100 + पक्ष्यांची नावे | Birds name in marathi

birds name in marathi : pakshanchi nave in marathi : जगातील पक्ष्यांच्या प्रजातींची अचूक संख्या निश्चित करणे कठीण आहे, कारण नवीन प्रजाती अद्याप शोधल्या जात आहेत आणि वर्गीकरण करणे अवघड असू शकते. तथापि, असा अंदाज आहे की जगात पक्ष्यांच्या 9,000 ते 10,000 प्रजाती आहेत. बर्फाळ ध्रुवांपासून उष्ण कटिबंधापर्यंत पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक वातावरणात पक्षी आढळतात आणि ते परागकण, बीज पसरवणारे आणि भक्षक म्हणून महत्त्वपूर्ण पर्यावरणीय भूमिका बजावतात. आजच्या या पोस्ट मध्ये आपण पक्ष्यांची नावे (birds name in marathi) जाणून घेणार आहोत.

Birds name in marathi
पक्ष्यांची नावे (birds name in marathi)

25 पक्ष्यांची नावे (25 birds name in marathi)

Birds name in Englishपक्षी नावे मराठी
Cock (कॉक)कोंबडा
Hen (हेन)कोंबडी
Peacock (पीकॉक)मोर
Peahen (पीहेन)लांडोर
Swan (स्वान)हंस
Quail (क्वेल)लावापक्षी
Woodpecker (वुडपेकर)सुतारपक्षी 
Pigeon (पिजन)पारवा
Owl (आउल)घुबड
Eagle (ईगल)गरुड
Ostrich (ऑस्ट्रिच)शहामृग
Duck (डक)बदक
Flamingo (फ्लेमिंगो)रोहितपक्षी
Parrot (पॅरट)पोपट
Crane (क्रेन)बगळा
Hawk/Falcon (हॉक/फॉल्कन)बहिरी ससाणा
Penguin (पेंगविन)पेंग्विन
Weaver Bird (वीवर बर्ड)सुगरण,विणकर पक्षी
Raven (रेवन)डोंबकावळा
Dove (डव)बदक
Sparrow (स्पैरो)चिमणी
Gander (गैन्डर)नर हंस
Chick (चिक)कोंबडीचे पिल्लू
Cygnet (सिग्निट)हंसशावक
Cuckoo (कूकू)कोकीळ पक्षी 
25 पक्ष्यांची नावे (25 birds name in marathi)

50 पक्ष्यांची नावे (pakshanchi nave in marathi)

Birds name in Englishपक्षी नावे मराठी
Crow (क्रो) कावळा
Hummingbird (हमिंगबर्ड) गुणगुणणारा पक्षी
Nightingale (नाइटिंगैल) बुलबुल
Kingfisher (किंगफिशर) खंडया
Bat (बॅट) वटवाघूळ
Vulture (वल्चर) गिधाड
Heron (हेरन) बगळा
Goose (गूस) हंस
Drake (ड्रेक) नर बदक
Laughing Dove (लाफिंग डव) होला,भोवरी
Cattle Egret (कॅटल इग्रेट) गाय बगळा
Partridge (पार्ट्रिज) तितर
Kite (काइट) घार
Lark (लार्क) चंडोल
Cormorant (कॉर्मरन्ट) पाणकावळा
Peewit (पीविट) टिटवी
Cockatoo (कोकाटू) काकाकुवा
Wiretailed Swallow (वायरटेल्ड स्वालो) तारवाली,पाकोळी
Stork (स्टॉर्क) करकोचा
Kiwi Bird (कीवी बर्ड) किवी पक्षी
Turkey (टर्की) टर्की पक्षी
Seagull (सीगल) सीगल,समुद्र पक्षी
Oriental Magpie Robin (ओरिएंटल मॅग्पी रॉबिन) दयाळ पक्षी
Mynah (मैना) मैनासाळुंकी
Macaw (मकाव) दक्षिण व मध्य अमेरिकेतील एका जातीचा पोपट
50 पक्ष्यांची नावे (pakshanchi nave in marathi)


100 भारतीय पक्ष्यांची नावे (Birds name in marathi)

Birds name in Englishपक्षी नावे मराठी
Sunbird (सनबर्ड) सूर्यपक्षी
Black Drongo (ब्लॅक ड्रोंगो) कोतवाल
Purple Rumped Sunbird (पर्पल रॅम्प्ड सनबर्ड) पंचरंगी सूर्यपक्षी
Shikra (शिक्रा) शिकरा
Little Grebe/Dabchick (लिटल ग्रेब/डॅबचिक) टिबुकली,पानडुबी
Rufous Backed Shrike (रुफुसबॅक्ड श्राइक) खाटीक पक्षी
Pheasant Tailed Jacana (पेजन्ट टेल्ड जकाना) कमळपक्षी
Hoopoe (हूपू) हुदहुद
Coot (कूट) वारकरी पक्षी
Pacific Golden Plover (पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर) सोन चिखल्या
Grey Junglefowl (ग्रे जंगलफउल) राखी रानकोंबडा
Indian Roller/Blue Jay (इंडियन रोलर/ब्ल्यू जय) नीलपंख,नीलकंठ
Kentish Plover (केन्टिश प्लोव्हर) केंटिश चिखल्या
Finch (फिंच) फिंच
Golden Oriole (गोल्डन ओरिओल) हळद्या
Atlantic Puffin (अटलांटिक पफीन) पफ्फीन पक्षी
Hornbill (हॉर्नबिल) धनेश
Bulbul (बुलबुल) बुलबुल पक्षी
Indian Robin (इंडियन रॉबिन) चिरक
Greater Coucal (ग्रेटर कूकल) भारद्वाज पक्षी
Great Indian Bustard (ग्रेट इंडियन बस्टर्ड) माळढोक
Common Tailorbird (कॉमन टेलरबर्ड) शिंपी पक्षी
Oriental Darter (ओरिएंटल डार्टर) सर्वपक्षी,सापमान्या,तिरंदाज
Redwattled Lapwing (रेडवॅटल्ड लॅपविंग) टिटवी,लाल गाठीची टिटवी
White Eyed Buzzard (व्हाइट आइड बझार्ड) शिंजरा तिसा
100 भारतीय पक्ष्यांची नावे (Birds name in marathi)

पक्ष्यांची माहिती मराठी (Birds information in marathi)

पेंग्विन (Penguin in marathi)

पेंग्विन एक पक्षी आहे परंतु तो हवेमध्ये उडू शकत नाही. पेंग्विन पक्षाच्या जवळजवळ 17 प्रजाती आहेत परंतु त्यामधील 13 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पेंग्विन पक्षी दक्षिण आफ्रिका, अंटार्टिका, चिली, न्युझीलँड, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतो. पेंग्विन पक्षी बर्फाळ प्रदेशात सुद्धा आढळतो. पेंग्विन पक्षी कमीत कमी वीस मिनिटे आपला श्वास रोखून धरू शकतो. दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक पेंग्विन दिवस (World penguin day) म्हणून साजरा केला जातो. पेंग्विन या पक्षाला दात नसतात. परंतु तो आपली शिकार खाण्यासाठी आपल्या चोचीचा उपयोग करतो. 

पेंग्विन एक मांसाहारी पक्षी आहे. आणि हा पक्षी आपले संपूर्ण अन्न समुद्रापासून मिळवतो. पेंग्विन पक्षी सामान्यपणे आपल्या आहारात झिंगा, खेकडे आणि मासे खातो. आणि तो आपल्या आहारासोबत दगड सुद्धा खातो. कारण दगड त्याच्या अन्नाला पचण्यासाठी मदत करतात. पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये पोहु सुद्धा शकतो. पेंग्विन पक्षी पाण्यामध्ये जवळजवळ 900 फूट खोल पर्यंत पोहू शकतो. 

पोपट (Parrot in marathi)

पोपट पक्षी एक विश्वासघाती पक्षी म्हणून ओळखला जातो.  कारण आपण याला कितीही काळापर्यंत पाळीव ठेवले तरीही, जेव्हा आपण त्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडतो तेव्हा तो मालकाकडे पलटून बघत सुद्धा नाही.पोपट हा एकमेव असा पक्षी आहे जो पायाचा उपयोग करून आपल्या चोची पर्यंत अन्न नेऊ शकतो.पोपट पक्षी आपल्या प्रमाणे त्यांच्या पिल्लांची नावे ठेवतो. आणि ती नावे जीवन भरासाठी असतात. जगातील सर्वात मोठा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये आढळतो. ज्याचं नाव Hyacinth Macaw Parrot आहे. ज्याची लांबी जवळजवळ 1 मीटर आहे.जगातील सर्वात वजनदार पोपट न्यूझीलंडमध्ये आढळतो. ज्याचं नाव काकापो (Kakapo) आहे. ज्याचे वजन दोन ते चार किलो ग्रॅम असते.

जगातील सर्वात लहान पोपट Buff Faced Pygmy Parrot आहे असे. जो इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनी मध्ये आढळतो. ज्याचे वजन फक्त 11.5 ग्रॅम असते.काकापो हा जगातील एकमेव असा पोपट आहे जो उडू शकत नाही. हे त्याच्या मोठ्या शरीरामुळे शक्य नाही.जगातील सर्वात जास्त शिकलेला पोपट ह Puck नावाचा पोपट आहे. हा शब्दकोशातील 1728 शब्द वाचू शकतो. जे एक विश्व रेकॉर्ड आहे. जगभरामध्ये पोपट पक्षाच्या जवळजवळ 393 प्रजाती आढळतात.पोपट हा पक्षी दक्षिण आणि मध्य अमेरिका, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सहित सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो.

हंस (Swan in marathi)

हंस पक्षी हा एक जलीय परिवारातील (Waterfowl family) सर्वात मोठा सदस्य आहेत. हंस पक्षाची कोस्कोरोबा हंस (Coscoroba Swan) नावाची सुद्धा एक प्रजाती आहे. परंतु आता या प्रजातीला हंस मानले जात नाही. हंस हा पक्षी बदकाच्या रूपाशी संबंधित आहे. हंस हा पक्षी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात च्या भूमध्य रेषेच्या दोन्ही किनाऱ्यावर आढळतो.उत्तरी हंस पक्षी (Northern Swan) पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची चोच नारंगी रंगाची असते.

दक्षिण हंस पक्षाचा रंग पांढरा आणि काळ्या रंगाचा मिश्रण असतो. त्याची चोच लाल, नारंगी किंवा काळ्या रंगाची असते.हंस हा पक्षी पूर येणाऱ्या गवताच्या मैदानामध्ये, तलावामध्ये नदी आणि नाल्यांमध्ये आढळतो. हंस हा पक्षी साधारणपणे समशीतोष्ण वातावरणामध्ये आढळतो. उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये हा पक्षी आढळत नाही. हंस हा पक्षी आफ्रिका आणि अंटार्टिका खंडावर आढळत नाही.

गरुड (Eagle in marathi)

जगभरामध्ये गरुड पक्षाच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. गरुड पक्षाच्या अधिकांश प्रजाती युरेशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतात. या क्षेत्राच्या बाहेर फक्त 14 प्रजाती आहेत: उत्तर अमेरिकेमध्ये 2, दक्षिण अमेरिकेमध्ये 9 आणि ऑस्ट्रेलिया मध्ये 3. गरुड पक्षांच्या प्रजाती नुसार त्यांचे आयुष्यमान 14 ते 35 वर्ष यामध्ये असते. वातावरणानुसार गरुड पक्षाची लांबी वजन आणि आकार यामध्ये विविधता आढळून येते. जंगलामध्ये राहणाऱ्या गरूड पक्षाचे पंख कमी विस्ताराचे असतात. आणि मैदानी आणि मोकळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या गरुडाचे पंख जास्त विस्तारित असतात. व्यस्क या नर गरुडाचे वजन जवळजवळ 4.1 किलोग्रॅम असते.

गरुड पक्षाची सर्वात लहान प्रजाती दक्षिण निकोबार मधील  serpent eagle (Spilornis klossi) आहे. जीचे वजन 450 ग्रॅम आणि लांबी 40 सेंटीमीटर आहे. लांबी आणि पंखाच्या विस्ताराच्या आधारावर Philippine eagle (Pithecophaga jefferyi) जगातील गरुडा ची सर्वात मोठी प्रजाती मानली जाते. Steller’s sea eagle आणि harpy eagle वजन आणि आकाराच्या मानाने सर्वात मोठी प्रजाती मानली जाते. जगातील सर्वात जास्त वजन असलेला गरुड स्टेलर हा समुद्री गरुड (Steller’s sea eagle) आहे. ज्याचे वजन नऊ किलोपर्यंत असते.

मोर (Peacock in marathi)

केवळ नर मोरालाच पिकॉक म्हणतात. मादी मोराला Peahen म्हणतात. मोराला सामूहिक रूपामध्ये Peaowl म्हणतात. आणि मोराच्या पिल्लांना Peachicks म्हणतात. मोराच्या साधारणपणे तीन प्रमुख प्रजाती आहेत. ज्यामध्ये आशियातील दोन आणि आफ्रिकेमधील एक समाविष्ट आहे. निळा भारतीय मोर (Blue Indian Peacock) आणि हिरवा मोर (Green Peacock) या आशियन प्रजाती आहेत. तर कांगो मोर (African Congo Peacock) ही आफ्रिकन प्रजाती आहे. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. 26 जानेवारी 1963 रोजी निळ्या मोर पक्ष्याला भारत सरकार द्वारे भारताचा राष्ट्रीय पक्षी (National Bird Of India)  म्हणून घोषित केले गेले.

मोर हा जगातील सर्वात मोठा उडणाऱ्या पक्ष्यापैकी सुद्धा एक आहे. त्याच्या पंखाचा पिसारा 1.5 मीटर च्या आसपास असतो. मोर पक्षाचा हवेमध्ये उडण्याचा वेग दहा मैल प्रतितास असतो. मोर हा एक सर्वाहारी पक्षी आहे. जो मुख्य रूपामध्ये अन्नधान्य, गवत, फळे, बिया, फुलांच्या पाकळ्या, मुंग्या, कीटक, उंदीर, पाल, साप इत्यादी खातो. जंगलामध्ये राहणाऱ्या मोरांचा जीवनकाळ शिकारी आणि कठोर वातावरणामुळे वीस वर्षांपर्यंत असतो. सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या मोरांचा जीवन काळ 50 वर्षापर्यंत असतो.

मोराची लांबी सहा ते सात फूट असते. आणि मोरनी ची लांबी 3 ते 3.5 फूट असते. मोराच्या चोचीची ची लांबी एक इंच असते. मोराच्या रंगीबेरंगी शेपटीला Train म्हणतात. ज्यामध्ये दीडशे पंख असतात. मोराची शेपटी त्याच्या पूर्ण लांबीच्या 60 टक्के असते. नर मोराच्या डोक्यावर मुकुटा प्रमाणे सुंदर तुरा असतो. त्याचा रंग आणि आकार प्रजाती नुसार वेगवेगळा असतो. नर मोर मादी मोराच्या तुलनेने अधिक सुंदर असतो. मोराच्या पंखा साठी आपल्याला त्याची शिकार करावी लागत नाही, ते आपल्याला उष्ण हवामानामध्ये पडलेले आढळतात.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण पक्ष्यांची नावे (birds name in marathi) जाणून घेणार आहोत. पक्ष्यांची नावे (pakshanchi nave in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “100 + पक्ष्यांची नावे | Birds name in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *