दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे 100 लाइफहॅक्स | 100 Lifehacks in Marathi

100 Lifehacks in Marathi : मित्रांनो आपलं दैनंदिन जीवन सुखी जावं असं सगळ्यांना वाटतं. यासाठी आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स ची गरज असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे 100 लाइफहॅक्स  (100 Lifehacks in Marathi) जाणून घेणार आहोत.

100 Lifehacks in Marathi
दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे 100 लाइफहॅक्स (100 Lifehacks in Marathi)

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे 100 लाइफहॅक्स | 100 Lifehacks in Marathi

1) चांगल्या आरोग्यासाठी 7-8 तास झोप आवश्यक आहे पण जास्त प्रमाणात झोपल्याने ती व्यक्ती विसराळू होऊ शकते.

2) आजच्या काळात प्रत्येक जण पोटाच्या त्रासाने त्रस्त आहे. गॅस, बद्धकोष्ठता, एंसिडिटी चा त्रास असल्यास हरभऱ्याचे पाणी प्यावं. ह्याच्या सेवनाने पचन तंत्र बळकट होईल. पोटाच्या समस्येपासून आराम मिळेल.

3) तुम्हाला पण जर रात्री घोरण्याचा सवय असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळा. दररोज झोपण्यापूर्वी हे प्यावे. असं केल्याने आपल्याला आराम मिळेल.

4) दाताच्या दुखण्याला लवंग प्रभावी घट आहे. लवंगाचे तेल वेदनेपासून त्वरितच आराम मिळवून देतात. या मध्ये युजेनॉल नावाचे रसायन आहे जे बेक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. हे वेदनेमध्ये भूल देण्याचे काम करतो. हे जागेला मुन्न करतो.

5) FAST.COM या WEBSITE चा वापर करून तुम्ही तुमच्या INTERNET चा CURRENT स्पीड पाहू शकता.

6) नखे कुरतडल्याने पॅरोशिया नावाचा त्वचेचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे बोटाना सूज येऊन ते लाल होऊ शकतात.

7) हाड दुखत असतील तर पपई, सफरचंद तसेच आलं टाकलेली चहा तुम्हाला फायदेशीर ठरतील.

8) HUNDREDZEROS.COM या WEBSITE वरून तुम्ही Amazon KINDLE वरील पुस्तक मोफत DOWNLOAD करू शकता.

9) पायाच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर तिथे कांद्याचा रस लावावा त्यामुळे पाय नरम होतील.

10) सर्दी, खोकला कफ झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्याने, सर्दी खोकल्यापासून सुटका मिळते.

20 Lifehacks in Marathi

11) गवती चहा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. फंगल इनफेक्शन टाळण्यासाठी गवती चहा प्यावा.

12) जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीऱ्याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

13) कोरफडीच्या पानाच्या आतील बाजूस असलेल्या अर्धपारदर्शक जेलमध्ये दाहप्रतिबंधक गुणधर्म असतात. त्वचेमधील बाधित टिश्यूवर उपचार करून नवीन टिश्यू निर्माण करण्याचे कार्य या जेलमध्ये आहे.

14) घश्यात खवखव होत असल्यास गरम पाण्यात काळी मिरी टाकून पाणी प्यावे. खवखव कमी होते.

15) कोकमचा रस तुम्ही त्वचेवर चोळल्यास रिंकल्स, त्वचेवरील व्रण कमी होण्यास मदत होते.

16) तुम्ही दररोज झोपण्या पूर्वी तिळाचे तेल डोक्याला लावून त्याची हलक्या हाताने मालिश करावी. असे आठवड्यातून 3-4 वेळेस जर केले तर तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येत. तुमचे पांढरे केस होण्यापासून वाचतील.

17) काही कपड्याचे सूत असे असतात की एक दोन वेळा वापरल्या नंतरच जुनाट वाटतात. त्या मुळे त्यांचा लूक खराब होऊ लागतो. घर्षणामुळे त्यांचे तंतू तुटू लागतात. त्यावर बारीक लिट (LINT) येऊ लागतात हे लिट (LINT) काढण्यासाठी रेझर चा वापर कटा. लिट (LINT) निघून जातात.

18) द्राक्ष खाल्ल्याने दात किडणे थांबते द्राक्षांमध्ये असणारे नैसर्गिक घटक दातांना मजबूत करून किडण्यापासून वाचवतात.

19) रात्री एक ग्लास गरम दुधामध्ये एक दोन चिमूट विलायची पावडर आणि साखर टाकून घ्या यामुळे एनिमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासून आराम मिळतो.

20) ओठांच्या कोरडे होण्याची समस्या दूर करण्यास गुलाबची पाने देखील मदत करतात. गुलाबाची पाने बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपेच्या वेळी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल.

30 Lifehacks in Marathi

21) सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल. जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा.

22) पायांना भेगा पडल्या असतील तर केळ्याची पेस्ट बनवून पायांच्या ताचावर चोळा आणि 10 मिनिटांनी धुवून काढा पाय मुलायम होतील.

23) डोळ्याखाली सूज येत असेल तर एका वाटीत कॉफी आणि मध मिसळा आणि स्क्रब तयार करा. डोळ्यांच्याखाली लावा साधारण 10 ते 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे देखील डोळ्यांखालील सूज जाण्यास मदत होईल.

24) 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये 1 लिटर दुधाएवढे प्रोटीन असतात तसेच हे भाजून खाल्ले तरी मोठ्या प्रमाणात मिनरल्स पुरवतात.

25) घरात झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळे झुरळ लवकर मरतात.

26) पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी मुळ्याच्या तुकड्यावर लिंबू पिळून तो तुकडा थोडावेळ चावून थुंकून टाका या उपायाने दात चमकदार होतील.

27) करपलेल्या भांड्याला साफ करण्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचे सॉफ्ट ड्रिंक. यासाठी तुम्ही कोकचा वापर करू शकता. भांड्यामध्ये कोक टाकून त्याला थोडे गरम होऊ द्या. यामधून बुडबुडे निघणे बंद झाले की त्याला गॅसवरून खाली उतरवून प्लास्टिक ब्रश किंवा स्क्रबने घासू शकता.

28) पाठीवर मुरूम येत असतील तर आहारात फळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा तसाच जास्त प्रमाणात पाणी प्या.

29) सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज दूधासोबत केळी खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. बदामाचे दूधसुद्धा वजन वाढविण्यात खूप मदत करते.

30) पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे लाइफहॅक्स (40 Lifehacks in Marathi)

31) गवार मध्ये असलेले फॉस्फोरस आणि कॅल्शिअम हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर मानले जाते.

32) कुकरच्या आतील डाग घालवण्यासाठी कुकरमध्ये थोडे पाणी, 1 चमचा वॉशिंग पावडर, अर्धा लिंबू घालून उकळून घ्या. नंतर घासा. डाग निघून जातील.

33) रात्री एक ग्लास दुधामध्ये एक दोन चिमूट विलायची पावडर आणि साखर टाकून घ्या विलायची खोकला, दमा, सर्दी यांसारख्या आजारांवर लाभदायी आहे.

34) उन्हाळ्यात ताकामध्ये काळे मिरी आणि काळे मीठ एकत्र करून प्यायल्याने एंसिडीटी बरी होते.

35) संत्री, लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये अनेक उपयोगी जीवनसत्व असतात. रोज लिंबू सरबत घेतल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.

36) काही कारणास्तव मोबाईलच्या स्पीकर्स मध्ये पाणी गेले असता FIX MY SPEAKER या WEBSITE चा वापर करून तुम्ही ते बाहेर काढू शकता.

37) बरेच लोक तूप खाणे टाळतात. मात्र, सध्याच्या काळात जेवणामध्ये तूप खा. रात्री झोपायच्या आधी पायाच्या तळांवर तूप लावल्यास झोप चांगली येते.

38) गुळवेल डेंगू या आजारावर रामबाण उपाय आहे तसच पोटाच्या समस्येवरही फायदेशीर मानली जाते.

39) धने खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

40) अंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाका. त्यामुळे त्वचेवरील घाम आणि तेल निघून जाईल. तुमची त्वचा नितळ आणि मुलायम होईल.

50 Lifehacks in Marathi

41) फ्रिजला कोणताही विचित्र वास येत असेल तर वाटीमध्ये कोळसा घालून फ्रिजमध्ये ठेवावे. वास शोषला जातो.

42) पुलाव करताना तांदळामध्ये लिबूटम व तूप घालून भात कटावा. मोकळा व पांढटाशुभ्र होतो.

43) भजी करताना बेसन पिठात थोडे वरण घोटून घालावे. भजी कुरकुरीत होते.

44) साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना त्यात थोडेसे तूप टाकावे. पाक चांगला होतो

45) रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे. यामुळे ही समस्या हळुहळू दूर होईल.

46) कोणत्याही पातळ भाजीत मीठ जास्त पडले असेल तर एक किंवा दोन बटाटे उकडून त्याचे काप करून भाजीत टाकावेत. भाजीचा खारटपणा कमी होईल.

47) जट तुम्हाला पोटदुखी, गॅस, अपचन असा त्रास होत असेल तर ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग एकत्र करून खा.

48) कांद्याची साल काढून टाकल्यानंतर तो अर्धातास पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर कापा यामुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही.

49) मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जट आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल.

50) हाडांच्या कमजोटीमुळे गुडघे दुखत असतील तर पपई खा पपईमधील क जीवनसत्व तुम्हाला फायदेशीर ठरेल.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे लाइफहॅक्स (60 Lifehacks in Marathi)

51) इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.

52) पालक पनीर करताना पालकाचा हिरवा रंग कायम ठेवण्यासाठी पालक शिजताना त्यात चिमूटभर खायचा सोडा टाकावा.

53) मोड आलेली कडधान्य जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये लिबाचा रस मिसळून फ्रिजमध्ये ठेवा.

54) आपण आपल्या घटात कापूट किंवा नीलगिटीचे तेल जाळले तर त्यातून निघणारा धूर घटातल्या सर्व डासांना आळा घालण्यास मदत करू शकतो.

55) समोसा बनवितांना त्या पिठात तांदळाचे थोडे पीठ घाला.समोसे कुटकुटीत होतील.

56) गरम दुधामध्ये हिंगाचे काही तुकडे घाला आणि ते प्या. त्यामुळे सर्वच आजाटांवर फायदा मिळतो. तसेच गॅसचा त्रास देखील कमी होतो.

57) काचेची भांडी बयाच दिवसानंतर काढल्यावर त्यांच्या वरील चमक कमी होते. या परिस्थितीत पाण्यात लिंबाचे साल मिसळा आणि कपड्याने भांडी पाण्यातच स्वच्छ कटा. भांडी चमकतील.

58) पुटी किंवा भजी तळताना तेलात मीठ घाला. तेल
कमी लागेल.

59) उचकी लागल्यास तळहाताच्या मध्ये प्रेशर दिल्याने आराम मिळतो.

60) प्रवासात जट उलटीचा त्रास होत असेल तर पुदिना तेल रुमालावर घेऊन प्रवासादरम्यान सुंगत राहा.

70 Lifehacks in Marathi

61) सर्दी किवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शटिटातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते.

62) पायाच्या टाचांना भेगा पडत असतील तर त्या भागात कांद्याचा रस लावा यामुळे टाचा नरम आणि मुलायम बनतील.

63) ताप आल्यावर तुळशीचा रस नंतर ताप कमी होतो. मलेटीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा टस पिल्यावर आराम मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल.

64) पॅन्टची चैन लागत नसेल किंवा त्यात गंज लागले असल्यास इयरबड ने त्या चैन वट ऑलिव्ह ऑइल लावा जेणे करून चैन व्यवस्थित काम करेल.

65) पोहे पचायला हलके असल्यामुळे पोट पटकन भरत त्यामुळे लवकर भूक लागत नाही वजन कमी करणायांसाठी हे फायदेशीर आहेत.

66) पुदिन्यामध्ये मेंथॉल असतो जो सर्दीवर नैसर्गिक उपचार देतो सर्दी झाल्यास पुदिन्याची पान घातलेला चहा प्या.

67) घटात पाली येत असतील तर दाट आणि खिडक्यात लसणाच्या पाकळ्या ठेवा त्यामुळे पाली घटात शिरत नाहीत.

68) आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहटा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि मुटकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.

69) किवी सतत आठ आठवड्यांपर्यंत खाल्ल्यास हाय बीपीच्या समस्येवर नियंत्रण मिळते. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

70) रात्री एक ग्लास गरम दुधामध्ये एक दोन चिमूट विलायची पावडर आणि साखर टाकून घ्या यामुळे एनिमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासून आराम मिळतो.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे लाइफहॅक्स (80 Lifehacks in Marathi)

71) आपल्या शरीरात जर प्लेटलेट्सची कमी असेल तर नारळपाणी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.

72) राग आल्यावर मनातल्या मनात गुणगुणत जा त्यामुळे राग शांत होईल.

73) कोमट पाण्यामध्ये हळद घेतल्यास शरीरात साखरेची पातळी कमी होते नियमित सेवन केल्यास टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांची लक्षणेही सुधारतात.

74) तुम्हाला रात्री घोरण्याची सवय असल्यास आहारात कांद्याचा समावेश करा त्याने सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे होऊन घोरण कमी होत.

75) थंडीच्या दिवसात खूप पाणी पिल्याने शरीरात संक्रमण होत नाही तसेच सर्दी, खोकला या समस्येपासून सुटका होते.

76) नियमित धन्याचे पाणी पिल्याने तोंडाच्या दुर्गधीपासून सुटका होते.

77) रोज काहीतरी नवीन आणि वेगळ वाचायला आवडत असेल तर विकिपीडिया वर RANDOM ARTICLES ची WINDOW तुम्हाला फायदेशीर ठरेल.

78) गाईचे तूप आणि पिठीसाखर सेवन केल्याने डोळ्याचे तेज वाढते.

79) WETRANSFER.COM या साईट च्या मदतीने तुम्ही खूप मोठ्या (GB मध्ये) असणाऱ्या FILES सुद्धा एकमेकांसोबत SHARE करू शकता.

80)मोड आलेले मूग केसांसाठी फायदेशीर मानले जातात त्यांमधून मिळणार व्हिटॅमिन सी केसांच्या वाढीस मदत करते.

90 Lifehacks in Marathi

81) काळ्या द्राक्षांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. द्राक्षांमध्ये रेसवर्टाल नावाचा पदार्थ असतो जो रक्तामध्ये इन्स्युलिन वाढविण्याचे काम करतो. या द्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

82) उन्हात जळालेली त्वचेवर चमक आणण्यासाठी नारळपाणी,कच्चं दूध, काकडी आणि लिंबाचा रस आणि चंदन पावडर मिसळून अंघोळीच्या पूर्वी शरीरावर लावा.

83) गरम दूध आणि गूळ यात भरपूर प्रमाणात लोह असते. दररोज याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. अशक्तपणा दूर होतो.

84) पनीरचे सेवन दातांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दातांना बळकट ठेवण्यासाठी मदत करत.

85) ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.

86) जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.

87) जेवणानंतर लगेच सिगरेट ओढल्याने तुमची पचन क्रिया बाधित होते तसेच कॅन्सर चा धोका वाढतो.

88) कपड्यावर शाई पडली की ती ओली असतानाच त्यावर मीठ घासून धुवा त्यामुळे शाईचा डाग पडणार नाही.

89) दह्यामध्ये अनेक प्रकाराचे घटक आढळतात. ज्यांना खाल्ल्यानं शरीराला फायदा होतो. दह्यात कॅल्शियम, प्रथिन आणि व्हिटॅमिन असतात. दह्याचे नियमित सेवन केल्यानं त्वचेला मऊसर बनविण्यात मदत मिळते.

90) तिखट पदार्थासोबत दूध सेवन करू नये यामुळे तुम्हाला GAS आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे लाइफहॅक्स (100 Lifehacks in Marathi)

91) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर दररोज दही, पालक तीळ, आळशी, मेथीची भाजीचे सेवन करा या समस्येपासून फायदा होतो.

92) अंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाका त्यामुळे अंगावरील घाम, तेल निघून जाईल. तुमची त्वचा नितळ आणि मुलायम होईल.

93) मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास ओलिव्ह ऑईल वापरू शकता. शरीरात हे टेचक प्रमाणे काम करत. जे मुलास निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

94) तापातून बरे झाल्यानंतर शेवग्याची भाजी खावी त्यामुळे भूक पूर्ववत होते.

95) गाजरामध्ये असा एक पदार्थ असतो जो हिरड्याच आरोग्य राखतो जास्त प्रमाणात लाळ तयार होते यामुळे तोंडाच्या समस्या उद्भवत नाहीत.

96) जर तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती झोपण्यापूर्वी वाचा किंवा पाठांतर करा. सकाळी सहज आठवेल.

97) थंड पाण्याने अंघोळ करा, यामुळे त्वचेवरील ऍक्नेची समस्या दूर होईल. कारण थंड पाण्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात.

98) जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी झोप येत असेल तर तुमचा श्वासोच्छ्वास तुम्हाला जेवढा वेळ थांबवून ठेवता येणे शक्य असेल तेवढा वेळ थांबवून ठेवा. नंतर श्वास सोडून द्या. असे केल्याने झोप येणार नाही.

99) 30 ते 35 मिनिटांच्या अभ्यासानंतर 10 मिनिटांची विश्रांती घेतल्याने केलेला अभ्यास लक्षात राहतो.

100) घसा खवखवत असेल तर स्वतःचा कान ओढा. आराम मिळेल.  

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे 100 लाइफहॅक्स (100 Lifehacks in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *