BMC Full form in marathi : आज-काल आपला देश अनेक मोठमोठ्या विकासामध्ये उंचावत चालला आहे. प्रत्येक शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दररोज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपले शहर सुंदर शहरामध्ये सामील होण्यासाठी शहराची सफाई आणि रस्त्याची दुरुस्ती महत्त्वाची असते. आज आपण अशाच एका कॉर्पोरेशन बद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या पोस्टमध्ये आपण बीएमसी म्हणजे काय (BMC information in marathi), बीएमसी चा फुल फॉर्म काय आहे (BMC Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती (BMC information in marathi)
- 2 बीएमसी चा इतिहास (History of BMC in Marathi)
- 3 बीएमसी चा फुल फॉर्म काय आहे (BMC Full form in marathi)
- 4 बीएमसी चा अर्थ काय आहे (BMC meaning in Marathi)
- 5 बीएमसी ची कार्ये
- 6 मुंबई महानगरपालिका आयुक्त यादी (List of Brihanmumbai Municipal Corporation commissioner)
- 7 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 8 निष्कर्ष
बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती (BMC information in marathi)
प्रकार | महानगरपालिका |
बोधवाक्य | यतो धर्मस्तो जय: |
स्थापना | सन 1888 |
महापौर | किशोरी पेडणेकर |
उपमहापौर | सुहास वाडकर |
महापालिका आयुक्त | इक्बालसिंग चहल |
बीएमसी जनतेसाठी काम करणारे एक महामंडळ आहे, जे सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. बीएमसीला म्युनिसिपल कार्पोरेशन ऍक्ट 1888 नुसार स्थापन केले गेले आहे. या महामंडळाला एका आयएएस अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार काम करावे लागते.
बीएमसी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका. ही महानगरपालिका पूर्ण मुंबई मध्ये म्हणजेच 480 वर्ग किलोमीटर मध्ये काम करते. या महानगरपालिकेचे बजेट अनेक राज्यांच्या नगरपालिकेपेक्षा अधिक असते. ही आशियातील एक श्रीमंत नगरपालिका आहे.
बीएमसी चा इतिहास (History of BMC in Marathi)
बीएमसी ची स्थापना 1888 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये मुंसिपल कारपोरेशन च्या एकूण 227 जागा असतात. ज्यासाठी मतदान घेतले जाते. यामध्ये अनेक राजकीय पक्ष भाग घेतात. मतदान झाल्यानंतर ज्या पक्षाला सर्वात जास्त मते मिळाली असतील त्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मुखिया (Leader) घोषित करतात. याचा कालावधी पाच वर्षाचा असतो आणि त्यानंतर परत मतदान घेतले जाते.
जून 2008 पर्यंत, बीएमसीमधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला, त्यानंतर बीएमसीने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली
बीएमसी चा फुल फॉर्म काय आहे (BMC Full form in marathi)
बीएमसी चा फुल फॉर्म आहे Brihanmumbai Municipal Corporation आणि याला मराठीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका असे म्हणतात. बीएमसीला Municipal Corporation Of Greater Mumbai (MCGM) या नावाने सुद्धा ओळखतात.
बीएमसी चा अर्थ काय आहे (BMC meaning in Marathi)
बीएमसी चा अर्थ आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. यालाच इंग्रजीमध्ये BMC (Brihanmumbai Municipal Corporation) म्हणतात.
बीएमसी ची कार्ये
- शहरांमध्ये नवीन रस्ते बनवणे आणि रस्त्यांची दुरुस्ती करणे.
- शहरामध्ये नवीन पूल बांधणे, जुन्या पूलांची दुरुस्ती करणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे.
- शहरांमध्ये स्वच्छतेकडे खास करून जास्त लक्ष देणे. शहराला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणे.
- शहरांमध्ये विजेची व्यवस्था करणे. नवीन विजेचे बल्ब बसवणे आणि खराब झालेले बल्ब बदलणे.
- एखाद्या व्यक्तीने सरकारी जमिनीवर अवैध कब्जा केला असेल तर त्याला हटवणे.
- महापालिके द्वारे शहरातील दवाखाने यांवर नियंत्रण ठेवणे.
- शहरामध्ये पाण्याच्या व्यवस्थेचे काम सुद्धा महानगरपालिकेकडे असते.
- गटारींची साफसफाई करणे आणि नवीन गटारी बनवणे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त यादी (List of Brihanmumbai Municipal Corporation commissioner)
- जॉनी जोसेफ
- जयराज फाटक
- प्रवीण परदेशी
- इक्बाल सिंग चहल
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA full form in marathi)
- एचआर चा फुल फॉर्म काय आहे (HR full form in marathi)
- आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full form in marathi)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका स्थापना
बीएमसी ची स्थापना 1888 मध्ये करण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिका नगरसेवक संख्या
मुंबई महापालिकेची सध्याची 227 ही नगरसेवक संख्या नऊने वाढवून 236 इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
BMC website
महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक कोण करते?
महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार करते.
मुंबई महानगरपालिका आयुक्त 2021
इक्बालसिंग चहल
बीएमसी म्हणजे काय?
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ही भारतातील मुंबई शहराच्या प्रशासन आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार नियामक संस्था आहे.
निष्कर्ष
आजच्या या पोस्टमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका माहिती (BMC information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. बीएमसी चा फुल फॉर्म काय आहे (BMC Full Form in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
B M C साठी परीक्षा द्यावी लागते का