एएनएम म्हणजे काय | ANM full form in marathi

ANM full form in marathi : असे विद्यार्थी जे बारावीमध्ये शिकत असतील किंवा बारावीनंतर त्यांना मेडिकल फील्ड मध्ये काम करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ANM हा कोर्स सर्वात उपयुक्त आहे. एएनएम हा एक असा डिप्लोमा आहे, ज्यामध्ये आपल्याला एक चांगली नोकरी मिळेल आणि लोकांची सेवा करण्याचा आनंदही मिळेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण एएनएम काय आहे (ANM information in marathi), एएनएम चा फुल फॉर्म काय आहे (ANM Full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एएनएम चा फुल फॉर्म काय आहे (ANM Full form in marathi)

एएनएम म्हणजे काय (ANM information in marathi)

एएनएम (Auxiliary Nurse Midwife) म्हणजेच सहाय्यक नर्स. एएनएम हा मेडिकल क्षेत्रांमधील एक अंडर ग्रॅज्युएट नर्सिंग डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी साधारणपणे दोन वर्षाचा असतो. आणि यानंतर आपल्याला नर्सिंग मध्ये डिप्लोमा सर्टिफिकेट प्राप्त होते. एएनएम हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला सहा महिन्यासाठी इंटरंशिप करणे आवश्यक असते. हा एक वैद्यकीय विज्ञानातील प्रसिद्ध कोर्स आहे.

एएनएम कोर्स अंतर्गत मातृ आरोग्यसेवा आणि प्रेग्नेंसी संबंधित माहिती दिली जाते. आणि हा कोर्स फक्त महिलांसाठी उपलब्ध आहे. हा कोर्स एएनएम नर्सिंग या नावानेसुद्धा ओळखला जातो. जास्त प्रमाणात एएनएम म्हणजेच सहाय्यक नर्स ग्रामीण भागामध्ये काम करत असते. गावांमध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित माहिती देत असते.

एएनएम चा फुल फॉर्म काय आहे (ANM Full form in marathi)

एएनएम चा फुल फॉर्म Auxiliary Nurse Midwife आहे. यालाच मराठी मध्ये सहाय्यक नर्स असेही म्हणतात. ज्याच्या अंतर्गत मुलींना आपले करियर करण्याची संधी मिळते. जी साधारणपणे आरोग्याशी संबंधित सुविधा देते.

एएनएम हे प्रशिक्षित व्यावसायिक आहेत जे रुग्णांना वैद्यकीय मदत प्रदान करतात, विशेषत: ग्रामीण भागात जिथे आरोग्य सुविधांचा अभाव ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे. एएनएम नोंदणीकृत परिचारिका किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली काम करतात आणि रुग्णांना प्राथमिक आरोग्य सेवा देतात.

सहाय्यक नर्स कोर्स साठी शैक्षणिक योग्यता काय आहे (ANM Course Qualification in marathi)

 • एएनएम कोर्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
 • आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी उत्तीर्ण झालेल्या मुली हा कोर्स करू शकतात.
 • यासाठी बारावी मध्ये कमीत कमी 45 टक्के मार्क्स असणे आवश्यक असते.
 • उमेदवाराचे वय साधारणपणे 17 ते 35 या मध्ये असायला हवे.
 • उमेदवार शारीरिक आणि मानसिक रुपाने स्वस्थ हवा.

सहाय्यक नर्स कसे बनावे (How to become ANM in Marathi)

जर तुम्ही वरील सर्व अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही ऍडमिशन करू शकता. यासाठी तुम्हाला एएनएम कोर्स एडमिशन साठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी नोंदणी करावी लागते. त्यानंतर जवळच्या महाविद्यालयांमध्ये याची परीक्षा केंद्रे बनवली जातात. आपली परीक्षा झाल्यानंतर आलेल्या निकाला नुसार आपल्याला ॲडमिशन मिळते.

अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मेरीट च्या आधारावर ऍडमिशन दिले जाते. आणि तुम्ही खाजगी कॉलेजमधून सुद्धा हा कोर्स करू शकता.

एएनएम कोर्स ची फी किती असते (ANM Course fees in Marathi)

जर आपण सरकारी कॉलेजमधून दोन वर्षाचा कोर्स केला तर आपल्याला साधारणपणे एका वर्षाला दहा हजार रुपये फी असते. आणि जर आपण खाजगी कॉलेजमधून हा कोर्स केला तर आपल्याला साधारणपणे दोन लाख पर्यंत खर्च येतो.

एएनएम नोकरीच्या जबाबदाऱ्या
महिला आणि मुलांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात एएनएम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एएनएमच्या काही नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

रुग्णांना मूलभूत आरोग्य सेवा पुरविणे

 • ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
 • शस्त्रक्रिया आणि प्रसूतीमध्ये डॉक्टरांना मदत करणे.
 • आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार करणे.
 • रुग्णांच्या नोंदी ठेवणे.
 • रुग्णांना समुपदेशन करणे.

सहाय्यक नर्सला करिअरच्या संधी (ANM career opportunities in marathi)

एएनएम हा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण खालील ठिकाणी नोकरी मिळू शकतो:

 • सरकारी दवाखाने
 • खाजगी दवाखाने
 • वृद्धाश्रम
 • नर्सिंग स्कूल शिक्षक
 • स्टाफ नर्स
 • ग्रामीण आरोग्य केंद्र
 • एनजीओ

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एएनएम चा फुल फॉर्म काय आहे (ANM Full form in marathi) विषयी माहिती जाणून घेतली. एएनएम म्हणजे काय (ANM information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *