ओळखा पाहू मी कोण (who I am riddles in marathi) जाणून घेतली. मराठी कोडी व उत्तरे (riddles in marathi with answers) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे सुधा ओळखा पाहू मी कोण मराठी कोडी (Olkha pahu mi kon marathi Kodi) असतील तर ती आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *