उंदीर प्राणी माहिती मराठी | Rat information in marathi

Rat information in marathi : भारतामध्ये उंदराला भगवान गणेशाचे वाहन या रूपात मान्यता प्राप्त आहे. उंदीर एक मध्यम आकाराचा, लहान शेपटीचा प्राणी आहे. याची उत्पत्ती आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. परंतु आज हा जगातील अंटार्टिका ला सोडलं तर सर्व खंडामध्ये आढळतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण उंदीर प्राणी माहिती मराठी (Rat information in marathi) जाणून घेणार आहोत.

Rat information in marathi
उंदीर प्राणी माहिती मराठी (Rat information in marathi)

उंदीर प्राणी माहिती मराठी (Rat information in marathi)

प्राणीउंदीर
वंशपृष्ठवंशीय
प्रजाती137
शास्त्रीय नावRattus Rattus
आयुर्मान 2 ते 4 वर्षे
उंदीर प्राणी माहिती मराठी (Rat information in marathi)

1) भारतामध्ये उंदराला भगवान गणेशाचे वाहन या रूपात मान्यता प्राप्त आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच उंदराचीही पूजा केली जाते.

2) राज्यस्थान च्या बीकानेर मध्ये स्थित करणी माता मंदिरामध्ये याची पूजा केली जाते. आणि त्यांनी खाल्लेला प्रसाद वितरित केला जातो.

3) उंदीर हा रचनात्मकता, बुद्धिमान, उदारता, इमानदारी याचं प्रतीक मानला जातो.

4) जगामध्ये उंदराच्या 137 पेक्षा जास्त अधिक प्रजाती आढळतात.

5) अंटार्टिका असा एकमेव खंड आहे जेथे उंदीर आढळत नाही.

6) पाळीव प्राण्याच्या रूपामध्ये पाहिला जाणारा उंदीर हा फॅन्सी उंदीर (Fancy rat) आहे.

7) उंदराचा आकार साधारणपणे पाच इंच (12 सेंटीमीटर) किंवा त्यापेक्षा अधिक असतो.

8) उंदरा ची सर्वात मोठी प्रजाती बोसावी वूली उंदीर आहे. ज्याला 2009 मध्ये शोधले गेले होते. उंदराची ही प्रजाती जवळजवळ मांजराच्या आकाराची असते.

9) उंदराची सर्वात लहान प्रजाती व्हिएतनाम मध्ये आढळली आहे.

10) नर उंदराला Bucks, मादा उंदराला Does आणि त्याच्या पिल्लांना Pups किंवा Kittens म्हणतात.

गणपतीचे वाहन उंदीर माहिती (Undir mahiti Marathi)

11) उंदरांच्या समूहाला Mischief म्हणतात.

12) उंदरांचा जीवन काळ तो जंगली आहे किंवा पाळीव आहे यावरून ठरवता येतो. जर उंदराला पाळून त्याची चांगल्या प्रकारे देखरेख केली तर तो चार वर्षापर्यंत जगू शकतो. जंगली उंदीर एक किंवा दोन वर्षे जगतो.

13) कांगारू उंदीर पाणी न पिता दहा वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.

14) भोजन न करता उंदीर चार दिवसांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही.

15) उंदीर सर्वभक्षी असतात. म्हणजेच ते अन्नधान्य, किडे, छोटे पक्षी इत्यादी खातात.

16) उंदराचा गर्भधारण काळ 21 ते 24 दिवस असतो.

17) उंदीर एका वेळेस वीस पेक्षा जास्त पिल्लांना जन्म देऊ शकते.

18) जन्माच्यावेळी उंदराच्या पिल्लांचे वजन जवळजवळ सहा ते आठ ग्रॅम इतके असते.

19) नवीन जन्मलेल्या उंदरांचे डोळे बंद असतात. त्यांचे डोळे उघडण्यासाठी 12 ते 17 दिवसांचा वेळ लागतो.

20) उंदीर उभ्या स्थितीमध्ये दोन फुटापेक्षा जास्त हवेमध्ये उडी मारू शकतात.

उंदीर प्राणी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Rat facts in marathi)

21) उंदराची दृष्टी खूप कमजोर असते.

22) उंदराची ऐकण्याची घेण्याची शक्ती खूप तेज असते.

23) उंदीर एखाद्या गोष्टीचा स्वाद खुप लवकर ओळखू शकतो.

24)  उंदराला कधीही घाम येत नाही. परंतु त्याच्या शेपटी मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या त्याच्या शरीरातील तापमान नियंत्रित ठेवतात.

25) उंदराचे दात आयुष्यभर वाढत असतात. त्याचे पुढचे दात दरवर्षी चार ते पाच इंच वाढतात.

26) उंदराचे दात खूप मजबूत असतात. त्यापासून ते काच, तार, ॲल्युमिनियम सहजपणे तोडू शकतात.

27) जसजसे उंदराचे वय वाढत जाते तसतसे त्याच्या दातांचा रंग पिवळा होत जातो.

28) उंदराचे पचन तंत्र खूप विकसित नाही.

29) उंदराची लक्षात ठेवण्याची शक्ती खूप तेज असते.

30) उंदरांमध्ये पित्ताशयाची पिशवी नसते.

उंदीर प्राणी माहिती मराठी (Mouse animal information in marathi)

31) उंदीर जरी पन्नास फूट उंचीवरून खाली पडले तरीही त्याला काही होत नाही.

32) उंदीर खूप छान पणे पोहू शकतो. तो पाण्यामध्ये तीन मिनिटापर्यंत आपला श्वास रोखू शकतो.

33) उंदराला सुद्धा माणसाप्रमाणे गुदगुल्या होतात. 

34) उंदीर आनंदी असल्यावर हसल्यासारखा आवाज काढू शकतो.

35) उंदीर आपल्या समूहातील घायाळ आणि आजारी उंदराची देखभाल करतात.

36) जगभरामध्ये दरवर्षी जवळजवळ वीस टक्के कृषी उत्पादन उंदरामुळे नष्ट होते.

37) वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार उंदीर खूप लवकर लपाछपीचा खेळ खेळणे शिकतात.

38) प्राचीन रोम शहरामध्ये पांढरा उंदीर रस्त्यावरून गेल्यास शुभ आणि काळा उंदीर रस्त्यावरून गेल्यास अशुभ मानले जात होते.

39) हिंदू धर्मामध्ये उंदराला भगवान शंकराचे वाहन म्हणतात.

40) युरोपच्या शहरी भागांमध्ये उंदीर पकडणे एक लोकप्रिय काम आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उंदीर काय खातो?

उंदीर सर्वभक्षी असतात. म्हणजेच ते अन्नधान्य, किडे, छोटे पक्षी इत्यादी खातात.

उंदीर चावल्यास काय करावे?

शक्य तितक्या लवकर कोमट पाण्याने आणि साबणाने हे क्षेत्र धुवावे. स्वच्छ टॉवेल ने ते क्षेत्र कोरडे करावे आणि त्यावर प्रतिजैविक मलम लावावे. आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उंदीर कुठे राहतो?

उंदीर हा प्राणी साधारणपणे जमिनीमध्ये बिळे करून राहतो.

कोणकोणते प्राणी उंदीर खातात?

साप, मांजर, कुत्रा इत्यादी

उंदीर किती वर्ष जगतो?

उंदीर 2 ते 4 वर्षे जगतो.

उंदीरांच्या काही सामान्य प्रजाती काय आहेत?

उंदीरांच्या दोन सर्वात सामान्य प्रजाती म्हणजे काळा उंदीर आणि तपकिरी उंदीर. काळा उंदीर तपकिरी उंदीरापेक्षा लहान आणि अधिक चपळ असतो आणि बर्याचदा शहरी भागात आढळतो. तपकिरी उंदीर मोठा आणि ग्रामीण भागात अधिक सामान्य आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण उंदीर प्राणी माहिती मराठी (Rat information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. गणपतीचे वाहन उंदीर माहिती (Mouse animal information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *