Save water slogans in marathi : मित्रांनो पाणी हे जीवन आहे हे तुम्ही अनेक वेळा ऐकले आहे. आणि ते खरे सुद्धा आहे. कारण पाण्याविना आपण जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. आणि हे खूप प्राचीन काळापासून चालत आले आहे. परंतु जसे जसे आपण प्रगती करत चाललो आहोत तसतसे पाणी जास्त प्रमाणात वापरात येऊ लागले आहे. पाण्याचा जितका वापर व्हावा अशी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त पाणी आपण वापरू लागलो आहोत. आणि त्यामुळे भविष्यकाळात पाणी मिळेल की नाही याची शंका वाटू लागली आहे. त्यामुळेच आपल्याला पाणी मराठी घोषवाक्य (Water Slogan in marathi) लिहण्याची गरज पडत आहे.
याच कारणामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व कळू लागले आहे. आणि तेच पाण्याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी अनेक वेळा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाणी या विषयावर घोषवाक्य तयार करा असे उपक्रम दिले जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी (Save water slogans in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी (Save water slogans in marathi)
- 2 पाणी मराठी घोषवाक्ये (Water Slogan in marathi)
- 3 जागतिक जलदिनानिमित घोषवाक्ये (Jagtik jaldin ghoshvakye marathi)
- 4 पाणी वाचवा मराठी घोषवाक्ये (Pani vachva marathi ghoshvakye)
- 5 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 5.1 पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्य लिहा
- 5.2 पाण्याची काटकसर कशी करावी?
- 5.3 पाणी वाचवा यावर घोषवाक्य
- 5.4 पाणी बचतीसाठी दोन प्रयत्न
- 5.5 पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
- 5.6 घरात तसेच शाळेत पाण्याची बचत कशी कराल?
- 5.7 पाणी टंचाईची कारणे
- 5.8 पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे
- 5.9 पाणी गोठणे या क्रियेस काय म्हणतात?
- 5.10 तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडले तर काय होईल?
- 6 सारांश (Summary)
पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी (Save water slogans in marathi)
प्रत्येकाचा एकच नारा,
पाण्याची काटकसर करा.
पावसाचे पाणी आडवा,
हरितक्रांती घडवा.
थेंब थेंब वाचूवून पाणी,
आनंद येईल जीवनी.
दुष्काळ नाही भासत केल्याने,
पाण्याची बचत.

पाणी आडवा पाणी जिरवा,
मोलाचे मानवी जीवन वाचवा.
पाणी आहे अमृततुल्य,
पाण्याचे महत्व अतुल्य.
थोडे सहकार्य थोडे नियोजन,
पाणी फुलवी आपले जीवन.
पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ,
सर्व रोगांना दूर पळवू.
दुष्काळाची संपविण्या आपत्ती,
काळजीने वापरावी जलसंपत्ती.
पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी.
पाणी मराठी घोषवाक्ये (Water Slogan in marathi)
आता राबवू जलनीती,
नको दुष्काळाची भीती.
नवीन पिढीचा नवा मंत्र,
कमी पाण्यात जादा सिंचनक्षेत्र.

पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान,
करूया पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
पाणी शुद्धीकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न,
त्यास वाचविण्याचा करा प्रयत्न.
बचत पाण्याची,
गरज काळाची.
दुष्काळावर मात करू,
सुनियोजित पाणी वापरू.
स्वच्छ पाणी प्यावे,
रोगांना दूर ठेवावे.
पाण्याचे संरक्षण,
धरतीचे रक्षण.
जीवन पाण्यावर अवलंबून आहे,
आली पाणी संरक्षण आपणावर.
जागतिक जलदिनानिमित घोषवाक्ये (Jagtik jaldin ghoshvakye marathi)
पाणी वाचवा,
जीवन वाचवा.

चला सर्वजण शपथ घेऊया,
थेंब थेंब पाणी वाचवूया.
पाणीच आहे जीवनाचा आधार,
पाण्याविना शक्य नाही जीवनाचा उध्दार.
जाणा महत्व पाण्याचे,
होईल कल्याण जीवनाचे.
चला सर्वांना सांगूया,
पाण्याचे महत्व पटवूया.
जीवन आहे छोट,
जगण्यासाठी पाण्याचे महत्त्व आहे मोठं.
बचत करा पाण्याची,
नाहीतर होईल हानी जीवनाची.
थेंब थेंब पाणी वाचवा,
दुष्काळतले दिवस आठवा.
जर आज तुम्ही पाणी वाचवाल,
तर उद्या तुम्हाला पाणी वाचवेल.
जाणा महत्व पाण्याचे,
कल्याण होईल जीवनाचे.
पाणी वाचवा मराठी घोषवाक्ये (Pani vachva marathi ghoshvakye)
घरोघरी देऊया नारा,
पाण्याचा वापर जपून करा.
पाणी आहे जिथे,
भविष्य आहे तिथे.
पाण्याचे रक्षण,
भविष्याच संरक्षण.
पाण्याच रक्षण,
सजीवांचे संरक्षण.

पाण्याविना जीव होतो बेजार,
जगण्याला श्वासा इतका पाण्याचा आधार.
थेंब थेंब वाचवा पाण्याचा,
हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
वाणी आणि पाणी जपून वापरा,
वाणीमुळे तुमचा वर्तमान काळ व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे.
पाणी नाही द्रव्य,
पाणी आहे अमृततुल्य.
पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती
दुष्काळाची नको असेल आपत्ती,
तर वेळीच जपा जलसंपत्ती
स्वच्छ पाणी, सुंदर परिसर,
तुमचे जीवन होईल सुखकर
पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ,
नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ.
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
दूषित करू नका तुमच्या हाताने
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- 20+ मराठी भाषा दिन घोषवाक्ये (Slogans on marathi language)
- 25 भारतीय संविधान घोषवाक्य मराठी 2021 (Bhartiy sanvidhan ghoshvakye)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्य लिहा
1) प्रत्येकाचा एकच नारा,पाण्याची काटकसर करा.
2) पावसाचे पाणी आडवा, हरितक्रांती घडवा.
पाण्याची काटकसर कशी करावी?
1) पाणी घेण्यासाठी ओगराळल्याचा वापर करावा.
2) घरातील सांडपाणी परसबागेत सोडावे.
3) पिकांना पाणी देण्यासाठी पारंपारिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा वापर करावा.
4) नळा मधून पाणी गळत असेल तर नळ लगेच दुरुस्त करून घ्यावा.
5) अंघोळ करण्यासाठी शॉवर चा वापर टाळावा.
6) वाहने धुताना पाण्याचा वापर जपून करावा.
पाणी वाचवा यावर घोषवाक्य
1) थेंब थेंब वाचवा पाण्याचा,हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
2) पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला श्वासाइतका पाण्याचा आधार.
पाणी बचतीसाठी दोन प्रयत्न
1) पिकांना पाणी देण्यासाठी पारंपारिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा वापर करावा.
2) वाहने धुताना पाण्याचा वापर जपून करावा.
पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
पाण्याचा वापर करताना पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी.
घरात तसेच शाळेत पाण्याची बचत कशी कराल?
घरामध्ये पाणी बचत करण्यासाठी शॉवर ऐवजी बादली ने अंघोळ करावी. विनाकारण घरातील नळ चालू ठेवू नयेत.
शाळेत पाण्याची बचत करण्यासाठी पाणी घेण्यासाठी ओग्राल्याचा वापर करावा. शिल्लक राहिलेले पाणी झाडांना घालावे.
पाणी टंचाईची कारणे
1) वीजटंचाई
2) गैरप्रशासन
3) नियोजनाचा अभाव
4) पाण्याचा अनियमित वापर
ही पाणी टंचाईची कारणे आहेत.
पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे
पिस्टिया, कमळ, हायड्रिला, इलोडिया, व्हॅलिस्नेरिया, काही नेचे, शैवाल, पाणकणीस, लव्हाळा, शिंगाडा, पाणलवंग, समुद्रपालक, कारा या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत.
पाणी गोठणे या क्रियेस काय म्हणतात?
पाणी गोठणे म्हणजे पाण्याचे बर्फात रुपांतर होणे. पाणी गोठणे यालाच बर्फ गोठणे असे म्हणतात.
तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडले तर काय होईल?
तापलेल्या तव्यावर पाणी शिंपडल्यावर पाण्याची वाफ निर्माण होईल आणि तव्यावर च पाणी गरम वाफेने सुखुन जाईल.
सारांश (Summary)
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पाणी वाचवा घोषवाक्ये मराठी (Save water slogans in marathi) जाणून घेतली. पाणी मराठी घोषवाक्ये (Water Slogan in marathi) तुम्हाला नक्कीच आवडली असतील.
आशा करतो की Save Water Images in Marathi आणि Save Water Quotes in Marathi ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
Nice dear