विंचू माहिती मराठी | Scorpion information in marathi

Scorpion information in marathi : भारतात सुमारे 120 प्रकारचे विंचू आढळतात. मित्रांनो विंचू तुम्ही कधी ना कधी तुम्ही नक्कीच पाहिला असेलच. किंवा कोणाला तरी चावल्यावर तुम्ही ते नक्कीच ऐकलं असेल. आणि जर नसेल तर आजच्या या पोस्टमध्ये आपण विंचू माहिती मराठी (Scorpion information in marathi) जाणून घेणार आहोत.

Scorpion information in marathi
विंचू माहिती मराठी (Scorpion information in marathi)

विंचू माहिती मराठी (Scorpion information in marathi)

प्राणी विंचू
लॅटिन नाव Mesobuthus Tamulus
संघआर्थोपोडा
वर्गअष्टपाद
आयुमर्यादा 6 ते 25 वर्षे
विंचू माहिती मराठी (Scorpion information in marathi)

1) विंचू हा आठ पायांचा एक ऑर्थोपोडा जीव आहे. जो संपूर्ण जगभरामध्ये आढळतो. फक्त अंटार्टिका सोडून. जास्त करून विंचू हे दक्षिण गोलार्धामध्ये वाळवंटी आणि जंगली भागामध्ये आढळतात.

2) विंचू हा जीव सामान्यपणे उष्ण प्रदेशांमध्ये दगडाच्या खाली लपलेला आढळतो. आणि रात्रीच्या वेळी जास्त करून बाहेर येतो.

3) विंचू सामान्यपणे अशा ठिकाणी राहणे पसंत करतो जेथील तापमान 20 अंश ते 30 अंश असते.

4) विंचू या जीवा चा जीवन काळ अजून पर्यंत घोषित केला गेलेला नाही. परंतु काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार विंचू च्या वेगवेगळ्या प्रजाती सहा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात.

5) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विंचू या जिवाचा 90 टक्के प्रजाती मानवासाठी हानीकारक नसतात. परंतु विंचू चावल्यानंतर डॉक्टर इलाज करणे खूप गरजेचे असते.

6) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार विंचू या जीवा मध्ये आढळणाऱ्या विषयांमध्ये क्लोरोटॉक्सिन हे रसायन असते. ते जर ट्यूमर असलेल्या जागी लावले तर स्वस्थ आणि कॅन्सर ग्रस्त कोशिका ओळखणे सोपे होते.

7) एक विंचू साधारणपणे 19 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो.

8) इंडियन रेड स्कॉर्पियन हा जगातील सर्वात खतरनाक आणि घातक विषारी विंचू मानला जातो. याने जर एक डंक मारला तर मानवाचा मृत्यू होऊ शकतो.

9) विंचू या जीवाला जगातील सर्वात प्राचीन जीव मानलं जातं. एका निष्कर्षानुसार विंचू हा जीव पृथ्वीवर जवळजवळ चारशे मिलियन वर्षापासून राहत आहे. म्हणजेच जेव्हा पृथ्वीवर डायनासोर रहात होते तेव्हा पृथ्वीवर विंचू सुद्धा राहात होते.

10) विंचू एक रात्रीचर प्राणी आहे. म्हणजेच विंचू दिवसभर एका ठिकाणी असतो तर संध्याकाळी तो शिकार करण्यासाठी बाहेर पडतो.

विंचवाची माहिती (Vinchu mahiti marathi)

11) विंचू एकावेळी चार ते सहा पिल्लांना जन्म देऊ शकतो. जे जन्मल्या जन्मल्या त्यांच्या आईच्या अंगावर चढू शकतात. आणि ते तेव्हापर्यंत अंगावरून उतरत नाहीत जोपर्यंत ते शिकार करू शकत नाहीत.

12) सामान्यपणे एका विंचूचा आकार दोन ते तीन सेंटीमीटर पर्यंत असतो. आणि विंचवाचे वजन साधारणपणे 10 ते 100 ग्रॅम पर्यंत असते.

13) विंचू हा जीव एकटे राहणे पसंत करतो.

14) विंचवाच्या दोन हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

15) विंचवाचे विष हे कॅन्सरचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांसाठी खूप उपयुक्त असते.

16) भारतात सुमारे 120 प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा 18 ते 20 सेंटिमीटर लांबीचा असतो.

17) ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत.

18) महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.

19) विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.

20) विंचवाचे शरीर शरीर लांब, सपाट आणि डोके आणि उदर असे दोन भागात विभागलेले असते.

21) विष चवहीन, गंधहीन आणि चिकट द्रव आहे. हे पाण्यात, खारट द्रावणात आणि ग्लिसरीनमध्ये विरघळते. परंतु अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळत नाही.

22) विंचूच्या उत्क्रांतीचा इतिहास 435 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे.

23) विंचू प्रामुख्याने कीटक आणि इतर अपृष्ठवंशी प्राण्यांची शिकार करतो.

24) विंचू नृत्यासारखा दिसणारा विवाहसोहळा विधी करतात, ज्याला काहीवेळा प्रोमेनेड ए ड्यूक्स म्हणून ओळखले जाते.

25) विंचू प्रामुख्याने कीटक आणि कोळी यांची शिकार करतात, परंतु काही मोठ्या प्रजाती लहान सरडे किंवा उंदीर देखील खाऊ शकतात. ते सहसा दर दोन आठवड्यांनी आहार घेतात, परंतु काही काळामध्ये, ते न खाता 6 ते 12 महिने जगतात.

विंचू चावल्यावर घरगुती उपाय

  1. चिंचेमधील चिंचोके घेऊन त्यावरील आवरण काढले जाते आणि त्याच्या आतील पांढरा भाग दगडावर घासून तो विंचू चावलेल्या जागी धरतात.
  2. तुरटीचा खडा घेऊन ती गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती धरून ठेवायचा जेणे करून तुरटी वितळू लागेल. आणि तुरटी वितळू लागली की ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आणि ही तुरटी त्या भागाला चिटकून बसेल, नंतर जो पर्यंत त्या विंचवाचे विष निघून जात नाही, तोपर्यंत ही तुरटी तशीच धरून ठेवायची.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

विंचू चावल्यानंतर झालेले परिणाम

दंशाच्या जागेपासून वेदना वर वर चढत जाते आणि सुमारे तास-दोन तास ती वाढत जाते. तरुण व प्रौढ व्यक्तींमध्ये वेदनेपेक्षा जास्त परिणाम सहसा होत नाहीत. दंशाच्या ठिकाणी घाम येतो आणि स्नायूंची थरथर जाणवते. रक्तदाब थोडा वाढू शकतो व नाडीचा वेग थोडा मंदावतो.

विंचू मंत्र

हरी हरी या मंत्राने विंचवाचे विष उतरवले जाते.

विंचू या अर्थाची दोन नावे

वृश्चिक, इंगळी

इंगळी प्राणी

इंगळी फक्त आकाराने मोठी असते आणि तिचा दंशही तेवढाच घातक असतो. इंगळी आणि विंचू ही एकच जात असून फक्त त्यांचा प्रकार तेवढा वेगळा आहे. इंगळी आकाराने 20 सेंटिमीटर असू शकते.

विंचू काय खातात?

विंचू मांसाहारी असून प्रामुख्याने कीटक, कोळी आणि इतर लहान आर्थ्रोपोड्स खातात. विंचूंच्या काही मोठ्या प्रजाती सरडे आणि इतर लहान पृष्ठवंशी प्राण्यांना देखील खाऊ शकतात.

विंचू कुठे राहतात?

वाळवंट, जंगले आणि गवताळ प्रदेशयासह विविध अधिवासांमध्ये विंचू आढळतात. ते सामान्यत: उबदार, कोरड्या प्रदेशात आढळतात, परंतु काही प्रजाती अधिक दमट वातावरण सहन करू शकतात.

सर्व विंचू विषारी आहेत का?

होय, सर्व विंचूंमध्ये विष असते, परंतु विषाची शक्ती आणि विषारीपणा प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. सर्वसाधारणपणे, विंचू आक्रमक नसतात आणि केवळ स्वसंरक्षणासाठी डंक मारतात.

विंचू किती काळ जगतात?

विंचूचे आयुष्य प्रजातीनुसार बदलते, विंचूंच्या काही प्रजाती जंगलात २० वर्षांपर्यंत जगू शकतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण विंचू माहिती मराठी (Scorpion information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. विंचवाची माहिती (Vinchu mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *