माकड प्राणी माहिती मराठी | Monkey information in marathi

Monkey information in marathi : चपळ आणि खोडकर प्राण्यांचा जर विचार केला तर आपल्यासमोर माकडाचे नाव सर्वात पहिल्यांदा येतं. झाडावर उड्या मारताना, मदारीचा खेळ पाहताना आपल्याला माकड अनेक वेळा दिसतो. पण तुम्हाला माहित आहे का माकड जितका खोडकर आहे तितकाच तो बुद्धिमान सुद्धा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण माकड प्राणी माहिती मराठी (Monkey information in marathi) जाणून घेणार आहोत.

Monkey information in marathi
माकड प्राणी माहिती मराठी (Monkey information in marathi)

माकड प्राणी माहिती मराठी (Monkey information in marathi)

प्राणीमाकड
वंशपृष्ठवंशीय
जातसस्तन
वर्गPrimates
शास्त्रीय नाव Cercopithecidae
आयुर्मान10-50 वर्षे
माकड प्राणी माहिती मराठी (Monkey information in marathi)

दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस World Monkey Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सन 2000 पासून साजरा केला जातो.

1) जगभरामध्ये 260 पेक्षा अधिक प्रजातीचे माकड राहतात.

2) माकड जवळजवळ 50 लाख वर्षापासून पृथ्वीवर निवास करत आहे.

3) माकडांना प्रामुख्याने दोन श्रेणीमध्ये विभाजित केले जातं. एक म्हणजे जुन्या काळातील माकड आणि दुसरे म्हणजे नवीन काळातील माकड. नवीन काळातील माकड अमेरिका येथे आढळतात. जुन्या काळातील माकड आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात.

4) काही शारीरिक विशेषता आहेत ज्या जुन्या आणि नवीन माकडांमध्ये विविधता दर्शवतात.

5) जुन्या माकडांमध्ये 36 दात होते तर नवीन माकडांमध्ये 32 दात आहेत.

6) ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका सोडलं तर पृथ्वीवर सर्व ठिकाणी माकड आढळतात.

7) प्रजाती नुसार माकड दहा ते पन्नास वर्षे जगू शकते.

8) लोकांचं म्हणणं आहे की मनुष्याचा विकास माकडापासून झाला आहे.

9) माकडाच्या अधिकांश प्रजाती झाडावर निवास करतात. परंतु काही प्रजाती जमिनीवर सुद्धा राहतात.

10) माकडाची बोटे माणसाच्या बोटाच्या फिंगरप्रिंट प्रमाणे असतात. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीला सहजपणे पकडू शकतात.

वानर माहिती मराठी (Monkey in Marathi)

11) माकड जांभई सुद्धा देऊ शकते. माकड जांभई देण्याचा अर्थ असा की ते खूप थकलेले आहे.

12) माकड एक सामाजिक प्राणी आहे. तो साधारणपणे समूहामध्ये राहतो.

13) माकडांचा समूह एक माकडापासून ते बारा माकडापर्यंत असू शकतो.

14) एकमेकांमध्ये संवाद साधण्यासाठी माकड आवाज, चेहर्‍यावरील भाव, आणि शारीरिक गोष्टींचा वापर करतात.

15) माकडा मध्ये सुद्धा माणसाप्रमाणे भावना असतात. ते एक दुसऱ्या प्रति प्रेमभाव दर्शवतात.

16) माकडांना जर प्रशिक्षण दिले तर ते स्वतःला आरशामध्ये ओळखू शकतात.

17) माकड हा सर्वाहारी प्राणी आहे. माकडाच्या विविध प्रजाती वेगवेगळ्या प्रकारची फळे खातात. फुले, पाने, बिया, किडे इत्यादी माकड खातात.

18) मादा माकडाचा गर्भकाल 134 ते 237 दिवसांच्या मध्ये असतो. अधिकांश माकड एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते.

19) माकड एक बुद्धिमान प्राणी मानला जातो. विशेष करून जुन्या काळातील माकड.

20) सर्वात वेगाने आवाज काढणारा माकड Howler Monkeys आहे. याचा तेज आवाज जंगलामध्ये जवळजवळ तीन किलोमीटरपर्यंत ऐकू जाऊ शकतो.

माकडाविषयी / वानर रोचक तथ्य (Facts about monkey in marathi)

21) अवकाशामध्ये पाठवलेले पहिले माकड अल्बर्ट नावाचे आहे.

22) मलेशिया आणि थायलंडमधील मोठमोठ्या नारळाच्या बागांमध्ये नारळ तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षण दिले जाते.

23) माकड अनेक आजारामुळे अधिक संवेदनशील असतात. परंतु माकडांना कधीही सर्दी होत नाही.

24) माकडांपासून मानवाला अनेक आजार सुद्धा होतात.

25) दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस World Monkey Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 2000 पासून साजरा केला जातो.

26) जगातील सर्वात मोठ्या माकडाचे वजन जवळजवळ 35 किलो असते.

27) माकडाला अनेक लोक देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करतात.

28) अनेक लोक असे मानतात की, माकड हे सुद्धा एक माणसाचा अवतार आहे.

29) काही माकड माणसाप्रमाणेच अन्न धोवून खातात.

30) काही माकडांना पावसाच्या मौसम मध्ये अनेक वेळा शंका येतात.

माकड / वानर माहिती मराठी (Makad mahiti Marathi)

31) माकड हा पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक असून याचा अंगठा निष्क्रिय असतो.

32) माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.

33) हाताचा तळवा आणि पायाचे तळवे वगळता माकडाचे संपूर्ण शरीर दाट केसांनी झाकलेले असते.

34) PLOS ONE’ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या एका निष्कर्षांनुसार, USA च्या ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, माकडे माणसांप्रमाणेच निर्णय घेतात आणि चिडचिड करतात.

35) माकडाच्या बहुतेक प्रजाती दिवसा सक्रिय असतात.

36) माकडाच्या अनेक प्रजातींचे मानवांशी विविध प्रकारचे संबंध आहेत. काही पाळीव प्राणी म्हणून ठेवले जातात, तर काही प्रयोगशाळांमध्ये किंवा अंतराळ मोहिमांमध्ये मॉडेल जीव म्हणून वापरले जातात.

37) काही संस्था कॅपचिन माकडांना क्वाड्रिप्लेजिक आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेल्या किंवा हालचाल कमजोरी असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सेवा प्राणी म्हणून प्रशिक्षण देतात. अपंग लोकांसोबत ठेवण्यापूर्वी माकडांना व्यापक प्रशिक्षण दिले जाते. घराभोवती माकडे दैनंदिन कामात मदत करतात जसे की अन्न देणे, आणणे, वस्तू हाताळणे आणि वैयक्तिक काळजी.

38) दक्षिण आशिया, आफ्रिका आणि चीनच्या काही भागांमध्ये माकडांचे मेंदू एक स्वादिष्ट पदार्थ म्हणून खाल्ला जातो.

39) हिंदू धर्मातील प्रमुख देवता हनुमान हा मानवासारखा वानर देव आहे जो त्याच्याबद्दल किंवा रामाबद्दल विचार करणाऱ्या व्यक्तीला धैर्य, शक्ती आणि दीर्घायुष्य देतो असे मानले जाते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माकड समानार्थी शब्द मराठी (Makad samanarthi shabd in marathi)

वानर, मर्कट, कपी

माकड कसा आवाज काढते?

हे माकड वैशिष्ट्यपूर्ण आवाज काढते. हा आवाज बऱ्याच अंतरावरून ऐकू येतो. स्वरयंत्राच्या लघुकोशातून हा आवाज काढला जातो. या ठिकाणचे स्वरयंत्राचे हाड पुष्कळ वाढलेले असते व ते तुतारीसारखे असते.

वानराच्या कळपात मारामाऱ्या कोणत्या कारणावरून होत असतात?

वानरांच्या कळपात अनेक वेळा अन्नासाठी मारामाऱ्या होत असतात.

माकड आयुष्य

माकड साधारणपणे 10 ते 40 वर्ष जगतो.

माकडाचा खेळ

मदारच्या खेळांमध्ये माकडाचा उपयोग केला जातो. त्यामध्ये माकड अनेक कसरती करून लोकांचे मनोरंजन करत असतो.

गुगल तू माकड आहेस

अनेक लोक हे वाक्य गुगल असिस्टंट शी बोलताना विनोदाने म्हणतात.

माकडाचा खेळ करणारा कोण असतो?

माकडाचा खेळ करणारा मदारी असतो.

माकडे काय खातात?

माकडे सर्वभक्षी आहेत आणि फळे, पाने, कीटक आणि लहान प्राणी यासह विविध प्रकारचे पदार्थ खातात. माकडांच्या काही प्रजाती मांस खाण्यासाठी देखील ओळखल्या जातात.

माकडांच्या किती प्रजाती आहेत?

माकडांच्या 260 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, ज्या दोन गटांमध्ये विभागल्या जातात: ओल्ड वर्ल्ड माकडे आणि नवीन जगातील माकडे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण माकड प्राणी माहिती मराठी (Monkey information in marathi) जाणून घेतली. माकड / वानर माहिती मराठी (Makad / vanar mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *