मुंगुस माहिती मराठी | Mongoose information in marathi

Mongoose information in marathi : मुंगूस ज्याला आपण सापाचा सर्वात मोठा शत्रू मानतो, तो जवळजवळ जगाच्या सर्व भागांमध्ये आढळतो. हा जीव दिसायला एखाद्या उंदरासारखा दिसतो परंतु तो सापाला सुद्धा मारू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण मुंगुस माहिती मराठी (Mongoose information in marathi) जाणून घेणार आहोत.

Mongoose information in marathi
मुंगुस विषयी माहिती (Mongoose information in marathi)

मुंगुस विषयी माहिती (Mongoose information in marathi)

प्राणी मुंगुस (Mongoose in marathi)
लांबी8 ते 26 इंच
वैज्ञानिक नाव Herpestidae
कुळनकुलाद्य
आयुष्यमान सहा ते दहा वर्षे
मुंगुस विषयी माहिती (Mongoose information in marathi)

1) मुंगसाला असंच सापाचा शत्रू असे मानले जात नाही. उदाहरणासाठी जर साप आणि मुंगूस समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू होते. आणि या युद्धाचा शेवट सापाच्या जखमी होण्याने किंवा मेल्याने होतो.

2) मुंगूस याला इंग्रजीमध्ये Mongoose असे म्हणतात.

3) आत्तापर्यंत जगभरामध्ये मुंगसाच्या 23 प्रजाती शोधल्या गेल्या आहेत. यामधील काही प्रजाती दिवसा शिकार करतात तर काही प्रजाती रात्री च्या वेळी शिकार करतात.

4) मुंगसाच्या मादीचा गर्भ काळ 60 दिवसांचा असतो. आणि मादी मुंगूस एका वेळेस तीन ते चार पिलांना जन्म देते.

5) एक मुंगूस साधारणपणे सहा ते दहा वर्षे जिवंत राहू शकते.

6) मुंगसाची पिल्ले जन्माच्या वेळेस अंध असतात. म्हणजे जन्माच्यावेळी मुंगुसाच्या पिल्लांना दिसत नाही. परंतु दोन आठवड्यानंतर त्यांना दिसायला सुरू होते.

7) मुंगसाची पिल्ले जन्मताच त्यांचे वजन 25 ते 28 ग्राम असते.

8) जेव्हा मुंगुसाला पिल्ले जन्मतात तेव्हा त्याच्या शरीरावर काहीही केस नसतात.

9) अधिकांश मुंगूस आपले घर बनवत नाहीत. तर ते उंदीर किंवा ससा यांच्या सोडलेल्या घरांमध्ये राहतात.

10)  मुंगूस हा जीव 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो.

मुंगुस माहिती मराठी (Mongoose mahiti marathi)

11) मुंगूस हा मांसाहारी जीवांच्या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. आणि हा भोजनासाठी लहान लहान किडे ते साप खातो.

12) मुंगसाची लांबी 8 ते 26 इंच इतकी असते. आणि त्यांची उंची 6 ते 18 इंच असते. मुंगुसाचे वजन 500 ग्रॅम ते पाच किलोपर्यंत असते.

13) मुंगूस हा एक असा जीव आहे साधारणपणे कधीही दुसऱ्या वर हल्ला करत नाही. परंतु जेव्हा त्याला असे वाटते की आता आपल्याला धोका आहे तेव्हा तो आक्रमक होतो.

14) अनेक शास्त्रज्ञांनी मुंगुसाचे अनेक वेळा निरीक्षण केले परंतु त्यांना त्याची भाषा समजली नाही.

15) मुंगूस हा जीव साधारणपणे पहाडी भागामध्ये राहणे पसंत करतो.

16) मुंगूस माणूस ज्याप्रमाणे अंडी खातो त्याचप्रमाणे अंडी खातो.

17) मुंगूस हा एक सामाजिक प्राणी आहे जो समूहामध्ये राहणे पसंद करतो. मुंगुसाचा समूह पन्नास किंवा अधिक मुंगुसाचा असू शकतो.

18) मुंगुसाचा समूहाला पेक्स या नावाने ओळखले जाते.

19) जगामध्ये आढळणार्‍या सर्वात लहान मुंगुसाचा आकार फक्त दहा इंच आहे आणि त्याचे वजन तीनशे ग्रॅम आहे.

20) मुंगुसाच्या शरीरावर सापाच्या विषाचा खूप कमी प्रमाणात प्रभाव होतो. त्यामुळे मुंगुस सापाला सहजपणे मारू शकते. 

21) मुंगसाचे पंजे खूप घातक असतात. तो त्याच्या मदतीनेच आपल्या पिल्लांची आणि स्वताची रक्षा करतो.

22) जगामध्ये आढळणाऱ्या सर्वात मोठ्या मुंगुसाचा आकार जवळजवळ तीस इंच असतो. आणि त्याचे वजन पाच ते सात किलोपर्यंत असते.

23) भारतीय ग्रे मुंगूस कोब्रासारख्या विषारी सापांशी लढण्यासाठी आणि खाण्यासाठी ओळखले जाते.

24) प्राचीन इजिप्शियन लोकांनी मुंगूसला पवित्र आणि आदरणीय प्राण्यांचा दर्जा दिला. प्राचीन इजिप्शियन कबर आणि दफनांमध्ये मुंगूसच्या प्रतिमा सापडल्या आहेत.

25) जगात आढळणारा सर्वात लहान मुंगूस / बटू मुंगूस फक्त 10 इंच आकाराचा आहे आणि त्याचे वजन सुमारे 300 ग्रॅम आहे.

26) मुंगूस  हा प्राणी ताशी 32 किलोमीटर वेगाने धावू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मुंगुस समानार्थी शब्द मराठी

मुंगुस समानार्थी शब्द मराठी नकुल

मुंगूस दिसणे शुभ की अशुभ

मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो, मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे, ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडले त्या दिवशी आपण समजून घ्यावे कि आपला दिवस हा शुभ जाणार आहे.

मुंगूस काय खातो?

किडे,सरडे,पक्षी व अंडी,कृंतक,साप,मृत प्राणी हे मुंगसाचे प्रमुख भक्ष आहे.

मुंगूस आणि सापाची लढाई

जर साप आणि मुंगूस समोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू होते. आणि या युद्धाचा शेवट सापाच्या जखमी होण्याने किंवा मेल्याने होतो.

मुंगूस कोठे राहतो?

मुंगूस हा जीव साधारणपणे पहाडी भागामध्ये राहणे पसंत करतो. परंतु तो आपल्याला सहज कोठेही पाहायला मिळतो.

मुंगूस आणि सापाची गोष्ट

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण मुंगुस विषयी माहिती (Mongoose information in marathi) जाणून घेतली. मुंगुस माहिती मराठी (Mongoose mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *