गोवा राज्याची माहिती | Goa information in marathi

Goa information in marathi : गोवा भारताच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये स्थित एक लहान राज्य आहे. जे अरबी समुद्राच्या बरोबर किनार्‍यावर वसले आहे. गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजच्या काळात याला भारताचा फन कॅपिटल असेसुद्धा म्हणतात. येथील मनमोहक समुद्रकिनारे, जिवंत नाईट लाईफ आपल्याला गोव्याकडे आकर्षित करतात. दरवर्षी 20 लाखा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे येतात. चला तर मग गोवा राज्याची माहिती (Goa information in marathi) जाणून घेऊयात.

Goa information in marathi
गोवा राज्याची माहिती (Goa information in marathi)

गोवा राज्याची माहिती (Goa information in marathi)

राज्यगोवा
स्थापना30 मे 1987
राजधानीपणजी
सर्वात मोठे शहरवास्को द गामा
जिल्हे2
भाषाकोकणी, मराठी
लोकसंख्या15.9 लाख (2021)
क्षेत्रफळ3702 चौकिमी
गोवा राज्याची माहिती (Goa information in marathi)

1) गोवा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत फक्त 75 मैल आणि पुर्वेपासून पश्चिमे पर्यंत फक्त 50 मैल अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे.

2) गोव्यावर 1961 पर्यंत चार शतके किंवा त्यापेक्षा जास्त काळ पोर्तुगालांच राज्य होतं.

3) 1956 मध्ये गोवा येथे सेंट पॉल कॉलेजमध्ये आशियातील पहिली प्रिंटिंग प्रेस स्थापन करण्यात आली होती.

4) गोवा भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.

5) भारतातील पहिले मेडिकल कॉलेज पणजी गोवा येथे 1842 मध्ये स्थापन करण्यात आले होते.

6) गोवा भारतातील एक मात्र राज्य आहे जेथे दोन अधिकृत भाषा आहेत. कोकणी आणि मराठी.

7) गोवा भारतातील एक मात्र असे राज्य आहे की जिथे पोर्तुगाल द्वारे लावलेला समान नागरिक कायदा चालू आहे.

8) गोवा भारतातील असे स्थान आहे जेथे आपण दुचाकी वाहन भाड्याने घेऊ शकतो.

9) गोवा मध्ये बारची संख्या सर्वात जास्त आहे. दारू विकण्यासाठी येते सात हजार पेक्षा जास्त लायसन्स आहेत.

10) गोव्याचे क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर आहे.

गोवा माहिती मराठी (Goa mahiti Marathi)

11) गोवा राज्य सर्वात छोटे असले तरीही जीडीपीच्या बाबतीत हा श्रीमंत राज्य आहे.

12) गोव्यातील समुद्र किनारे आणि येथे मिळणारी स्वस्त दारू सर्वात प्रसिद्ध आहे. 

13) गोवा मध्ये दोन स्वतंत्र दिवस साजरे केले जातात. पहिला 15 ऑगस्टला आणि दुसरा म्हणजे 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन.

14) गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी राम मनोहर लोहिया यांनी खूप मोठे योगदान दिलं. यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले होते.

15) गोवा राज्याचे सर्वाधिक उत्पन्न पर्यटन क्षेत्रामधून येते.

16) प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे पिता पंडित दीनानाथ मंगेशकर गोवा चे रहिवाशी होते. 

17) गोवा मध्ये जवळजवळ पन्नास समुद्रकिनारे आहेत.

18) उत्तर गोवा मध्ये एक गुहा आहे ज्याला पांडव गुफा म्हणतात. कारण असं म्हणतात की महाभारत काळामध्ये पांडव या गुहेमध्ये राहत होते.

19) 30 मे 1987 मध्ये गोवा राज्याची स्थापना झाली होती. आणि गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

20) गोव्याची राजधानी पणजी आहे.

गोवा बीच माहिती (Goa information in Marathi)

21) गोव्यातील सर्वात मोठे शहर वास्को-द-गामा आहे.

22) गोव्यामध्ये एकूण दोन जिल्हे आहेत.

23) गोव्यातील वाहन कोड GA आहे.

24) गोवा येथील सर्वोच्च नागरी सन्मान गोमंत विभूषण पुरस्कार 2010 पासून गोवा सरकारद्वारे दिला जातो.

25) गोव्यातील मंगेशी मंदिर सर्वात मोठे मंदिर आहे.

26) गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.

27) गोवा हे राज्य भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.

28) गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते.

29) गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो.

30) सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारतातील हे एक राज्य आहे.

31) शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते.

32) गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे 87.04 टक्के एवढी आहे.

33) गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात.

34) 1961 मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे 450 वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला होता.

35) गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे.

36) महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ – (गोपजन; किंवा आभीर जे ब्रज प्रदेशातील होते ) असा केलेला आढळतो.

गोवा पाहण्यासारखी ठिकाणे (Tourist places of Goa in Marathi)

गोव्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. आता आपण गोवा पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेऊ या.

हे देखील वाचागोवा मुक्ती दिवस माहिती मराठी – goa liberation day information in marathi

  • सलीम अली पक्षी अभयारण्य
  • गोवा राज्य संग्रहालय
  • सचिवालय
  • दुर्गा मंदीर
  • आग्वाद किल्ला
  • मंगेशी मंदिर
  • दुधसागर धबधबा
  • आरम्बोल बीच
  • दोना पाउला बिच
  • कोलवा बीच
  • पालोलेम बीच
  • नेत्रावली धबधबा

गोवा मुक्ती दिवस माहिती

19 डिसेंबर हा दिवस दरवर्षी गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. तस पाहायला गेलं तर भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु त्याच्या 14 वर्षानंतर सुद्धा गोव्यावर पोर्तुगालांचे राज्य होते. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने ऑपरेशन विजय अभियान सुरू केले. आणि गोवा, दीव आणि दमण यांना पोर्तूगिजपासून मुक्त केले. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे 450 वर्षांचे राज्य समाप्त झाले.

गोवा सरकार माहिती मराठी

गोव्याचे मुख्यमंत्रीप्रमोद सावंत
गोव्याचे राज्यपालमृदुला सिन्हा
गोवा न्यायालयमुंबई उच्च न्यायालय – पणजी,गोवा खंडपीठ
गोव्याचे पहिले मुख्यमंत्रीदयानंद बांदोडकर (1963-1966)
गोव्याचे पहिले राज्यपालगोपाल सिंह (1987-1989)
गोवा सरकार माहिती मराठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?

राम मनोहर लोहिया

पंधराशे दहा मध्ये गोवा कोणी काबीज केला?

अफोंसो डी अल्बुकर्क (Afonso de Albuquerque)

गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख कोण आहेत?

गिरीश राया चोडणकर

गोव्यात कोणकोणते अभयारण्य आहेत?

भगवान महावीर अभयारण्य
बोंडला अभयारण्य
खोतीगाव अभयारण्य
सलीम अली पक्षी अभयारण्य

गोव्यातील प्रमुख समुद्रकिनारे

दोना पावला (Dona Paula)
मिरामार (Miramar)
कळंगुट (Calangute)
हणजुणे (Anjuna)
पाळोळे (Polem)

गोव्यातील मंदिरे

श्री मल्लिकार्जुन
श्री सौनस्थन व्याजदरकपातीची पर्टाली जीवोत्तम गणित
मंडलेश्वर मंदिर, शिरोडा
मंगेश मंदिर, प्रियोळ
चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, पारोडा

पंधराशे दहा मध्ये कोणत्या गव्हर्नर ने गोवा जिंकला?

अफोंसो डी अल्बुकर्क (Afonso de Albuquerque)

गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे?

पणजी,गोवा

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत?

प्रमोद सावंत (2021)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गोवा राज्याची माहिती (Goa information in marathi) जाणून घेतली. गोवा माहिती मराठी (Goa mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या पोस्टसाठी आमच्या ब्लॉगला वारंवार भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *