कुत्रा प्राणी माहिती मराठी | Dog information in marathi

Dog information in marathi : प्रामाणिकपणा हा शब्द जर कोणत्या प्राण्याला शोभत असेल तर तो म्हणजे कुत्रा. कुत्रा हा मानवाचा प्रामाणिक मित्र आहे. लांडग्याच्या वंशाचा हा प्राणी, ज्याला मानवा द्वारे सर्वात जास्त पाळले जाते. प्रामाणिकपणा हे त्याच सर्वात मोठं कारण आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi) जाणून घेणार आहोत.

Dog information in marathi
कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi)

कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi)

प्राणीकुत्रा
संघ रज्जुकी (Chordata)
वर्ग स्तनधारी (Mammalia)
शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस फॅमिलीरिस
आयुर्मान 10 ते 14 वर्षापर्यंत
कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi)

1) जगभरामध्ये जवळजवळ चारशे मिलियन कुत्रे आहेत आणि त्यांच्या शेकडो प्रजाती सुद्धा आहेत.

2) कुत्रा हा प्राणी लांडगा या प्राण्याच्या वंशाचा मानला जातो. यांचा डीएनए 99% लांडग्याशी मिळताजुळता असतो.

3) साधारणपणे एक कुत्रा 10 ते 14 वर्षापर्यंत जगतो. परंतु त्याचा मेंदू दोन वर्षाच्या माणसाच्या मुला इतका असतो.

4) पाळीव कुत्र्यांचा जीवन काळ सुद्धा अन्य कुत्र्यांच्या तुलनेने जास्त असतो.

5) मानवाच्या बोटांचे ठसे प्रमाणे कुत्र्यांच्या नाकाचे निशाण सुद्धा वेगवेगळे असतात.

6) कुत्र्याला रात्री आणि दिवसा पाहण्याची क्षमता खूप चांगली असते.

7) कुत्र्याच्या पिल्लांना 28 दात असतात. वयस्क कुत्र्यांना 42 दात असतात.

8) कुत्रा चांगल्या प्रकारे पोहू शकतो.

9) कुत्र्याचा मेंदू मानवाच्या मेंदूच्या आकाराचा 10 वा भाग असतो.

10) कुत्र्याच्या नाकामध्ये दोन छिद्र असतात. जेथे खूप साध्या गंध संवेदनशील कोशिका असतात.

कुत्रा माहिती मराठी मध्ये (Kutra chi mahiti marathi madhe)

11) कुत्र्याची श्रवणशक्ती माणसाच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते.

12) एक कुत्रा एका सेकंदामध्ये सहापासून ते शंभर भागामध्ये ध्वनीचा स्त्रोत ओळखू शकतो.

13) कुत्रा माणसाप्रमाणे स्वप्न पाहू शकतो. तो झोपेत असताना पाय हलवणे हे या गोष्टीचे संकेत असते.

14) कुत्रा सुद्धा आल्याप्रमाणे उजव्या किंवा डाव्या हाताचा असतो.

15) मानवाचे रक्त चार प्रकारचे असते. O, A, B, AB. आणि कुत्र्यांचे रक्त 13 प्रकारचे असते.

16) कुत्र्याच्या पायाचा पंजा सोडला तर कुत्र्याला कोणत्याही भागावर घाम येत नाही. त्याची एकमेव घाम येण्याची ग्रंथी पायाच्या अंगठ्याच्या मध्ये असते.

17) कुत्र्याच्या दोन्ही कानामध्ये माणसाच्या तुलनेने दुप्पट मास पेशी असतात.

18) 21 टक्के कुत्रे झोपे मध्ये असताना घोरतात.

19) कुत्रा या प्राण्याचा प्रजनन काळ नऊ आठवड्यांचा असतो.

20) एका वेळेस कुत्रीन चार ते सहा पिल्लांना जन्म देते.

कुत्रा या प्राण्याविषयी रोचक तथ्य (Dog facts in marathi)

21) जन्माच्या वेळेस कुत्र्याची पिल्ले अंध आणि बहिरी असतात. आणि दात नसतात. त्यांच्या नाकाच्या हिट सेन्सर च्या मदतीने ते आपल्या आईला शोधू शकतात.

22) जन्माच्या नंतर कुत्र्याच्या शरीराचा विकास खूप वेगाने होतो. त्यांच्या जन्माच्या चार ते पाच महिन्याच्या आत ते आपल्या शरीराचे अर्धे वजन प्राप्त करतात.

23) वेगाने विकास होत असल्यामुळे कुत्र्याची पिल्ले एका दिवसांमध्ये अठरा ते वीस तास झोपतात. परंतु एक वयस्क कुत्रा दहा ते बारा तास झोपतो.

24) कुत्रा हा सर्वाहारी प्राणी आहे. म्हणजेच तो मास सुद्धा खातो. आणि त्याबरोबरच अन्न सुद्धा खातो.

25) कुत्रा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे. तो एकटे राहणे पसंत करत नाही.

26) एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाला घरी आणण्यासाठी त्याचं वय साधारणपणे 8 ते 12 आठवडे असतं.

27) कुत्रा साधारणपणे 19 मैल प्रतितास या वेगाने धावू शकतो.

28) सर्व कुत्र्याची जीभ गुलाबी रंगाची असते. परंतु काही कुत्र्यांची जीभ काळ्या रंगाची सुद्धा असते.

29) जगामध्ये सर्वात जास्त काळ जिवंत रहाणाऱ्या कुत्र्याचे नाव Maggie होते. तो तीस वर्षापर्यंत जिवंत होता.

30) मनुष्यामध्ये होणाऱ्या कॅन्सर किंवा अन्य रोगांचा पत्ता लावण्यासाठी सुद्धा कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जातं. कुत्रा श्वासाद्वारे कॅन्सरच्या सेल्स ओळखू शकतो.

कुत्रा या प्राण्याविषयी माहिती (kutra in marathi)

31) चॉकलेट कुत्र्याच्या शरीरावर एखाद्या विषाप्रमाणे काम करतात.

32) दहा वर्षापेक्षा अधिक वयाची कुत्रे 50% कॅन्सरच्या कारणामुळे मरतात.

33) पवित्र ग्रंथ बायबल मध्ये 35 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस कुत्र्याचा उल्लेख केला आहे.

34) एक वर्षाचा कुत्रा 15 वर्षाच्या माणसाइतका समजदार असतो.

35) पहिल्यांदा आइसलँड वर कुत्र्यांना पाळणे गैरकानूनी होते. परंतु आता या कायद्यामध्ये सूट दिली आहे.

36) जर एखादा कुत्रा डाव्या बाजूला शेपटी हलवत असेल तर याचा अर्थ तो खूश आहे. आणि जर उजव्या बाजूला शेपटी हलवत असेल तर याचा अर्थ तो दुःखी आहे.

37) सामान्यपणे कुत्रा महिलांपेक्षा पुरुषांना पसंद असतो.

38) अमेरिकेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त राष्ट्रपती द्वारे पाळीव प्राणी कुत्रा पाळला जातो.

39) चीनमध्ये दररोज 30000 कुत्र्यांना मांस खाण्यासाठी मारलं जातं.

40) जर कुत्र्याच्या मालकाद्वारे अन्य कुत्र्याच्या प्रति स्नेह प्रदर्शित केले तर त्या कुत्र्याला जळण होते.

कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi)

41) कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात.

42) अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे.अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.

43) विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन 600 ग्रॅम पासुन अगदी 100 किलोपर्यंतही असते, तर उंची 8 इंचांपासून 4 फुटांपर्यंत असते.

44) रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे.

45) कुत्रा चावण्यास श्वानदंश असे म्हणतात. त्यामुळे रेबीज हा रोग होतो.

46) 45 टक्के अमेरिकेतील कुत्रे त्यांच्या मालकाच्या पलंगावर झोपतात.

47) ऑस्ट्रेलियन शेफर्ड खरेतर ऑस्ट्रेलियाचे नाही – ते अमेरिकन जातीचे आहेत.

48) अमेरिकेमध्ये 75 दशलक्षाहून अधिक पाळीव कुत्री आहेत जी इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत.

49) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, झोर्बा नावाचा मास्टिफ हा जगातील एकूण सर्वात मोठा कुत्रा आहे. झोर्बाचे वजन 343 पौंड होते आणि त्याचे नाकापासून शेपटापर्यंत आठ फूट होते. त्याचे वर्णन लहान गाढवाच्या आकाराचे आहे.

50) गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, आतापर्यंतचा सर्वात लहान कुत्रा मिरॅकल मिली, चिहुआहुआ होता. 2011 मध्ये जन्मलेली मिली 3.8 इंच उंच आणि एक पौंड वजनाची होती.

कुत्र्याच्या जाती

  • लॅब्रेडोर (labrador dog)
  • डॉबरमॅन (dobarman dog)
  • जर्मन शेपर्ड (german shepherd dog)
  • गोल्डन रिट्रीव्हर ( golden retriever dog)
  • बुलडॉग (bulldog)
  • वाघ्या (waghya)
  • राजापलयम (Rajapalayam)
  • कॉम्बाई (kombai)
  • मुधोळ हाउंड (mudhol hound)
  • रामपूर ग्रेहाउंड (Rampur greyhound)
  • इंडिअन परिहा कुत्रा (indian pariah dog)
  • कन्नी (kanni)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कुत्रा समानार्थी शब्द मराठी

कुत्रा समानार्थी शब्द श्वान

कुत्रा चावल्यास काय खाऊ नये?

तस पाहायला गेलं तर यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. परंतु नॉन व्हेज, कांदा. लसुन असे पदार्थ थोडे दिवस खाऊ नये.

कुत्र्याचा आवाज

कुत्र्याच्या आवाजाला भुंकणे असे म्हणतात.

कुत्र्याचे आजार उपचार

रेबीज, हार्टवर्म, पार्वोव्हारस, इयर माइट्स

कुत्र्याचे वैज्ञानिक नाव काय आहे?

कुत्र्याचे वैज्ञानिक नाव Canis lupus familiaris आहे.

कुत्र्याचे घर

कुत्रा हा प्राणी जास्त प्रमाणात घरामध्ये पाळला जातो त्यामुळे तो नेहमी मानवी वस्तीत राहतो.

कुत्र्याची नावे मराठी

राजा
सिंम्बा
टॉमी
टेडी
लिओ
राजा
प्रिन्स
लकी
मॅक्स
शेरू

कुत्रा किती वर्षे जगतो?

कुत्रा 10 ते 14 वर्षापर्यंत वर्षे जगतो.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण कुत्रा प्राणी माहिती मराठी (Dog information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. कुत्रा माहिती मराठी मध्ये (Kutra chi mahiti marathi madhe) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *